Ketu-Mangal Yuti saam tv
राशिभविष्य

Angarak Yog: उद्यापासून 3 राशींच्या व्यक्तींना नशीबी येणार फक्त दुःख; मंगळ-केतूच्या युतीने बनणार अंगारक योग

Angarak Yog in Leo : ग्रहांच्या युतीचा मानवी जीवनावर मोठा प्रभाव पडतो. जेव्हा दोन ग्रह एकाच राशीत येतात, तेव्हा त्यांच्या प्रभावामुळे शुभ किंवा अशुभ योग तयार होतात. 'अंगारक योग' हा असाच एक महत्त्वाचा योग आहे.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतो. ग्रहांच्या गोचरमुळे काही राजयोग तयार होतात. यामधील काही राजयोग शुभ असतात तर काही अशुभ असतात. अशातच उद्या एका योगाची निर्मिती होणार आहे.

२८ जुलै रोजी अंगारक योग तयार होणार आहे. सिंह राशीतील मंगळ आणि केतूच्या धोकादायक युतीमुळे अंगारक योग तयार होणार आहे. २८ जुलैपर्यंत सूर्याच्या सिंह राशीत मंगळ आणि केतू एकत्र राहणार आहे. अशा परिस्थितीत काही राशींच्या समस्या वाढू शकतात. या काळात काही राशींचं पैशाचं नुकसान आणि आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे. यामध्ये कोणत्या राशींनी सावध राहिलं पाहिजे ते पाहूयात.

सिंह रास

अंगारक योग तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकणार आहे. या काळात तुमचा स्वभाव आक्रमक होऊ शकणार आहे. रागाच्या भरात निर्णय घेणं तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकता. यावेळी तुम्हाला नुकसान सहन करावे लागू शकतं. या काळात तुमच्या जोडीदारासोबत तणाव निर्माण होऊ शकतो.

वृ्श्चिक रास

अंगारक योगाची निर्मिती तुमच्यासाठी प्रतिकूल ठरू शकणार आहे. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांशी एखाद्या गोष्टीवरून वाद होऊ शकणार आहे.यावेळी नोकरी करणाऱ्यांनी नोकरी बदलली नाही तर बरं होईल. यावेळी अपघात होण्याची शक्यता असणार आहे. गाडी चालवताना काळजी घ्यावी.

मकर रास

अंगारक योग तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकणार आहे. कोणताही जुना आजार उद्भवू शकतो. इतकंच नाही तर तुम्हाला आरोग्याशी संबंधित समस्याही येऊ शकतात. जर तुम्हाला रक्तदाबाची समस्या असेल तर काळजी घ्या. गोष्टीमुळे तणाव निर्माण होऊ शकतो.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Old Pension Scheme : सरकारी कर्मचाऱ्यांची लॉटरी! जुनी पेन्शन योजना परत येणार; 'या' राज्य सरकारच्या निर्णयाने खळबळ

Maharashtra News Live Update: पंढरपूरमध्ये मिरवणूकीच्या कार्यक्रमात मंदिरासमो हवेत गोळीबार

Jio Recharge: खुशखबर! फक्त 666 रुपयांमध्ये इतक्या दिवसांची वैधता, Jio चा जबरदस्त रिचार्ज प्लान

Election Commission: २०२९च्या लोकसभा निवडणुकीवेळी मोठा बदल होणार; मतदान केंद्रांची संख्या वाढणार, RTIमधून खुलासा

Live Update : शिंदे की ठाकरे, शिवसेना कुणाची? कोर्टात नेमकं काय झालं? वाचा A टू Z अपडेट

SCROLL FOR NEXT