Friday Horoscope Saam tv
राशिभविष्य

Friday Horoscope : विवाह उत्सुकांचे लग्न ठरतील, काहींच्या घरात पाळणा हलणार; 5 राशींच्या लोकांचे अच्छे दिन सुरु

Friday Horoscope in Marathi : आज काही राशींच्या लोकांचे लग्न ठरतील. तर काहींच्या घरात पाळणा हलणार आहे. वाचा शुक्रवारचं राशीभविष्य

Anjali Potdar

आजचे पंचांग

शुक्रवार,२६ सप्टेंबर २०२५,अश्विन शुक्लपक्ष,ललिता पंचमी.

तिथी-चतुर्थी ०९|३४

रास-तुला १५|२४ नं. वृश्चिक

नक्षत्र-विशाखा

योग-विष्कंभ

करण-विष्टीकरण

दिनविशेष- विशाखा वर्ज्य

मेष - रागावर नियंत्रण ठेवणे आज गरजेचे आहे. व्यवसायामध्ये मात्र धडपडीने आणि धाडसाने पुढे जाल. आयुष्यात काही गोष्टी अधिक - उणे असतात. त्या समजून घेऊन संसार करणे आज गरजेचे आहे.

वृषभ - जोडीदाराच्या मानसिकतेची आज काळजी घ्यावी लागेल. नकारात्मक गोष्टींनी भरलेला आजचा दिवस आहे. तब्येतीसाठी पथ्य - पाणी आज पाळणे गरजेचे आहे.दिवस बरा आहे.

मिथुन- उपासनेतून फायदा होईल. गोड बातम्या कानी येतील. संततीकडून समाधानकारक गोष्टी घडतील. विद्यार्थ्यांना दिवस सुखाचा आहे.

कर्क - विशेष अडचणी आजच्या दिवशी नसतील. मनी ठरविल्या गोष्टी घडतील. वाहन सौख्य उत्तम आहे. दिवस आनंदी आहे.

सिंह - प्रेमामध्ये अनेक लाभ होतील. व्यवसायामध्ये वृद्धी होईल. जवळचे प्रवास घडतील. महत्त्वाचे पत्र व्यवहार मार्गी लागतील. दिवस चांगला आहे.

कन्या - आर्थिक क्षेत्रामध्ये धाडस करायला हरकत नाही. कौटुंबिक जीवनामध्ये योग्य तो सुसंवाद साधाल. अडचणींच्या गोष्टीतून मार्ग काढण्यासाठी दिवस चांगला आहे.

तूळ - मी आणि माझे असे काहीसा आजचा दिवस आहे. दुसऱ्याच्या सल्ल्याने जाण्यापेक्षा मनाचा कौल घेऊन पुढे जाल. आरोग्य उत्तम राहील.

वृश्चिक - तब्येतीच्या तक्रारी राहतील. किडनी निगडीत त्रास/ अडचणी होण्याचा आज संभव आहे. मानसिकता सांभाळावी. खरे खोटे करण्याचा नादात किंवा इतरांच्या भानगडीत पडण्यापासून आज लांब राहावे.

धनु - सुन आणि जावई यांच्यावर विशेष प्रीती जडेल. त्यांच्याकडून विशेष आदर मिळाल्यामुळे दिवस सुखाचा जाईल. जवळच्या नातेवाईकांच्या बरोबर प्रवास घडतील.

मकर - सचोटीने काम करणारी आपली रास आहे. सामाजिक क्षेत्रात आघाडीवर रहाल. आर्थिक व्यवहार पूर्णत्वाला जातील. दिवस चांगला आहे.

कुंभ - अनपेक्षित काही घटना आणि सुवार्ता कानी येतील. प्रेमामध्ये यश मिळेल. विवाह उत्सुकांचे विवाह ठरतील. शुभ कारक घटनांचा कालावधी आहे. काळजी नसावी.

मीन - भ्रष्टाचार सारख्या गोष्टी मध्ये अडकण्याचा आज जास्त संभव आहे. अति लोभ हा गोत्यात नेणार आहे हे लक्षात ठेवा. अचानक धनलाभ होईल. दिवस संमिश्र आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PAK vs BAN: बांगलादेश आऊट; फायनलमध्ये रंगणार भारत-पाकिस्तान सामन्याचा थरार

Unrest in Ladakh: लेह-लडाखमध्ये दहशत; भाजप कार्यालय जाळले, Gen-Z आंदोलन का उफाळलं?

MHADA Diwali Bonus: म्हाडा कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस जाहीर! खात्यात किती जमा होणार पैसा?

EPFO सदस्यांसाठी खूशखबर, आता ATMमधून काढा पीफचे पैसे

Maharashtra Politics: शिंदेंच्या बालेकिल्ल्यात रश्मी ठाकरे अॅक्टिव्ह नवरात्रीचं कारण की निवडणुकीची रणनीती?

SCROLL FOR NEXT