सध्या ग्रहांमध्ये मोठा बदल होताना पाहायला मिळत आहे. त्यामुळे काही राशींची चांदी होणार आहे. ज्योतिषशास्त्रात प्रत्येक ग्रहाची राशी आणि नक्षत्र परिवर्तन महत्त्वाचे मानले जाते. ग्रहांच्या या हालचालींचा प्रभाव वेगवेगळ्या राशींवर पाहायला मिळतोय. बुध ग्रहाला बुद्धी, वाणी, व्यापार आणि तर्कशक्तीचा कारक मानलं जातं. चंद्रानुसार बुध हा वेगाने राशी परिवर्तन करणारा ग्रह आहे.
पंचांगानुसार, २९ ऑगस्ट २०२६पासून दुपारी १२ वाजून ५८ मिनिटांनी बुध पूर्वा फाल्गुनी नक्षत्रात प्रवेश करणार आहे. बुधाच्या या नक्षत्र गोचराचा काही राशींना विशेष फायदा होण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थिती सुधारण्यापासून अडकलेली कामे पूर्ण होण्यापर्यंत अनेक शुभ परिणाम दिसू शकतात.
बुधाचे नक्षत्र गोचर सिंह राशीच्या व्यक्तींसाठी फायदेशीर ठरू शकते. या काळात आर्थिक परिस्थितीत सुधारणा होण्याची शक्यता आहे. कर्ज फेडण्यासाठी मदत मिळू शकते. व्यवसायात प्रगतीचे मार्ग खुले होतील. कुटुंबातील वातावरण आनंदी राहील आणि शुभकार्य घडण्याची शक्यता आहे. इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीची इच्छा पूर्ण होऊ शकते. तसेच दूरच्या प्रवासाचे योगही जुळून येऊ शकतात.
कन्या राशीसाठीही बुधाचे नक्षत्र परिवर्तन शुभ मानले जात आहे. मेहनतीचे योग्य फळ मिळू शकते. अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना शिक्षणात चांगले यश मिळू शकते. रखडलेली कामे मार्गी लागतील. भौतिक सुख-सुविधांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. धार्मिक प्रवासाचे योग असून प्रेमसंबंधही सुखकारक राहू शकतात.
मकर राशीच्या व्यक्तींनाही बुधाच्या गोचराचा फायदा होऊ शकतो. अचानक धनलाभ होण्याची शक्यता असून आर्थिक बाजू मजबूत होऊ शकते. नोकरी करणाऱ्यांसाठी पगारवाढ किंवा करिअरमध्ये प्रगतीचे संकेत आहेत. अडकलेली कामे पूर्ण होतील आणि कुटुंबीयांची साथ मिळेल. मित्रांसोबत आनंददायी वेळ घालवण्याची संधी मिळू शकते.
टीप: वरील माहिती ज्योतिषशास्त्रीय मान्यतांवर आधारित आहे. याकडे निश्चित भविष्यवाणी म्हणून पाहू नये. साम टिव्ही याचे समर्थन करत नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.