Horoscope Today Saam Tv
राशिभविष्य

Horoscope Today: गुरुवार या 4 राशींसाठी ठरणार शुभवार; वाचा राशिभविष्य

Satish Kengar

मेष - मेष राशीच्या लोकांसाठी दिवस चांगला जाणार आहे. तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून सहकार्य मिळेल. व्यवसायाची स्थिती पूर्वीपेक्षा चांगली राहील. सध्या कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करणं टाळा. आरोग्य चांगले राहील.

वृषभ - वृषभ राशीच्या लोकांसाठी दिवस आनंददायी जाणार आहे. तुम्हाला काही महत्त्वाच्या कामात यश मिळेल. ज्यामुळे तुमचे मन उत्साही राहू शकते. एखाद्या जुन्या मित्राची भेट होऊ शकते. तुम्हाला तुमच्या प्रियजनांचे सहकार्य मिळेल. पैशाचे नवीन स्रोत मिळाल्यानंतर आनंदाची भावना असेल.

मिथुन - मिथुन राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र जाणार आहे. आर्थिकदृष्ट्या तुम्हाला सामान्य परिणाम मिळतील. खर्च वाढल्याने मन अस्वस्थ राहील. कोणत्याही प्रकारच्या वादविवादापासून दूर राहा. अन्यथा तुमच्या अडचणी वाढू शकतात. मुलांचे सहकार्य मिळेल. व्यवसायाची स्थिती चांगली राहील.

कर्क - कर्क राशीच्या लोकांसाठी दिवस चांगला जाईल. तुमचे मन प्रसन्न राहील. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. सहकारी तुमच्या कामाने प्रभावित होतील. सध्या कोणतेही नवीन काम सुरू करणे टाळा. आवक वाढेल. जमीन, इमारत, वाहन खरेदी शक्य आहे.

सिंह - आज नोकरीच्या ठिकाणी तुम्हाला वरिष्ठअधिकाऱ्यांचे सहकार्य मिळू शकते. एखाद्या मित्राच्या मदतीने तुम्ही व्यवसायासाठी दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकता. तुमची आर्थिक स्थिती मजबूत असेल. तुमच्या जोडीदाराच्या आरोग्यावर लक्ष द्या. आज काही लोकांसाठी लग्नाचे प्रस्ताव देखील येऊ शकतात.

कन्या - आज आईच्या तब्येतीची काळजी घ्या. कुटुंबाकडून सहकार्य मिळेल. आज तुम्हाला कामाच्या ठिकाणी कामे पूर्ण करण्यासाठी कठोर परिश्रम करावे लागतील. मन थोडे अस्वस्थ राहू शकते. आरोग्याची काळजी घ्या.

तूळ - आज मित्राच्या मदतीने उत्पन्न वाढेल. कामाच्या ठिकाणी जास्त मेहनत करावी लागेल. कार्यालयीन राजकारणापासून दूर राहा, अन्यथा तुमच्या प्रतिष्ठेवर परिणाम होऊ शकतो. आर्थिकदृष्ट्या दिवस चांगला राहील. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील.

वृश्चिक - वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस अनुकूल असणार आहे. तुमच्या कामात यश मिळेल. नशीब तुमच्या बाजूने असल्याने, अडकलेले पैसे परत मिळणे शक्य होईल. आज तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून पूर्ण सहकार्य मिळेल. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. मुलांच्या आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

धनु- आज तुमचं मन प्रसन्न राहील. पूर्ण आत्मविश्वासही असेल. कुटुंबात शांतता राखण्याचा प्रयत्न करा. नोकरीत प्रमोशन मिळेल. तुम्हाला तुमच्या मुलाकडून काही चांगली बातमी मिळू शकते. कणत्याही वादविवादापासून दूर राहा.

मकर - राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला जाईल. प्रत्येक कामात यश मिळू शकते. जोडीदारासोबत चांगला वेळ जाईल. आर्थिक स्थिती चांगली राहील. व्यवसायात लाभ होईल. तुम्हाला तुमच्या मुलांकडून पूर्ण सहकार्य मिळेल.

कुंभ- राशीच्या लोकांचा दिवस चांगला जाईल. पैशाची आवक वाढेल. आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली राहील. काही महत्त्वाच्या कामात यश मिळू शकते. वडिलांच्या मदतीने आर्थिक लाभ होऊ शकतो. प्रवासाची शक्यता आहे.

मीन - मीन राशीच्या लोकांचे आरोग्य चांगले राहील. कामाच्या ठिकाणी बदल होण्याची शक्यता आहे. तुम्हाला तुमच्या प्रियजनांचे सहकार्य मिळेल. जुन्या मित्रांची भेट होऊ शकते.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. साम टीव्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Live Updates : पुण्यातील मेट्रो, विकासकामांचे Pm मोदींकडून उद्घाटन

Sambhajinagar News : खळबळजनक! बदलापूरमधील 'त्याच' शाळेतील विद्यार्थिनी घर सोडून गेली; थेट छत्रपती संभाजीनगरमध्ये सापडली

Benefits of Eating Garlic: रिकाम्या पोटी लसूण खाण्याचे फायदे; वाचून व्हाल थक्क

MP Road Accident: भयंकर! भरधाव बस दगड भरलेल्या डंपरमध्ये घुसली, ९ जण ठार; जेसीबीने पत्रा कापून मृतदेह काढले बाहेर

Mumbai Indians: रोहित शर्मा पलटणची साथ सोडणार? मुंबई इंडियन्स या खेळाडूंना करणार रिटेन

SCROLL FOR NEXT