Shadashtak Yog 2025 saam tv
राशिभविष्य

Shadashtak Yog: 20 जूनपासून 'या' राशींवर कोसळणार दुःखाचा डोंगर; शनी-मंगळ बनवणार धोकादायक षडाष्टक योग

Shadashtak Yog 2025: ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांच्या स्थितीतील बदल मानवी जीवनावर मोठा प्रभाव टाकतात. यातीलच एक महत्त्वाचा आणि काहीवेळा अशुभ मानला जाणारा योग म्हणजे षडाष्टक योग.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

ज्योतिष्य शास्त्रानुसार प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यावेळी ग्रहांच्या गोचरमुळे खास योग तयार होतात. यामध्ये काही योग हे सकारात्मक आणि काही योग नकारात्मक प्रभाव देतात. शुक्रवार, 20 जून रोजी मंगळ आणि शनी विशेष ज्योतिषीय स्थिती तयार करतील, हे दोन्ही ग्रह एकमेकांपासून 150 अंशांचा कोणीय योग तयार करतील.

कुंडलीच्या सहाव्या आणि आठव्या भावात कोणतेही दोन ग्रह असल्यास हा कोणीय तयार होतो. वैदिक ज्योतिषशास्त्रात याला षडाष्टक योग म्हणतात. ज्यामुळे काही राशींना सावधगिरी बाळगण्याची गरज असणार आहे. या योगाच्या निर्मितीमुळे काही राशींच्या व्यक्तींना त्रास होण्याची शक्यता आहे. यामध्ये कोणत्या राशींचा समावेश आहे ते पाहूयात.

कर्क रास

षडाष्टक योगाची निर्मिती आपल्यासाठी हानिकारक ठरू शकणार आहे. तुम्हाला एखाद्या गोष्टीबद्दल मानसिक ताण येऊ शकतो. त्याचप्रमाणे नोकरदारांना कामाच्या ठिकाणी अडचणींना सामोरं जावं लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे निष्काळजीपणा करू नका. पोट किंवा रक्तदाबाशी संबंधित समस्यांबाबत विशेष दक्षता घेणं आवश्यक आहे.

मकर रास

मकर राशीच्या लोकांसाठी षडाष्टक योगाची निर्मिती प्रतिकूल ठरू शकणार आहे. या वेळी तुमची तब्येत बिघडू शकते. या काळात आरोग्याशी संबंधित काही समस्या उद्भवू शकतात. या काळात जोडीदारासोबत तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. वाहन चालवताना सावधगिरी बाळगा.

तूळ रास

षडाष्टक बनणं तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकते. यावेळी तुमची तब्येत बिघडू शकते. कामाच्या ठिकाणी वाद विवाद किंवा वरिष्ठांशी मतभेद होऊ शकतात. घरातील एखाद्या सदस्यासोबत दुरावा निर्माण होऊ शकतो. व्यापाऱ्यांचं उत्पन्न थोडे कमी होणार आहे. अनावश्यक खर्चाला सामोरं जावं लागू शकतं.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kaju Benefits: रोज सकाळी ५ काजू खल्ल्याने होतील 'हे' आरोग्यदायी फायदे

Maharashtra Politics: महाराष्ट्रात सर्वात मोठी घडामोड; राज्यातील राजकारणात नवीन पक्षाची एंट्री, शरद पवारांसह, महायुतीचं वाढलं टेन्शन

Maharashtra Live News Update: संभाजीनगरमध्ये अजित पवारांना मोठा धक्का! आमदार संदीप शिरसागर यांनी घेतलं कमळ हाती

Sanscreen For Winter: हिवाळ्यात तुमच्या त्वचेसाठी कोणतं सनस्क्रीन आहे बेस्ट, एकदा जाणून घ्या

Shocking : धक्कादायक! 45 प्रवाशांनी भरलेली खासगी बस अचानक आगीच्या भक्ष्यस्थानी, नागपुरात खळबळ

SCROLL FOR NEXT