Gudi Padwa These Zodiac Signs saam tv
राशिभविष्य

Gudi Padwa 2025 : गुढीपाडव्यापासून 'या' राशींचं आयुष्य चमकणार; अपार यशासह मिळणार पैसा अन् धनसंपत्ती

Hindu New Year 2025 Horoscope: हिंदू नववर्ष ३० मार्च २०२५ पासून सुरू होणार आहे. यावेळी राजा आणि मंत्री दोघेही सूर्य असतील. विशेष म्हणजे नवीन संवत एका दुर्मिळ ग्रह संयोगादरम्यान सुरू होत आहे.

Surabhi Jayashree Jagdish

मार्च महिना खूप खास आहे याचं कारण म्हणजे हिंदू धर्माचं नववर्ष या महिन्यात साजरं करण्यात येणार आहे. हिंदू नववर्ष ३० मार्च २०२५ पासून सुरू होणार आहे. यावेळी राजा आणि मंत्री दोघेही सूर्य असतील. विशेष म्हणजे नवीन संवत एका दुर्मिळ ग्रह संयोगादरम्यान सुरू होत आहे.

गुढीपाढव्याच्या दिवशी सूर्य, चंद्र, शनि, बुध आणि राहू मीन राशीत एकत्र असणार आहेत. ज्यामुळे काही राशींना प्रचंड फायदा होऊ शकतो. ३० मार्चपासून सुरू होणारं हिंदू नववर्ष कोणत्या राशींसाठी शुभ फळं देणार आहे ते जाणून घेऊया.

मिथुन रास

या संवत्सरात मिथुन राशीच्या लोकांवर शनिदेवाचे विशेष कृपादान राहणार आहे. तुम्हाला मोठं यश मिळण्याची आहे. जे नोकरी बदलण्याचा विचार करत होते त्यांना मोठ्या कंपनीत चांगली संधी मिळू शकते. वडिलांशी संबंध सौहार्दपूर्ण राहणार आहेत. ऑर्डर मिळवून मोठा नफा कमवू शकतात.

धनु रास

धनु राशीच्या लोकांसाठी हा काळ खूप चांगला राहणार आहे. या काळात तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळू शकणार आहे. तुम्हाला काही नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. ज्या भविष्यात खूप फायदेशीर ठरणार आहेत. तुम्ही नवीन लोकांशी संपर्क साधाल जे तुमच्या वाढीस मदत करणार आहेत. कायदेशीर बाबींमध्येही यश मिळण्याची शक्यता आहे.

कुंभ रास

कुंभ राशीच्या लोकांसाठी हे वर्ष खूप खास असणार आहे. हे वर्ष शनीच्या साडेसतीचा शेवटचा टप्पा असेल, त्यामुळे जुनी प्रलंबित कामं पूर्ण होणार आहेत. आर्थिक परिस्थितीत प्रचंड सुधारणा होण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्यांना चांगल्या संधी मिळणार आहेत. कामाच्या ठिकाणी तुमचं कौतुक होणार आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : शरीर संबंधास दिला नकार, तरूणाने होणाऱ्या बायकोवर बलात्कार केला अन् जीव घेतला, पालघरमधील भयानक घटना

Krutika Deo: सुंदरा असावी कशी अप्सरा जशी...; कृतिका देवचा मनमोहक लूक पाहिलात का?

Anant Chaturdashi 2025 live updates : वर्धा जिल्ह्यात भक्तिभावात बाप्पांना निरोप

Maharashtra Live News Update: न्यायालयीन आणि रस्त्यावरील आंदोलनाची तयारी, ओबीसी नेत्याची बैठक संपली

हिंगोलीत अनंत चतुर्दशीचा जल्लोष; चिंतामणी गणपतीच्या दर्शनासाठी लाखो महिला भाविकांची उपस्थिती|VIDEO

SCROLL FOR NEXT