Guru Pushya Yog 2026: These 3 Zodiac Signs Will See Big Success In Love, Career And Wealth saam tv
राशिभविष्य

Guru Pushya Yog 2026: तीन राशींचं आयुष्य पलटणार; प्रेम असो की नोकरी, प्रत्येक ठिकाणी नशीब देईल साथ

Guru Pushya Yog 2026: वर्षातील शेवटचा गुरु-पुष्य योग १८ जून २०२६ रोजी तयार होतोय. जे धन, शिक्षण आणि गुंतवणुकीसाठी अत्यंत शुभ मानला जाते. हे विशेष योग तीन राशींचं भाग्य उजळणारं ठरणार आहे. चला जाणून घेऊया या भाग्यवान राशी कोणत्या आहेत?

Bharat Jadhav

  • पंचांगानुसार 18 जून 2026 रोजी वर्षातील शेवटचा गुरु पुष्य योग तयार होणार आहे.

  • तीन राशींना प्रेम, करिअर आणि आर्थिक क्षेत्रात विशेष लाभ मिळण्याची शक्यता आहे.

  • गुरु ग्रह ज्ञान, संपत्ती आणि प्रगतीचा कारक मानला जातो.

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, पुष्य नक्षत्र अत्यंत शुभ मानलं जातं. देवी लक्ष्मीचा जन्मदेखील याच नक्षत्रात झाला होता. गुरु ग्रह हा देखील सर्व ग्रहांमध्ये सर्वात शुभ ग्रह आहे. पंचांगानुसार ज्या दिवशी गुरुवार आणि पुष्य नक्षत्र एकत्र येतात, त्या दिवसाला गुरुपुष्य योग किंवा गुरुपुष्य अमृत योग म्हटलं जातं. पंचांगानुसार या वर्षातील तिसरा गुरु पुष्य योग १८ जून २०२६ रोजी निर्माण होणार आहे. हा या वर्षातील शेवटचा गुरु पुष्य योग असणार आहे. हा दिवस नवीन शिक्षण, गुंतवणूक आणि करारांसाठी अत्यंत फलदायी आहे. चला जाणून घेऊया की कोणत्या तीन राशींवर याचा सर्वात जास्त फायदा होईल.

मिथुन (Gemini)

१८ जून रोजी तयार होणारा गुरु-पुष्य योग हा मिथुन राशीच्या व्यक्तींच्या जीवनातील परिस्थितीत वेगाने बदल घडवणारा ठरणार आहे. या काळात लोकांच्या ज्ञानात वाढ होईल आणि त्यांचे व्यावसायिक क्षेत्रातील प्राविण्यही वाढेल. इकतेच नाहीतर या जातकांच्या लोकांची निर्णयक्षमता पूर्वीपेक्षा अधिक तीक्ष्ण होईल. कौशल्यांद्वारे ते नवीन उत्पन्नाचे नवीन स्रोत शोधू काढतील. यामुळे भविष्यात ते श्रीमंत बनवू शकतात. यासह त्यांना एक मोठी संधी मिळण्याची शक्यता आहे. नेटवर्किंग आणि ओळखींमुळे व्यवसायातही मोठे फायदे मिळू शकतात. कौटुंबिक आणि सामाजिक सुख व आदर दोन्ही वाढतील.

कन्या Virgo

कन्या राशीसाठीही गुरु-पुष्य योग लाभकारी ठरणार आहे. यामुळे कार्य, धर्म आणि आर्थिक क्षेत्रांवर परिणाम होईल. व्यावसायिक कार्यात लक्षणीय वाढ होऊ शकते. कामाच्या ठिकाणी जबाबदाऱ्या अचानक वाढतील, यामुळे भविष्यात पैशांचा ओघ वाढण्यास मदत होईल. कामाच्या ठिकाणी या जातकांची प्रतिमा अधिक चांगली होईल. एका प्रणालीनुसार आणि नियोजनाने काम केल्याने मोठे आर्थिक फायदे मिळू शकतात. या काळात लहान निर्णयांचेही मोठे परिणाम मिळू शकतात. कुटुंबातील एखाद्या वृद्ध सदस्याच्या आरोग्यात लक्षणीय सुधारणा होण्यास मदत होईल.

मीन Pisces

हा गुरु-पुष्य योग मीन राशीसाठी अत्यंत फायदेशीर ठरण्याची शक्यता आहे. भाग्य अचानक तुमच्या बाजूने येईल. मानसिक क्षमता वाढल्यामुळे दीर्घकाळच्या समस्या एका संकेदात सुटतील. तुमची अंतर्दृष्टी आणि अंतर्ज्ञान खूप प्रबळ होईल. तुम्ही तुमच्या करिअरची दिशा बदलण्याचा एक मोठा निर्णय घेऊ शकता. जुन्या प्रयत्नांना आता फळ मिळू शकते. जे पद्धतशीरपणे काम करतात त्यांना लक्षणीय फायदा होऊ शकतो. जुन्या क्लायंटकडून किंवा प्रोजेक्टमधून पैसे मिळू शकतात. तुमचे आरोग्य आणि दैनंदिन दिनचर्या सुधारण्यासाठी हा काळ योग्य असणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भाजप आमदाराचे निधन; राजकीय वर्तुळात शोककळा

Ladki Bahin Yojana : 'लाडकी'बाबत मोठी अपडेट, अपात्र ठरलेल्या १४ हजार जणांकडून होणार पैशांची वसुली, मुख्यमंत्र्यांनी दिली महत्वाची माहिती

Maharashtra News Live Update: धाराशिवमध्ये मान्सूनपूर्व पावसाची दमदार हजेरी; मुरूम-तुगाव परिसर झोडपला

काही जण जेलमध्ये तर एकनाथ शिंदे हिमालयात निघून जातील; ठाकरेंच्या नेत्याच्या व्यक्तव्याने भुवया उंचावल्या

रोहित शर्मा, हार्दिक पंड्याला अल्टिमेटम; भारतीय संघात सिलेक्शनसाठी १ अट पूर्ण करावी लागणार

SCROLL FOR NEXT