Gajkesari Rajyog  saam tv
राशिभविष्य

Gajkesari Rajyog: फेब्रुवारीच्या सुरुवातीला बनणार गजकेसरी राजयोग; 'या' राशींचं नशीब चमकणार, मिळणार पैसाच पैसा

Gajkesari rajyoga february zodiac signs wealth: गजकेसरी राजयोग तयार होणार आहे. यावेळी १२ राशीच्या लोकांचं आयुष्यावर सर्वात जास्त परिणाम होणार आहे. पण या तीन राशींसाठी भाग्यवान ठरू शकणार आहेत.

Surabhi Jayashree Jagdish

ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात, असं ज्योतिष्य शास्त्रामध्ये म्हटलं आहे. त्याचप्रमाणे देवांचा गुरू बृहस्पति दरवर्षी त्याच्या राशीत बदल करतो. अशा स्थितीत एक राशी पूर्ण होण्यासाठी १२ वर्षे लागतात. गुरू 12 वर्षांनी वृषभ राशीमध्ये स्थित आहे. गुरूच्या या राशीत राहून कोणत्या ना कोणत्या ग्रहाशी संयोग होतोय. शुभ किंवा अशुभ योग निर्माण होतो.

फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला गुरूचा चंद्राशी संयोग होणार असून त्यामुळे गजकेसरी नावाचा राजयोग तयार होणार आहे. गुरु सध्या वृषभ राशीत विराजमान आहे. 6 फेब्रुवारी रोजी पहाटे 2:15 वाजता चंद्र वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे गजकेसरी राजयोग तयार होणार आहे. यावेळी १२ राशीच्या लोकांचं आयुष्यावर सर्वात जास्त परिणाम होणार आहे. पण या तीन राशींसाठी भाग्यवान ठरू शकणार आहेत.

कर्क रास

कर्क राशीच्या लोकांसाठी गजकेसरी राजयोग खूप फायदेशीर ठरू शकणार आहे. या राशीमध्ये बाराव्या घरात गजकेसरी राजयोग तयार होणार आहे. अशा स्थितीत या राशीच्या लोकांना व्यवसायात भरपूर नफा मिळण्याची शक्यता आहे. जर तुम्हाला नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल तर या कालावधीत असं करणं फायदेशीर ठरू शकणार आहे. तुम्ही बनवलेल्या धोरणामुळे व्यवसायात मोठा नफा मिळू शकणार आहे.

सिंह रास

सिंह राशीच्या लोकांसाठी गजकेसरी राजयोग खूप फायदेशीर ठरू शकणार आहे. या राशीच्या लोकांना अनपेक्षित लाभ मिळू शकणार आहे. तुमच्या अनेक इच्छा पूर्ण होऊ शकतात. करिअरच्या क्षेत्रातही तुम्ही खूप यश मिळवू शकणार आहात. याद्वारे तुम्हाला चांगली विशेष ओळख मिळू शकते. तुमची आर्थिक स्थिती चांगली राहणार आहे. तुमचं लव्ह लाईफ चांगलं जाणार आहे.

तूळ रास

या राशीच्या नवव्या घरात गजकेसरी राजयोग तयार होत आहे. अशा परिस्थितीत या राशीच्या लोकांना नशिबाची पूर्ण साथ मिळू शकणार आहे. तुम्हाला ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून बरेच फायदे मिळू शकतात. नोकरी करणाऱ्या व्यक्तीला परदेशात नोकरीच्या अनेक संधी मिळू शकतात. प्रवासातूनही उत्पन्नात लक्षणीय वाढ होऊ शकणार आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

काही तरी मोठं घडणार? डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या विरोधात हादरवणारी पोस्ट, जगात खळबळ

NEET paper leak: 'मनी'साठी मनिषांनी फोडला पेपर, पुण्यातील 3 मनिषांचा कारनामा उघड

11th Admission: 11 वी प्रवेशाचा गोंधळ कुणामुळे? सलग दुसऱ्या दिवशी वेबसाईट ठप्प

Diesel Crisis: इंधनाचा पुरेसा साठा, तरीही का होतोय राडा? पेट्रोल पंपांवर रांगा आणि हाणामाऱ्या; पाहा VIDEO

Budh Gochar: 29 मे रोजी बुध करणार स्वराशीत प्रवेश; या 3 राशी एका रात्रीत बनणार गडगंड श्रीमंत

SCROLL FOR NEXT