June 2025 Grah Gochar Rashifal saam tv
राशिभविष्य

September Grah Gochar: सप्टेंबरमध्ये 4 मोठे ग्रह करणार गोचर, 3 राशींना मिळणार छप्परफाड पैसा

September Grah Gochar 2025: ज्योतिषशास्त्रात प्रत्येक महिन्याचे स्वतःचे असे महत्त्व असते, कारण प्रत्येक महिन्यात ग्रहांचे राचर होते, ज्याचा प्रभाव सर्व १२ राशींवर दिसून येतो. यंदाचा सप्टेंबर महिना ज्योतिषीय दृष्टिकोनातून खूप खास असणार आहे.

Surabhi Jayashree Jagdish

सप्टेंबर २०२५ हा महिना ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा ठरणार आहे. या महिन्यात सूर्य, मंगळ, बुध आणि शुक्र हे चार मोठे ग्रह आपली गती आणि स्थिती बदलणार आहेत. १३ सप्टेंबरला मंगळ तूळ राशीत प्रवेश करणार असून नक्षत्र परिवर्तनही होणार आहे. त्यानंतर १७ सप्टेंबरला सूर्याचे गोचर होईल आणि ते पूर्वाफाल्गुनी, उत्तराफाल्गुनी आणि हस्त नक्षत्रातून प्रवास करतील.

सूर्य आणि बुधाच्या गोचरामुळे शुभ बुधादित्य योग तयार होणार आहे. शुक्रही या काळात दोनदा राशी बदलतील आणि दोनदा नक्षत्र परिवर्तन करतील. या ग्रहस्थितीचा परिणाम सर्व १२ राशींवर होणार असला तरी तीन राशींना याचा जास्तीत जास्त लाभ मिळेल.

या राशींच्या लोकांना करिअर, आर्थिक स्थिती आणि वैयक्तिक आयुष्यात चांगल्या गोष्टी घडणार आहेत. ज्योतिष्य तज्ज्ञांच्या मते, हा काळ त्यांच्यासाठी प्रगती, भाग्यवृद्धी आणि नातेसंबंधांमध्ये सौहार्द आणणारा ठरणार आहे. सप्टेंबर महिना या भाग्यवान राशींसाठी अत्यंत शुभकाळ ठरू शकतो. यामध्ये कोणत्या राशींचा समावेश आहे ते पाहूयात.

मेष रास

सप्टेंबर महिन्यातील ग्रहस्थितीचा सर्वाधिक फायदा मेष राशीच्या लोकांना होणार आहे. आतापर्यंत अडकून पडलेले अनेक कामं या काळात पूर्ण होणार आहे. त्यामुळे आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. कौटुंबिक पाठबळ मिळाल्यामुळे मानसिक तणाव कमी होणार आहे.

मिथुन रास

या महिन्यात मिथुन राशीच्या लोकांच्या जीवनात मोठा बदल घडू शकणार आहे. धनप्राप्ती होणार असून त्यातून भौतिक सुखसोयींमध्ये वाढ होण्याची शक्यता दाट आहे. समाजात मान-सन्मान वाढू शकणार आहे. या काळात घर, दुकान किंवा वाहन खरेदी करण्याची संधी मिळू शकते.

कर्क रास

सप्टेंबरच्या ग्रहस्थितीत कर्क राशीच्या लोकांना चमत्कारिक परिणाम दिसून येणार आहे. या काळात अडकलेला पैसा परत मिळू शकणार आहे. करिअरमध्ये नवे मार्ग खुले होणार आहे. त्याचप्रमाणे वैयक्तिक आयुष्यात आनंदाचे क्षण येणार आहेत.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

रामदास कदमांच्या आरोपांवर उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले? २ वाक्यात विषय संपवला | VIDEO

IND vs WI : नितीश रेड्डी, केएल की यशस्वी.. कुणाचा झेल सर्वोत्कृष्ट? तिन्ही व्हिडिओ पाहून तुम्हीच ठरवा

Blouse Fitting Hacks: फक्त 2 मिनिटात करा ब्लाउज फिटींग; वापरा 'या' ५ सुपर ट्रिक्स

IND vs WI: अहमदाबाद कसोटीत भारताचा मोठा विजय; सिराज-जडेजासमोर विंडीजने नांगी टाकली

Anganwadi Bharti: खुशखबर! अंगणवाडीत सर्वात मोठी भरती; ६९००० पदे भरली जाणार; वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT