Gajkesari Rajyog saam tv
राशिभविष्य

Gajkesari Rajyog: डिसेंबर महिन्यात बनणार गजकेसरी राजयोग; 'या' राशींना अचानक मिळणार बक्कळ पैसा

Gajkesari Rajyog 2025: ज्योतिषशास्त्रानुसार, गजकेसरी राजयोग हा वैदिक ज्योतिषशास्त्रातील सर्वात शुभ आणि शक्तीशाली राजयोगांपैकी एक मानला जातो. यावेळी कोणत्या राशींना लाभ मिळणारे ते पाहूयात.

Surabhi Jayashree Jagdish

ज्योतिषशास्त्रात गजकेसरी राजयोगाला अत्यंत मंगलकारी मानण्यात येतं. हा राजयोग चंद्र आणि गुरु यांच्या युतीने तयार होतो. सध्या गुरु ग्रह आपल्या उच्च राशी कर्कमध्ये भ्रमण करत आहेत आणि 8 डिसेंबरला चंद्रही कर्क राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे कर्क राशीत गजकेसरी राजयोग तयार होणार आहे.

या राजयोगामुळे काही राशींचा गोल्डन टाइम सुरू होऊ शकणार आहे. त्यांच्या करिअर आणि व्यवसायात प्रगती होणार आहे. चला जाणून घेऊया या काळात कोणत्या राशींना लाभ होणार आहे.

कन्या रास (Kanya Zodiac)

गजकेसरी राजयोगामुळे कन्या राशीच्या लोकांचे चांगले दिवस सुरू होणार आहेत. उत्पन्न वाढण्याचे योग आहेत. नवीन मार्गांनी तुम्ही धन कमवू शकणार आहात. जुन्या गुंतवणुकीतून किंवा व्यवसायातील प्रयत्नांमधून अनपेक्षित लाभ मिळण्याची शक्यता आहे. अचानक धनलाभाचे योग तयार होणार आहेत.

मिथुन रास (Mithun Zodiac)

मिथुन राशीसाठी गजकेसरी राजयोग लाभदायी ठरू शकणार आहे. हा राजयोग तुमच्या राशीपासून धन आणि वाणी स्थानात तयार होणार आहे. आकस्मिक धनलाभ होण्याची शक्यता आहे. कुटुंबात सुख-शांती आणि आनंदाचे वातावरण राहणार आहे. मित्र व सहकाऱ्यांचा पाठिंबा मिळू शकतो.

तूळ रास (Libra Zodiac)

गजकेसरी राजयोग तूळ राशीच्या जातकांसाठी शुभ फलदायी ठरू शकणार आहे. हा राजयोग तुमच्या राशीपासून कर्मस्थानात तयार होतोय. बेरोजगारांना नोकरीच्या संधी मिळू शकणार आहेत. नवीन प्रकल्प, पदोन्नती किंवा मोठ्या कामाची जबाबदारी मिळू शकते. या काळात धन कमावण्याचे अनेक मार्ग उपलब्ध होणार आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: नागपुरात ओबीसी विद्यार्थी फेलोशिपच्या मुद्द्यावरून आक्रमक

डिझेल टँकर पेटला; आगीच्या ज्वाळा अन् धुराचे काळेकुट्ट लोट रस्त्यावर पसरत गेले...VIDEO

Bhumi Pednekar Photos: 'दम लगा के हैशा' फेम भूमीचा जलवा, काळ्या ड्रेसमधील फोटो झाले व्हायरल

Gossip: गॉसिप करणं फायद्याचं की तोट्याचं? रीसर्चमधील निष्कर्ष एकदा वाचाच!

Saturday Horoscope : हॉस्पिटलायझेशनवर खर्च होईल, तब्येतीची काळजी घ्या; ५ राशींच्या लोकांना राहावे लागेल सावध

SCROLL FOR NEXT