Horoscope Today in Marathi  Saam tv
राशिभविष्य

Horoscope Today : प्रेमाचे रूपांतर विवाहात होईल, तर काहींच्या अंगावर येतील अनेक जबाबदाऱ्या, तुमची रास यात आहे का?

Horoscope Today in Marathi : आज काही राशीच्या लोकांना शिव अपासना लाभदायी ठरणार आहे. तर काही लोकांच्या अंगावर अनेक जबाबदाऱ्या येणार आहेत. वाचा तुमचे राशीभविष्य

Anjali Potdar

आजचे पंचांग

मंगळवार, १९ नोव्हेंबर २०२४,कार्तिक कृष्णपक्ष.

तिथी-चतुर्थी १७|२९

रास-मिथुन

नक्षत्र-आर्द्रा

योग-साध्य

करण-बालव

दिनविशेष-चांगला दिवस

मेष - परदेशी भाषेमध्ये प्रगती होईल. विविध प्रदर्शनामध्ये यश मिळेल. पैशाच्या दृष्टीने मोठ्या उलाढाली घडतील. अनेक लाभ पदरात पडतील.

वृषभ - नको त्या गोष्टींचा ससेमीरा मागे लागेल. अनाठही खर्च वाढेल. प्रेमात अपयश संभवते आहे. स्वतःबरोबर इतरांची मानसिकता जपा.

मिथुन- मैत्रीपूर्ण संबंध इतरांशी तुमचे आज वृद्धिंगत होतील. मनाला एक वेगळी धिटाई प्राप्त होईल. नवीन आव्हाने पेलण्यासाठी आज सरसावून पुढे जाल. आत्मविश्वास वाढेल.

कर्क - तब्येतीवर पैसा खर्च होईल. नाहक पैसा खर्च झाल्यामुळे मनस्ताप वाढेल. कलाक्षेत्रात या लोकांसाठी आजचा दिवस त्रासाचा ठरेल.

सिंह - मित्रांच्या मदतीने आणि ओळखीने कामे होतील. अनेक दिवस रखडलेल्या गोष्टी आज सुरळीत होताना दिसतील. सून जावयांच्या कौतुकामध्ये आज दंग रहाल. जिभेवर साखर ठेवावी आणि डोक्यावर बर्फ.

कन्या - वरिष्ठांच्या मदतीने आज पुढे जाण्याचे योग आहेत. धावपळ आणि दमणूक वाढेल. प्रवासाचा दिवस आहे. दलाली काम, एजंट, किरकोळ व्यापारी यांच्यासाठी आजचा दिवस चांगला असेल.

तूळ -भाग्यकारक घटना अनुभवता येतील. सद्गुरूंची ओढ वाटेल. ध्यानधारणा आणि उपासना याकडे आज विशेष लक्ष द्यावे. नातवंडांकडून सुख लाभेल. लक्ष्मी उपासना करावी.

वृश्चिक - भ्रष्टाचार, लाचलुचपत, काळा पैसा यापासून स्वतःला आज जपा. विनाकारण खोट्या गोष्टीमध्ये अडकण्याचा संभव आहे. शारीरिक कष्ट वाढतील.

धनु - प्रेमाचे रूपांतर विवाहात होण्याच्या दृष्टीने घटना घडतील. महत्त्वाच्या बैठका आज पार पडतील. जोडीदाराविषयी प्रेमच वृद्धिंगत होईल. दिवस आनंदी आहे

मकर- गुप्त शत्रू त्रास देतील. आज चोरावर मोर होऊन राहावे लागेल. मामाचे विशेष प्रेम मिळेल. नोकरीच्या ठिकाणी दगदग वाढेल.

कुंभ - शिव उपासना लाभदायी ठरणार आहे. कला, क्रीडा क्षेत्रामध्ये प्रगती होईल.शेअर्स मधील गुंतवणूक आज फायदेशीर ठरेल. प्रेमात यश आहे.

मीन - आईच्या तब्येतीची विशेष काळजी घ्यावी लागेल. अनेक जबाबदाऱ्या अंगावर येतील. पण कुटुंबीयांच्या सहकार्याने त्या व्यवस्थित पार पाडाल. घरी आनंदी वातावरण असेल. धार्मिक कार्य घरी होतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Solapur Politics: ...अन्यथा माझा बाबा सिद्दिकी व्हायला वेळ लागणार नाही, शरद पवार गटाच्या नेत्याला जीवे मारण्याच्या धमक्या

Coronavirus: कोरोनाच्या विषाणूने कॅन्सरवर होणार उपचार, नवीन संशोधनाने डॉक्टरही हैराण

Maharashtra Election: मतदार यादीत नाव कसं शोधायचं?वोटर आयडी नसल्यास काय करावे?हे ७ मुद्दे तुम्ही वाचायलाच हवे

Tmkoc Show: जेठालालचं भांडण पेटलं, निर्मात्याची पकडली कॉलर नंतर दिली शो सोडण्याची धमकी

BJP-Congress Rada : काँग्रेस अन् भाजप कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा, जोरदार हाणामारी अन् खुर्च्या फेकल्या

SCROLL FOR NEXT