Trigrahi Yog 2025: saam tv
राशिभविष्य

Tirgrahi Yog: आजपासून धन-संपत्तीमध्ये होणार झपाट्याने वाढ; तीन ग्रह तीन राशींना देणार अफाट पैसा

Tirgrahi Yog In Scorpio: ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांच्या स्थितीतील थोडासा बदल देखील मानवी जीवनावर मोठे परिणाम करतो. आजपासून, अनेक महत्त्वाचे ग्रह एका विशिष्ट शुभ आणि शक्तिशाली महायोगात येत आहेत.

Surabhi Jayashree Jagdish

ज्योतिषशास्त्रानुसार ग्रह ठराविक अंतराने त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यावेळी ग्रह एकमेकांशी संयोग करतात. हा संयोग काहींसाठी शुभ तर काहींसाठी प्रतिकूल ठरणार आहे. १६ डिसेंबर रोजी वृश्चिक राशीत एक महत्त्वाचा त्रिग्रही योग तयार होत आहे.

वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, हा योग मान-सन्मानाचे दाता सूर्य, व्यापाराचे कारक बुध आणि भूमिपुत्र मंगल यांच्या संयोगाने तयार होणार आहे. या योगाचा परिणाम सर्व राशींवर दिसून येणार आहे. मात्र तीन राशी अशा आहेत ज्यांचं नशीब या काळापासून उजळणार आहे.

सिंह राशी (Leo)

सिंह राशीच्या व्यक्तींसाठी हा त्रिग्रही योग अत्यंत सकारात्मक ठरणार आहे. मान-सन्मान आणि प्रतिष्ठा वाढणार आहे. विद्यार्थ्यांसाठी हा काळ अभ्यासात यश मिळवण्यासाठी आणि नवीन कौशल्य आत्मसात करण्यासाठी अनुकूल ठरणार आहे. कुटुंब आणि समाजात प्रतिष्ठा वाढेल. या काळात केलेले प्रयत्न चांगला लाभ देतील.

मीन राशी (Pisces)

मीन राशीच्या व्यक्तींसाठी त्रिग्रही योग नवम भावात तयार होणार आहे. त्यामुळे भाग्याचा साथ मिळेल. देश-विदेश प्रवासाचे योग आहेत. नवीन संधी मिळतील आणि योग्य निर्णय घेता येणार आहे. व्यापार किंवा नोकरीत लाभ होण्याची शक्यता आहे.

कुंभ राशी (Aquarius)

कुंभ राशीच्या जातकांसाठी हा त्रिग्रही योग कर्मभावात तयार होणार आहे. नोकरी आणि व्यवसायाच्या दृष्टीने हा काळ शुभ ठरणार आहे. नवीन नोकरीची संधी मिळणार आहे. व्यवसायात नवीन प्रकल्प किंवा करारातून लाभ होणार आहे. करिअर आणि आर्थिक स्थिती मजबूत होईल.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : "मी मेल्यांनंतर माझी कोणी आठवण काढू नका..." सोशल मीडियावर स्टोरी टाकत १८ वर्षीय तरुणाची आत्महत्या, धक्कदायक कारण आलं समोर

De De Pyaar De 2 Collection : बॉक्स ऑफिसवर प्रेमाची जादू! अजय देवगणच्या 'दे दे प्यार दे 2'नं वीकेंडला कमावले 'इतके' कोटी

IPL 2026 चा लिलाव कधी होणार? 77 खेळाडूंवर बरसणार 237 कोटींचा पाऊस; जाणून घ्या लिलावाचे डिटेल्स

Maharashtra Live News Update: नेव्हल डॅकमध्ये बॉम्बस्फोटाच्या धमकीचा फोन, परिसरात सर्च ऑपरेशन

Dombivli : प्रवाशांसाठी मोठी बातमी! वाहतुकीसाठी 'हा' ब्रिज राहणार ५ महिने बंद, जाणून घ्या कारण

SCROLL FOR NEXT