trigrahi rajyog pisces saam tv
राशिभविष्य

Triekadash Yog 2025: १५ ऑगस्टपासून 'या' राशींचा गोल्डन टाईम होणार सुरु; बुध-मंगळ तयार करणार पॉवरफुल योग

Triekadash Yog 2025: ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांच्या स्थितीतील बदल अनेक राशींच्या लोकांसाठी महत्त्वाचे ठरतात. १५ ऑगस्ट २०२५ पासून बुध (Mercury) आणि मंगळ हे दोन महत्त्वाचे ग्रह एकत्र येऊन एक शक्तिशाली योग तयार करणार आहेत.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार नवग्रह ठराविक कालावधीनंतर आपल्या राशी आणि स्थानात बदल करतात, ज्याचा प्रभाव फक्त 12 राशींवरच नाही, तर संपूर्ण देश-विदेशावरही मोठ्या प्रमाणात पडतो. सध्या ग्रहांचा सेनापती मंगळ कन्या राशीत स्थित आहेत आणि तो लवकरच बुध या ग्रहांशी युती करून लाभदायक त्रिएकादश योग तयार करणार आहे. या संयोगामुळे काही राशींना नोकरी, व्यवसाय, पैसा आणि कौटुंबिक आयुष्यात मोठे लाभ मिळण्याची शक्यता आहे.

15 ऑगस्ट रोजी तयार होतोय त्रिएकादश योग

15 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 7 वाजून 26 मिनिटांनी मंगळ आणि बुध एकमेकांपासून साठ अंश अंतरावर असणार आहे. ज्यामुळे त्रिएकादश योग तयार होणार आहे. सध्या बुध कर्क राशीत आणि मंगळ कन्या राशीत स्थित आहेत. ज्योतिषशास्त्रानुसार ही स्थिती काही राशींसाठी अत्यंत शुभ फलदायी ठरणार आहे. पाहूया कोणत्या 3 राशींना या दुर्मिळ संयोगाचा विशेष फायदा होणार आहे.

धनु रास

मंगळ-बुध यांचा त्रिएकादश योग धनु राशीसाठी अत्यंत लाभदायक ठरू शकणार आहे. या राशीच्या लोकांना सर्व क्षेत्रांमध्ये यशाची प्राप्ती होऊ शकणार आहे. आर्थिकदृष्ट्या मोठा लाभ मिळू शकतो. आत्मविश्वास वाढल्यामुळे तुम्ही नव्या कामात पुढाकार घेऊ शकणार आहात. व्यवसाय करणाऱ्यांना चांगली डील मिळू शकते. प्रतिष्ठा आणि मान-सन्मान मिळू शकतो.

वृश्चिक राशी

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हा त्रिएकादश योग विशेष फायदेशीर ठरू शकणार आहे. जुने कायदेशीर वाद मिटू शकणार आहेत. प्रेमसंबंध सुद्धा बळकट होऊ शकतात. पार्टनरसोबत चांगला वेळ जाईल. व्यापारात प्रतिस्पर्ध्यांना चांगली टक्कर देता येईल. अनेक कामात अपेक्षित यश मिळू शकतं.

कर्क राशी

कर्क राशीसाठी बुध-मंगळ त्रिएकादश योग लाभदायक ठरू शकतो. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. पराक्रम भावात मंगळाच्या उपस्थितीमुळे सर्व क्षेत्रात यश मिळू शकते. जुने रखडलेले काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. स्पर्धात्मक कामांमध्ये तुमची कामगिरी चांगली होईल.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

वेब सिरिज पाहिली अन् सातवीच्या पोराने टोकाचे पाऊल उचलले, घरातच आयुष्य संपवलं

Maharashtra Live News Update: इतके दिवस शरद पवार का बोलले नाहीत - फडणवीस

Viral Video Of Chain Snatching: चोरीचा हास्यास्पद प्रयत्न, पण शेवट झाला गजब, व्हिडिओ पाहून विचारात पडाल

Chanakya Niti: 'या' ६ लोकांना कधीही आर्थिक मदत देणे टाळा, ते तुमच्या पैशाचा नाश करतात

Railway Ticket Offer : रेल्वेची भन्नाट योजना, तिकिटावर २० टक्के सूट, अट फक्त एकच

SCROLL FOR NEXT