Zodiac Signs effect saam tv
राशिभविष्य

Zodiac Signs: शुक्रवारपासून 'या' राशींच्या व्यक्तींवर पडणार पैशांचा पाऊस; बुध-मंगळाची स्थिती करणार मालामाल

Zodiac Signs effect: शुक्रवारी 24 जानेवारी 2025 रोजी रात्री 2:16 पासून बुध आणि मंगळ समसप्तक योग तयार करणार आहे. इंग्रजीमध्ये या योगास ‘Opposition Aspect’ असं म्हणतात.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, ग्रहांच्या गोचरमुळे तयार होणारे राजयोग प्रत्येक राशींच्या जीवनावर काही ना काही परिणाम करतात. अवघ्या दोन दिवसांनी म्हणजेच शुक्रवारी 24 जानेवारी 2025 रोजी रात्री 2:16 पासून बुध आणि मंगळ समसप्तक योग तयार करणार आहे. जेव्हा दोन ग्रह एकमेकांच्या सातव्या भावात म्हणजेच विरुद्ध घरांमध्ये असतात तेव्हा हा योग तयार होतो.

इंग्रजीमध्ये या योगास ‘Opposition Aspect’ असं म्हणतात. हा योग विवाह, व्यवसाय आणि भागीदारी यांसारख्या जीवनातील महत्त्वाच्या क्षेत्रात संतुलन आणण्याचे काम करतो. शास्त्रानुसार, हा योग व्यक्तीला धैर्यवान आणि आत्मविश्वासू बनवण्यास मदत करतो.

बुध आणि मंगळाच्या समसप्तक योगाचं ज्योतिषशास्त्रात विशेष महत्त्व आहे. बुध आणि मंगळ हे दोन्ही तीक्ष्ण बुद्धिमत्ता, तर्कशास्त्र आणि उर्जेचे प्रतीक आहेत. दरम्यान बुध आणि मंगळाच्या या संयोगामुळे व्यक्तीला झटपट निर्णय घेण्याची क्षमता मिळते. या दोन्ही ग्रहांनी तयार केलेल्या राजयोगामुळे कोणत्या राशींच्या नशीबाचे दरवाजे उघडणार आहेत, ते पाहूयात.

मेष रास

मंगळ हा मेष राशीचा शासक ग्रह असून बुध बरोबर त्याचा संयोग या राशीसाठी विशेषतः फलदायी ठरणार आहे. मेष राशीच्या लोकांच्या उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. नवीन स्त्रोतांकडून आर्थिक लाभ होणार आहे. कामाच्या ठिकाणी तुमचा आत्मविश्वास आणि नेतृत्व क्षमतांचे कौतुक होणार आहे. हा योग तुम्हाला धैर्य आणि उर्जेने भरून टाकणार आहे. जोखमीच्या कामातही तुम्हाला यश मिळू शकतं.

सिंह रास

सिंह राशीसाठी हा योग विशेषतः शुभ असणार आहे. तुम्ही एखाद्या मोठ्या करारावर किंवा प्रकल्पावर काम करत असाल तर तुम्हाला यश मिळू शकणार आहे. संवाद कौशल्य सुधारणार आहे. तुम्ही इतरांना प्रेरणा देऊ शकाल आणि टीमला यशाच्या दिशेने नेऊ शकाल. या काळात जुने वाद संपणार आहे.

कन्या रास

बुध हा कन्या राशीचा अधिपती ग्रह असून मंगळाच्या पाठिंब्यामुळे त्याला आणखी बळ मिळू शकणार आहे. कोणत्याही समस्येवर तुम्ही सहज उपाय शोधू शकणार आहात. तुम्हाला उत्पन्नाच्या नवीन संधी मिळू शकणार आहेत. या काळात तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. व्यवसायात वेगाने वाढ होण्याची शक्यता आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

EPFO EDLI Scheme: तुमचं PF अकाउंट आहे? तुम्हाला मिळतो ७ लाखांचा मोफत विमा; कसं? वाचा सविस्तर

मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांची नोटीस, हजर होण्याचे आदेश, नेमकं कारण काय? VIDEO

Onkar Elephant : नदीत अंघोळ करणाऱ्या ओंकार हत्तीवर अमानुष हल्ला, अंगावर सुतळी बॉम्ब फेकले अन्...

Actress Journey: योगा टीचरवर पडली डायरेक्टरची नजर, केलं फिल्ममध्ये कास्ट; आज आहे कोट्यवधीची मालकीण

मनोज जरांगेंच्या हत्येच्या कट प्रकरणी मोठी अपडेट; आरोपीचा महत्वाचा व्हिडिओ समोर, कोण अडकणार?

SCROLL FOR NEXT