आजचे राशी भविष्य
Horoscope Today 1 July 2024 Saam TV
राशिभविष्य

Horoscope Today : महिन्याचा पहिलाच दिवस 'या' राशींच्या लोकांसाठी ठरेल भाग्याचा; वाचा आजचे राशीभविष्य

Anjali Potdar

दैनिक पंचांग १ जुलै २०२४

वार - सोमवार. ज्येष्ठ - कृष्णपक्ष. तिथी - दशमी १०:२७ प. रास- मेष. नक्षत्र - भरणी. योग - सुकर्मा. करण - विष्टि. दिनविशेष - चांगला दिवस

मेष : मनोबल वाढवणारी घटना घडेल

एखादी मनोबल वाढवणारी घटना घडेल .नवा मार्ग सापडेल. अचानक अनेक गोष्टी समोर येतील मनातल्या गोष्टी पूर्ण करताना "पन्ना की तमन्ना" असा दिवस राहिल.

वृषभ : आज मौल्यवान वस्तू सांभाळा

आपल्या वस्तू जपा गहाळ होणार नाहीत ना याची दक्षता घ्या. मोक्षाचा मार्ग सुकर होण्यासाठी अध्यात्माकडे कल राहील. "न जाने क्यूं होता हैं यें जिंदगी के साथ" असे मनस्वास्थ राहील.

मिथुन : मन आनंदी राहील

नातेवाईकांच्या सहकार्याने पुढे जाण्याचे योग आहेत. मुला-मुलींचे प्रश्न मार्गी लागणार आहेत. मन आनंदी राहील. "घाल घाल पिंगा" अशी आज मनाची अवस्था असणार आहे.

कर्क : फिरतीचा दिवस आहे

कामाच्या ठिकाणी मान वाढेल. अनेक गोष्टी मनासारख्या घडताना दिसतील. कीर्ती वृद्धिंगत होईल. फिरतीचा दिवस आहे.

सिंह : भाग्यकारक घटना घडतील

गुरुकृपा लाभेल. भाग्यकारक घटना घडतील. देवाची दया आणि कर्म या दोन्हीची सांगड चपखल बसेल. उपासना वाढवा.

कन्या : काही गोष्टी अंगलट येतील

शासकीय कामांमध्ये अडचणी येतील. वरिष्ठांबरोबर मतभेद नकोत. काही गोष्टी अंगलट येण्याची शक्यता आहे.

तूळ : मनासारख्या गोष्टी घडतील

आपल्या मतं आणि त्याविषयी आग्रही रहाल. कामाच्या ठिकाणी व्यवसायामध्ये मनासारख्या गोष्टी घडतील. भागीदाराचे उत्तम सहकार्य आज मिळणार आहे .जोडीदाराबद्दल "अधीर मन झाले" अशी भावना राहील.

वृश्चिक : दिवस थोडा त्रासाचा

नको ती दुखणी आणि त्रास कटकटी वाढतील. गुप्त शत्रू वाढते राहतील. कामाच्या ठिकाणी दगदग जाणवेल. काही गोष्टी अव्यक्त राहण्यानेच आपल्याला आजचा दिवस थोडा त्रासाचा जाईल.

धनु : चांगल्या संधी मिळतील

मनोरंजन कलाक्षेत्रामध्ये चांगल्या संधी मिळतील. पैशाची आवक चांगली राहील. एकूण संततीकडून सुद्धा समाधान मिळेल. दिवस सुखाचा जाईल.

मकर : जबाबदाऱ्या डोके वर काढतील

घरच्या जबाबदाऱ्या डोके वर काढतील. पण आरोग्य उत्तम राहील कुटुंबीयांच्या मदतीने मानसिक स्वास्थ्य जपाल .

कुंभ : प्रगतीपथावर मार्गक्रमण कराल

नवी दिशा नवे मार्ग सापडतील. अचानक चांगल्या गोष्टींचा रस्ता सापडणार आहे. प्रगतीपथावर मार्गक्रमण कराल. दिवस चांगला.

मीन : आज पैसे खर्च होतील

पैशाची गुंतवणूक योग्य ठरणार आहे. काही गोष्टी खरेदीसाठी आज पैसे खर्च होतील. पण मनाला समाधान मिळेल. "या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे" असे वाटेल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Weather Forecast : राज्यात पुढचे ५ दिवस तुफान पाऊस; हवामान खात्याकडून अनेक जिल्ह्यांना अलर्ट, वाचा वेदर रिपोर्ट

Rashi Bhavishya : आज तुमच्या नशिबात काय? वाचा राशीभविष्य

Horoscope Today : सूर्याचा आज पुनर्वसु नक्षत्रात प्रवेश, कोणकोणत्या राशींचे भाग्य पालटणार? वाचा राशी भविष्य

Bajaj CNG Bike: जगातील पहिली CNG बाईक Freedom आज होणार लॉन्च, जबरदास्त फीचर्ससह किती आहे किंमत?

Solapur Breaking : शेतकऱ्यावर कोसळलं आभाळ, महावितरणच्या विद्युत तारेने केला घात; ओढ्यात विजेचा धक्का लागून 24 म्हशींचा मृत्यू

SCROLL FOR NEXT