Guru Nakshatra Gochar 2026 meta ai
राशिभविष्य

Guru Nakshatra Gochar 2026: १२ तासांत ३ राशींचं नशीब बदलणार, नशीब पलटणार अन् पैशांचा पाऊस पडणार

Jupiter Transit 2026: 19 ऑगस्टला गुरु अश्लेषा नक्षत्रात प्रवेश करणार आहे. ज्योतिषीय मान्यतेनुसार मेष, कर्क आणि वृश्चिक राशींना आर्थिक लाभ, करिअरमध्ये प्रगती आणि रखडलेल्या कामात यश मिळण्याची शक्यता आहे.

Sakshi Sunil Jadhav

Guru Nakshatra Gochar 2026: ज्योतिषशास्त्रात देवगुरु बृहस्पतीला अत्यंत शुभ आणि फलदायी ग्रह मानलं जातं. गुरु हा ज्ञान, शिक्षण, भाग्य, संतती, वैवाहिक जीवन तसेच धन-संपत्तीचा कारक मानला जातो. त्यामुळे गुरुच्या राशी किंवा नक्षत्रातील बदलाचा परिणाम सर्व राशींवर पाहायला मिळतो.

ज्योतिषशास्त्रानुसार, देवगुरु बृहस्पती १९ ऑगस्ट २०२६ रोजी अश्लेषा नक्षत्रात प्रवेश करणार आहेत. गुरु या नक्षत्रात १८ नोव्हेंबर २०२६ पर्यंत राहणार असल्याचे सांगितलं जातं. या काळात काही राशींना करिअर, आर्थिक स्थिती आणि वैयक्तिक आयुष्यात सकारात्मकता बदल अनुभवायला मिळू शकतात.

मेष राशी

मेष राशीच्या जातकांसाठी गुरुचा हा नक्षत्र बदल शुभ ठरू शकतो. आत्मविश्वास आणि पराक्रमात वाढ होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी मेहनतीचे कौतुक होईल आणि वरिष्ठांचे सहकार्य मिळू शकते. नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करणाऱ्यांसाठी हा काळ अनुकूल ठरू शकतो. आर्थिक स्थिती सुधारण्यासोबतच कुटुंबात आनंदाचे वातावरण राहण्याची शक्यता आहे.

कर्क राशी

कर्क राशीसाठी हा काळ विशेष लाभदायक मानला जात आहे. अनेक दिवसांपासून रखडलेली कामे मार्गी लागू शकतात. सामाजिक प्रतिष्ठा आणि मान-सन्मान वाढण्याची शक्यता आहे. नोकरदारांना प्रमोशन किंवा इच्छित ठिकाणी बदली मिळू शकते. व्यावसायिकांना अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता असून त्यामुळे आर्थिक अडचणी कमी होऊ शकतात.

वृश्चिक राशी

वृश्चिक राशीच्या जातकांसाठी गुरुचा नक्षत्र बदल भाग्योदय करणारा ठरू शकतो. विद्यार्थ्यांसाठी हा काळ विशेष चांगला असून स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांना यश मिळण्याची शक्यता आहे. अडकलेले पैसे परत मिळू शकतात. वैवाहिक जीवनातही आनंद आणि गोडवा वाढण्याची शक्यता असून जोडीदारासोबत चांगला वेळ घालवण्याची संधी मिळेल.

टीप: वरील माहिती ज्योतिषीय मान्यतांवर आधारित आहे. याला निश्चित भविष्यवाणी समजू नये. साम टिव्ही याच्याशी समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: छत्रपती संभाजीनगर जिल्हा कोरडा दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांची मागणी

Kangana Ranaut: महिलांच्या कर्तृत्वापेक्षा त्यांच्या चारित्र्याचीच चर्चा का? कंगना रणौतचा थेट सवाल

Blackhead Removal Home Remedies: ब्लॅकहेड्समुळे चेहरा दिसतोय खराब? 'हे' ५ उपाय करा; मिळेल नॅचरल सॉफ्ट फेस

National Film Awards : ७२ वर्षांचा इतिहास बदलला; राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा दिल्लीऐवजी गुजरातमध्ये होणार

Tuesday Horoscope: कामाच्या ठिकाणी ताण वाढेल, ७ राशींचा खर्च कमी होणार; वाचा उद्याचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT