Rashi Bhavishya 17 August 2024 Saam Tv
राशिभविष्य

Horoscope Today : आजचे राशीभविष्य, या राशीच्या व्यक्तींसाठी ‘शनिवार’ धावपळीचा, ताण वाढविणारा, तुमची रास?

Rashi Bhavishya Today 17 August 2024 : शनिवारचे राशीभविष्य, राशीचक्रानुसार मेष ते मीन राशीच्या लोकांसाठी शनिवार नेमका काय घेऊन आला आहे? जाणून घ्या...

Anjali Potdar

आजचे पंचांग शनिवार दिनांक १७ ऑगस्ट २०२४

श्रावण शुक्लपक्ष, शनिप्रदोष. तिथी-द्वादशी ०८|०६ त्रयोदशी २९|५२ रास - धनु १७|२९ नं. मकर. नक्षत्र - पूर्वाषाढा. योग - प्रीतीयोग. करण-०८|०६ बाल (दिवाकरण) १९|०४ कौलव (रात्रौकरण) २९|५२ तैतिल (रात्रौकरण) दिनविशेष - क्षयतिथी

मेष : धावपळीचा आजचा दिवस

कष्ट आणि धावपळीचा आजचा दिवस आहे. कामाच्या बाबतीत प्रगती दिसून येईल. लोकांमध्ये मिळून मिसळून राहायला आवडेल. समाजकारणामध्ये यश दिसते आहे.

वृषभ : सर्व गोष्टी मनासारख्या घडतील

मोठे प्रवास होतील. सर्व गोष्टी मनासारख्या घडताना आज दिसतील. कलाक्षेत्रामध्ये प्रगती मिळेल. विशेषतः स्त्रियांना आजचा दिवस भाग्याचा राहील.

मिथुन : अडचणी आपल्या मार्गात येणार

विनाकारण अडथळे आणि अडचणी आज आपल्या मार्गात येणार आहेत. सहज बाजूला झाल्या तर ठीक नाहीतर साम-दाम-दंड-भेद वापरा. पण स्वतःला सुरक्षित ठेवा.

कर्क : प्रेम वृद्धिंगत होईल

"मी तुझ्यासाठी, तू माझ्यासाठी" असा दिवस आज आहे. जोडीदारासाठी राखीव वेळ ठेवा. प्रेम वृद्धिंगत होईल. याच गोष्टी आनंदाच्या पुढील काही दिवसांसाठी आशादायी ठरतील. प्रवास घडतील.

सिंह : नोकरांपासून सावधान राहा

नोकर नोकरांपासून सावधान. आपल्या वस्तूंची काळजी घ्या. कोणत्याही कारणाने वाईट गोष्टींमध्ये अडकू नका. आजोळी प्रेम राहील.

कन्या : शिव उपासना करावी

शेअर्समध्ये गुंतवणूक केलेली आज फायदेशीर ठरेल. कोणतेही काम करताना बुद्धीचा कौल ऐकूनच त्याचे निर्णय घ्या. ते योग्य ठरतील. उपासनेमध्ये उत्तम फल मिळेल. शिव उपासना करावी.

तूळ : खरेदीसाठी दिवस अनुकूल

सर्वांशी सौहार्दाने वागाल. प्रेमासाठी भुकेलेपण असेल. इतरांना अनेक गोष्टी देण्यात सुख आहे हे आज जाणवेल. घर, गाडी खरेदी यासाठी दिवस अनुकूल आहे.

वृश्चिक : समाधान गाठीशी मिळेल

कामाचा रगाडा उपसावा लागेल. पण दिवसाच्या शेवटी समाधान गाठीशी मिळेल. छोटे प्रवास घडतील. त्यातून फायदाही होईल. दिवस चांगला राहील.

धनु : योग्य परतावा मिळेल

पैशाची गुंतवणूक फायदेशीर ठरेल. जुन्या गोष्टींमधून योग्य परतावा मिळेल. सकारात्मकता बाळगावी लागेल. खाण्यापिण्याची लयलूट असेल.

मकर : कामांमध्ये यश मिळेल

कासवाच्या गतीने का होईना प्रगतीचा दिवस आहे. सकारात्मकता वाढेल घेतलेल्या कामांमध्ये यश मिळेल. मन आनंदी राहील.

कुंभ : मनस्तापाचा दिवस आहे

मनस्तापाचा दिवस आहे. मनस्ताप टाळण्यासाठी विशेष उपासना करा. "आपल्याच लोकांकडून पाठीत खंजीर खूपसल्याची आज भावना होईल". सहज दिवस घालवण्याचा प्रयत्न करा.

मीन : दिवस सुखाचा असेल

प्रेरणादायी दिवस राहील. आपल्या कामाच्या ठिकाणी नवीन वाटा मिळतील. जुन्या ओळखीतून, परिचयातून नवीन कामे मिळतील. दिवस सुखाचा असेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ekvira Devi Temple: कोजागिरी पौर्णिमेनिमित्त एकविरा देवी मंदिराची फुलांनी सजावट

Royal Enfield Hunter 350 आणि Ronin कोणती बाईक आहे दमदार? जाणून घ्या फिचर्स अन् किंमती

Chandrashekhar Bawankule: मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची दुय्यम निबंधक कार्यालयात धाड; अधिकाऱ्याच्या ड्रॅावरमध्ये सापडले पैशांचे बंडल|VIDEO

Maharashtra Live News Update : - नंदुरबारच्या जिल्हा परिषद विद्यार्थ्यांचा मोठा दिलदारपणा

Mumbai To Grushneshwar: मुंबईहून घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग दर्शनासाठी प्रवास कसा करायचा? जाणून घ्या रेल्वे, बस आणि सर्वोत्तम पर्याय

SCROLL FOR NEXT