Daily Horoscope Today 28th July 2024 Saam TV
राशिभविष्य

Horoscope Today : आजचे राशीभविष्य, या राशीच्या लोकांनी आज चोरापासून सावध राहा; वस्तू होऊ शकतात गहाळ

Rashi Bhavishya Marathi : आजचे राशीभविष्य, दैनिक पंचांग - रविवार दिनांक - २८ जुलै २०२४ या राशीच्या लोकांनी आज चोरापासून सावध राहा; वस्तू होऊ शकतात गहाळ

Anjali Potdar

आजचे पंचांग - रविवार दिनांक - २८ जुलै २०२४

आषाढ कृष्णपक्ष तिथी - अष्टमी. नक्षत्र - अश्विनी. योग - शूल. करण - बालव. रास - मेष. दिनविशेष - चांगला दिवस.

मेष : आपल्या कामगिरीवर खुश व्हाल

आजचा दिवस कोवळ्या हिरव्या पानासारखा आहे. सगळ्या गोष्टी तरल आणि चमकदार होतील. आपणच आपल्या कामगिरीवर खुश होऊन जाल. एकूणच आरोग्य आणि आनंद घेऊन येणारा दिवस आहे.

वृषभ : तोळा मासा दिवस

परदेशाची निगडित व्यवहार आज पार पडतील. पुढील आखणी कराल त्याचे बेत यशस्वी होतील. तब्येतीच्या बाबतीत थोडे तोळा मासा दिवस आहे. मनस्वास्थ्य सांभाळा.

मिथुन : मोठे व्यवहार पूर्ण होईल

मोठे व्यवहार पूर्ण होण्याचा आजचा दिवस आहे. कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या येतील. त्या यशस्वीपणे पूर्ण होतील. सून जावयांचे सहकार्य आणि सुख दोन्ही लाभेल.

कर्क : बढतीचे योग आहेत

सहकाऱ्यांना आलटून पालटून कामे द्या. आज आपला वट त्यांच्यावर राहणार आहे. कामाशी निगडित प्रवासही होतील. बढतीचे योग आहेत.

सिंह : भाग्याला कलाटणी मिळेल

भाग्याला कलाटणी मिळण्याचा आजचा दिवस आहे. पण त्या गोष्टी सहज होणार नाहीत तर देवाची उपासना फलदायी ठरेल. काही प्रवास करणार असाल तर ते मार्गी लागतील. त्यातून फायदाच होईल.

कन्या : मोठी रिस्क उचलावी लागेल

अचानक पैसा येण्याचा आजचा दिवस आहे. पण त्यासाठी कष्ट आणि मेहनत ही सुद्धा करावी लागेल. काही मोठी रिस्क आयुष्यात उचलावी लागेल बेताने पावले टाकावीत.

तूळ : आजचा दिवस चांगला राहील

व्यवसायामध्ये नवीन पोट व्यवसाय सुरू करणार असाल तर आजचा दिवस चांगला राहील. घेतलेले निर्णय योग्य आहेत अशी आपली खात्री होईल. भागीदाराबरोबर सौहार्दाने वर्तन ठेवा.

वृश्चिक : चोरापासून सावध राहा

चोर आणि चोरी या दोन्ही पासून जपण्याचा आजचा दिवस आहे. वस्तू गहाळ तर होणार नाहीत ना याची काळजी घ्या. अजोळी सुख मिळेल. तब्येत जपावी.

धनु : लॉटरीमधून पैसे मिळतील

शेअर्स आणि लॉटरीमधून पैसे मिळतील. पैशाला अनेक वाटही फुटतील योग्य गुंतवणूक केल्यास त्याचा फायदा पुढील कालावधीसाठी होईल. कला मनोरंजनात मन रमेल.

मकर : दिवस धावपळीचा जाईल

आई विषयी विशेष आस्था व प्रेम वाटेल. ज्येष्ठांची सेवा करावी लागेल. दिवस धावपळीचा जाईल. दिवसाचा शेवटी मात्र हाती काही लागलं नाही अशी भावना येईल.

कुंभ : लेखनाच्या गोष्टी सुचतील

भावंडांचे सौख्य लाभेल. जवळचे प्रवास घडतील. नवीन लेखनाच्या गोष्टी सुचतील. वाचन लेखन यामध्ये प्रगती होईल. प्रकाशनाचा मार्गावर असणारी पुस्तके उजेडात येतील.

मीन : गुंतवणुकीसाठी चांगला दिवस

नवीन गुंतवणूक करणार असाल तर आजचा दिवस योग्य आहे. वारसा हक्काचे पैसे, अडकून राहिले असतील तर ते आज मिळतील. एकूण दिवस धनयोगाच्या दृष्टीने चांगला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Railway Fare Hike : रेल्वेने तिकीट दर वाढवले! स्लीपर, AC ते नॉन एसीचा प्रवास महागला; जाणून घ्या नवीन किंमत

Badlapur : बदलापूरचा आश्चर्याचा धक्का देणारा निकाल; शिवसेनेचा बालेकिल्ला उद्ध्वस्त; नगराध्यक्ष आणि सत्ताही भाजपची

Amravati Election: जनतेचा स्पष्ट कौल! अमरावतीत काँग्रेसची सरशी; मतदारांनी भाजप नाकारले, खासदार म्हणाले...

Cooking Tips : तांदूळ, डाळ, बटाटे शिजवताना कुकरच्या किती शिट्ट्या कराव्या?

Maharashtra Nagar Palika Election Result Live: नागपूर जिल्ह्यातील कामठी नगरपरिषदेत इतिहासात पहिल्यांदाच भाजपचा विजय

SCROLL FOR NEXT