Gajkesari Rajyog 2024 saam tv
राशिभविष्य

Gajkesari Rajyog 2024: 19 ऑक्टोबरपासून 'या' राशींचं नशीब फळफळणार; मिळणार भरपूर पैसा अन् समृद्धी!

Surabhi Jagdish

ज्योतिष्य शास्त्रामध्ये एका ठरविक वेळेनंतर ग्रह त्यांच्या राशीमध्ये बदल करतो. यामध्ये सर्वात वेगाने राशी बदलणारा ग्रह म्हणजे चंद्र. शास्त्रानुसार, चंद्र दर अडीच दिवसांनी आपली राशी बदलतो. यावेळी चंद्राच्या गोचरमुळे कोणत्या ना कोणत्या ग्रहाशी किंवा ग्रहाशी संयोग होतो. 19 ऑक्टोबर रोजी चंद्र वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. यावेळी त्याचा गुरु ग्रहाशी संयोग होणार आहे.

गुरूच्या संयोगाने पुन्हा एकदा गजकेसरी राजयोग तयार होणार आहे. ज्योतिष शास्त्रानुसार गजकेसरी योग म्हणजे सिंह हत्तीवर स्वार होतो. या योगामध्ये चंद्राचा गुरू, बुध आणि शुक्र यांच्याशी संयोग होतो. दिवाळीपूर्वी हा गजकेसरी योग तयार होणार असून यावेळी कोणत्या राशींच्या व्यक्तींना याचे सकारात्मक परिणाम होणार आहेत, ते पाहूयात.

मकर रास

गजकेसरी राजयोग राशीच्या लोकांसाठी भाग्यवान सिद्ध होऊ शकतात. गुंतवणुकीसाठी काळ अनुकूल राहणार आहे. करिअरमध्ये निर्माण झालेल्या समस्या आता संपू शकतात. तुम्ही शेअर बाजारातून चांगले पैसे कमवू शकता. व्यवसायाच्या संदर्भात तुम्हाला परदेशात जावं लागू शकतं.

कन्या रास

गजकेसरी राजयोग लोकांसाठी शुभ सिद्ध होऊ शकणार आहे. या काळात नवीन व्यवसाय सुरू करता येणार आहे. नोकरदार लोकांना प्रोत्साहन, बोनस मिळू शकतात. प्रदीर्घ प्रलंबित कामे पूर्ण झाल्याने मोठा आर्थिक लाभ होऊ शकतो. अविवाहितांना लग्नाचा प्रस्ताव येऊ शकतो. विद्यार्थ्यांबद्दल बोलायचं झालं स्पर्धा परीक्षांमध्ये फायदे मिळू शकतात.

तूळ रास

गजकेसरी राजयोग तयार होऊन चांगल्या दिवसांची सुरुवात होऊ शकणार आहे. अपूर्ण काम पूर्ण होऊ शकतात. तुमच्या करिअरमध्ये तुम्हाला काही चांगल्या ऑफर्स मिळतील. तुम्ही धार्मिक किंवा शुभ कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. मालमत्ता घेण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. बेरोजगारांना नोकरीत यश मिळू शकतं.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Live Updates : बाबा सिद्दीकींच्या मारेकऱ्याकडे दोन पिस्तुल आणि २८ राऊंड सापडले, पोलिसांची माहिती

Health Tips: सफरचंद खाण्याची योग्य वेळ कोणती?

Baba Siddique Death : आरोपींना २१ तारखेपर्यंत पोलीस कोठडी; पोलिसांना सापडली २८ काडतुसे, सिद्धिकींच्या मारेकऱ्यांच्या निशाण्यावर आणखी कोण?

Mumbai Crime: बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर मुंबई पुन्हा हादरली, मालाडमध्ये मनसे कार्यकर्त्याचा खून

Mumbai Local: लोकल रुळावरून घसरली; पश्चिम रेल्वेची वाहतूक 3 तासांपासून विस्कळीत

SCROLL FOR NEXT