Shani Margi Guru Vakri saam tv
राशिभविष्य

Shani Margi Guru Vakri: देव दिवाळीला शनी-गुरुची स्थिती बदलणार; 'या' राशींना प्रत्येक कामात मिळणार यश

Shani Margi Guru Vakri: गुरु सध्या शुक्र, वृषभ राशीत आहे आणि तो या वर्षी याच राशीत राहणार आहे. क्रूर ग्रह शनी देखील दीर्घकाळ एकाच राशीत राहतो.

Surabhi Jayashree Jagdish

ज्योतिष्य शास्त्राप्रमाणे, काही ग्रह गोचरप्रमाणे,मार्गी आणि वक्री चाल चालतात. देवांचा गुरु, बृहस्पति, ठराविक काळानंतर राशी बदलतो. गुरुच्या राशी बदलाचा प्रत्येक राशीच्या लोकांच्या जीवनावर परिणाम होतो. गुरु सध्या शुक्र, वृषभ राशीत आहे आणि तो या वर्षी याच राशीत राहणार आहे.

याशिवाय क्रूर ग्रह शनी देखील दीर्घकाळ एकाच राशीत राहतो. ज्यामुळे प्रत्येक राशीचे जीवन प्रभावित होतं. गुरू वृषभ राशीमध्ये वक्री स्थितीत आहे. यासोबतच 16 नोव्हेंबरला शनी स्वतःच्या कुंभ राशीत मार्गस्थ होणार आहे. दरम्यान दोन प्रमुख ग्रहांच्या स्थितीतील बदलाचा परिणाम प्रत्येक राशीच्या लोकांच्या जीवनावर होऊ शकतो.

वृषभ रास

या राशीच्या चढत्या घरात गुरु उपस्थित असणार असून शनि दहाव्या घरात आहे. दीर्घकाळापासून गमावलेले पैसे परत मिळू शकणार आहेत. तुम्हाला तुमच्या वरिष्ठांकडून पूर्ण सहकार्य मिळू शकणार आहे. व्यवसायाच्या क्षेत्रातही भरपूर फायदा मिळणार आहे. प्रवासाच्या माध्यमातून तुम्ही भरपूर पैसे कमवू शकता.

कर्क रास

गुरु आणि शनीच्या स्थिती बदलामुळे या राशीच्या लोकांच्या जीवनात अनेक प्रकारचा आनंद येणार आहे. काही मोठी जबाबदारी तुमच्यावर सोपवली जाऊ शकते. समाजात मान-सन्मान वाढणार आहे. व्यवसायात चांगला फायदा होऊ शकणार आहे. तुम्हाला जास्त पैसे मिळणार आहेत.

मेष रास

या राशीच्या लोकांसाठी शनि मार्गी आणि गुरू वक्री असणं फायदेशीर ठरू शकणार आहे. या दोन्ही ग्रहांच्या हालचालीमुळे या राशीच्या लोकांना प्रत्येक क्षेत्रात यश मिळू शकणार आहे. प्रदीर्घ प्रलंबित कामं पूर्ण होऊ शकतात. पद आणि प्रतिष्ठा वाढण्याचीही शक्यता आहे. तुम्हाला एकापेक्षा जास्त व्यवसाय करण्याची संधी देखील मिळू शकणार आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhandup : भांडुपमध्ये मोठी दुर्घटना, पहिल्या मजल्यावरून ९ जण खाली पडले; एकाचा मृत्यू, नेमकं काय घडलं?

Maharashtra News Live Update: कोथरुडमधील 'निर्वाण बिहार' सोसायटीत गुंडाचा हैदोस

Black Panther: सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पहिल्यांदाच दिसला ब्लॅक पँथर; पाहण्यासाठी पर्यटकांची उत्सुकता वाढली| VIDEO

Trendy Mangalsutra Designs: ऑफिसमध्ये फॉर्मल ड्रेसवर ट्राय करा हे ७ ट्रेंडी लेटेस्ट नाजूक मंगळसूत्र डिझाइन्स

Vidhan Parishad Election 2026: विधानपरिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी कुणाला देणार संधी, 'या' ६ नेत्यांची नावं चर्चेत

SCROLL FOR NEXT