Horoscope Today Marathi  Saam tv
राशिभविष्य

Horoscope Today : मैत्रीतला लोभ आणि लाभ यातील फरक जाणवेल; तुमच्या नशिबात आज काय लिहिलंय? वाचा संपूर्ण राशिभविष्य

Anjali Potdar

आजचे पंचाग

बुधवार,१८ सप्टेंबर २०२४,भाद्रपदशुक्लपक्ष,

प्रतिपदा श्राद्ध.

तिथी-पौर्णिमा ०८|०४

प्रतिपदा २८|२०

रास- मीन

नक्षत्र-११|०० पूर्वाभाद्रपदा

योग-गंड

करण-०८|०४ बवकरण (दिवाकरण)

१८|१२ बालव (दिवाकरण)

दिनविशेष- क्षयतिथी

मेष - खूपदा मनात ठरवूनही तशाच गोष्टी होतात असे होत नाही. आज कामामध्ये व्यत्यय आणि काही गोष्टींवर आपले नियंत्रण राहणार नाही हे खरे आहे. त्यामुळे सावधगिरीने पावले उचला.

वृषभ - आपले मित्र आपल्या जवळचे जरी असले तरी काही स्वार्थापुरते संपर्कात आहेत असे जाणवते. पण मुळात तुमचाच स्वभाव दिलदार असल्यामुळे आज मित्रांबरोबर तुमचे स्नेहभोजनाचे योग येतील. मैत्रीतला लोभ आणि लाभ यातील फरक जाणवेल .

मिथुन- व्यवसायाला योग्य अशी आपली रास आहे. काही नवीन गोष्टी मनात ठरवून ठेवल्या असतील तर आज त्याला योग्य मार्ग मिळतील. कामाच्या दृष्टीने दिवस धावपळीचा राहील. बोलून समोरच्याकडून कामे आपलीशी करून घ्याल.

कर्क - साधेपणामुळे जग जिंकता येते हे आज जाणवेल. अर्थात काही वेळेला इतरांसाठी नाही तर आपल्यासाठी जगायचे असते हेही समजेल. उपासने मधून स्वत्व सापडेल. दिवस चांगला राहील.

सिंह- इतरांवर वर्चस्व प्रस्थापित करण्याच्या नादात स्वतःकडे दुर्लक्ष नको. आपल्या मोठेपणावर अनेकजण जळतात म्हणून नको त्या मोठ्या गोष्टी करण्याच्या भानगडी नकोत. काही कामे झाकले मूठ असलेलीच बरी असतात.

कन्या- विनकारण वैवाहिक सुखामध्ये व्यक्तय, कटकटी या सध्या चालू आहेत. अबोला असेल तर तो आज मिटेल. कोर्टकचेरीचे कामे मागे लागतील पण ती आपल्या बाजूने झुकते माप देणारी ठरतील.

तूळ - शरीराचा मनावर आणि मनाचा शरीरावर परिणाम होत असतो. काही छोट्या गोष्टींमुळे आज तब्येत बिघडण्याची शक्यता आहे. म्हणून मानसिकता जपा. तरच शरीर स्वास्थ चांगले राहील.

वृश्चिक- कितीही कणखर असले तरी आतून कोमल असणारी आपली रास आहे .संतातिवर विशेष प्रेम करणारी आहे. आपल्या दोन गोष्टी राहिल्या तरी चालेल पण यांना कमी काही पडले नाही पाहिजे अशी धारणा असते. आज याच सुखात अडकून राहाल दिवस चांगला जाईल.

धनु - कामाला एक वेगळाच उत्साह जोम वाटेल. सर्वांबरोबर सकारात्मकरीत्या घराशी निगडित असणारी कामे कराल.जुने काही व्यवहार, जागा खरेदी विक्रीच्या बाबतीत रखडले असतील तर आज नक्की होण्याची शक्यता आहे.

मकर - प्रपंचाला लागणाऱ्या सर्व गोष्टी आपण योग्यरीत्या आयोजन नियोजन करत असता. त्यामुळे आपल्या पराक्रमावर आणि वागण्यावर अनेक जण खुश असतात. आज असाच दिवस येईल आणि आपल्या कष्टाचे चीज होईल असे आपल्याला वाटेल.

कुंभ- खूपदा मनात ठरवूनही तशाच गोष्टी होतात असे होत नाही आज कामामध्ये व्यत्याय आणि काही गोष्टींवर आपले नियंत्रण राहणार नाही हे खरे आहे. त्यामुळे सावधगिरीने पावले उचला.

मीन- काही वेळेला स्वतःसाठी जगावे अशी भावना येते तुमच्या अपेक्षा आणि इच्छा या सुद्धा खूप साध्या असतात. साधेपणाचे आयुष्य आवडते आज असाच आनंदात दिवस घालवाल. स्वत्व सापडेल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

Employees Provident Fund: PF खातेधारकांसाठी मोठी बातमी; पीएफमधून काढता येणार १ लाख रुपये

Solapur News: धर्मराज काडादी यांनी विधानसभा लढवण्याची केली घोषणा, सोलापूरमधून उमेदवारीसाठी शिंदेंना घातलं साकडं?

SCROLL FOR NEXT