Thursday Horoscope  saam tv
राशिभविष्य

Thursday Horoscope : कामात सकारात्मक बदल होईल! 4 राशींच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस ठरणार खास, वाचा आजचे राशीभविष्य

Today Rashi Bhavisha : १२ राशींच्या व्यक्तींचा बुधवारचा दिवस कसा असणार? जाणून घेण्यासाठी वाचा संपूर्ण राशीभविष्य.

Sakshi Sunil Jadhav

मेष - आज तुमची रखडलेली कामं पूर्ण होण्याची शक्यता आहे. नोकरीत सहकाऱ्यांची चांगली मदत मिळेल. घाईघाईत कोणालाही मोठी आश्वासने देऊ नका.

वृषभ - आज कामाच्या ठिकाणी संयमाने वागणे गरजेचे आहे. व्यवसायात भागीदारी करताना प्रत्येक गोष्ट तपासून घ्या. विद्यार्थ्यांना शिक्षणात नवीन संधी मिळतील.

मिथुन - आज तुमच्या कामाचे वरिष्ठांकडून कौतुक होऊ शकते. नवीन घर किंवा मालमत्ता खरेदीचा विचार पुढे जाऊ शकतो. खाण्यापिण्याकडे लक्ष द्या आणि वाद टाळा.

कर्क - आज एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी प्रवास करावा लागू शकतो. बऱ्याच दिवसांपासून अडकलेले पैसे मिळण्याची शक्यता आहे. मोठे आर्थिक निर्णय घेताना घाई करू नका.

सिंह - आज कुटुंबातील सदस्यांचे चांगले सहकार्य मिळेल. व्यवसायात नवीन भागीदारी करण्याचा विचार करू शकता. जोडीदाराशी बोलताना शब्द जपून वापरा.

कन्या - आज तुमच्या कामात सकारात्मक बदल पाहायला मिळतील. जवळच्या व्यक्तींसोबत प्रवासाचा योग येऊ शकतो. आरोग्याची काळजी घ्या आणि तणावापासून दूर राहा.

तूळ - आज आर्थिक व्यवहार करताना विशेष काळजी घ्यावी लागेल. कोणालाही विचार न करता पैसे उधार देऊ नका. वाहन चालवताना सावधगिरी बाळगा.

वृश्चिक - आज कामाच्या ठिकाणी काही अडचणी येऊ शकतात. कुटुंबातील वाद मिटवण्यासाठी शांतपणे चर्चा करा. महत्त्वाचे निर्णय घेताना घाई करणे टाळा.

धनु - आज तुमच्या कामाचे वरिष्ठांकडून कौतुक होण्याची शक्यता आहे. नवीन काम सुरू करताना योग्य नियोजन करा. विद्यार्थ्यांनी अभ्यासात अधिक लक्ष देण्याची गरज आहे.

मकर - आज खर्च वाढण्याची शक्यता असल्याने पैशांचे नियोजन करा. व्यवसायात उत्पन्न वाढवण्यासाठी नवीन प्रयत्न करावे लागतील. कुटुंबातील एखादी आनंदाची बातमी मिळू शकते.

कुंभ - आज तुमच्यासाठी प्रगतीचे नवीन मार्ग खुले होऊ शकतात. व्यवसायातील अडचणी दूर होण्याची शक्यता आहे. मित्र आणि कुटुंबीयांसोबत आनंदात वेळ घालवाल.

मीन - आजचा दिवस आनंदाचा ठरू शकतो. नोकरी आणि व्यवसायात नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबीयांचे सहकार्य मिळेल आणि प्रवासाचा योग येऊ शकतो.

डिस्क्लेमर: ही माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. साम टीव्ही या माहितीची पूर्ण सत्यता किंवा अचूकतेची हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

लाडकी योजनेची e-KYC वेबसाईट पुन्हा सुरू? अपात्र लाडकींना पुन्हा अर्ज भरता येणार?

Satara Bank Election: शिंदेसेना-राष्ट्रवादीचा भाजपला धक्का; झेडपीतील पराभवाचा जिल्हा बँकेत बदला

फायनान्स कंपन्यांचे पाठीराखे कोण? महिला एजंटची शेतकऱ्याला अश्लील शिवीगाळ

अलिबागच्या रस्त्यावर यम फिरतोय; वाहतूक कोंडीनं घेतला चिमुरड्याचा जीव

मराठवाड्यात पाणीटंचाई की टँकरचा गोरखधंदा? कृत्रिम पाणीटंचाईनं टँकर माफिया मालामाल?

SCROLL FOR NEXT