Trigrahi Yog 2025: saam tv
राशिभविष्य

Tirgrahi Yog: 50 वर्षांनंतर बनणाऱ्या त्रिग्रही योगामुळे 'या' राशींचे येणार अच्छे दिन; तीन ग्रहांमुळे मिळणार

Tirgrahi Yoga In Leo: एक अत्यंत दुर्मिळ 'त्रिग्रही योग' तब्बल ५० वर्षांनंतर तयार होत आहे. या योगात तीन महत्त्वाचे ग्रह एकाच राशीत एकत्र येत असल्याने काही राशींच्या नशिबाचे दरवाजे उघडणार आहेत.

Surabhi Jayashree Jagdish

ज्योतिष पंचांगानुसार ग्रह ठराविक कालांतराने त्यांच्या राशीत गोचर करतात. यामुळे अनेकदा त्रिग्रही किंवा चतुर्ग्रही योग तयार होतो. या योगांचा प्रभाव माणसांच्या जीवनावर त्याचप्रमाणे देश-विदेशातील घडामोडींवर दिसून येतो.

सप्टेंबर महिन्यात शुक्र, सूर्य आणि केतु या तीन ग्रहांचा संयोग होत असून सिंह राशीत त्रिग्रही योग तयार होणार आहे. या योगामुळे काही राशींचे भाग्य उजळणार आहे. त्या असून त्यांना अचानक आर्थिक लाभ, प्रगतीची संधी आणि अडकलेला पैसा मिळण्याची शक्यता आहे. यावेळी कोणत्या राशींना लाभ मिळेल ते पाहूयात

सिंह रास

सिंह राशीच्या व्यक्तींसाठी हा त्रिग्रही योग लाभदायक ठरणार आहे. कारण हा योग तुमच्या राशीच्या लग्नभावात तयार होणार आहे. या काळात तुम्हाला मान-सन्मान, प्रतिष्ठा आणि समाजात ओळख मिळेल. विद्यार्थ्यांसाठी हा काळ अभ्यासात यश मिळवण्यासाठी आणि नवे कौशल्य शिकण्यासाठी अनुकूल ठरेल.

धनु रास

धनु राशीच्या जातकांसाठी त्रिग्रही योग शुभ फलदायी ठरू शकतो. हा योग तुमच्या राशीच्या भाग्यभावात आणि विदेशभावात तयार होणार आहे. नोकरी करणाऱ्यांना आपली प्रतिभा दाखवण्याची आणि नवी जबाबदारी मिळवण्याची संधी मिळू शकते. धार्मिक आणि सामाजिक कार्यात रस वाढणार आहे.

वृश्चिक रास

वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी हा त्रिग्रही योग करिअर आणि व्यवसायाच्या दृष्टीने अत्यंत अनुकूल ठरू शकणार आहे. या काळात नवे मित्र मिळतील आणि समाजात तुमचे नेटवर्क वाढणार आहे. नोकरी करणाऱ्यांना पगारवाढ आणि बढतीची संधी मिळणार आहे. नोकरी करणाऱ्यांना इच्छित ठिकाणी बदली होण्याची शक्यता आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कल्याणमध्ये धक्का लागण्याच्या वादातून ओला चालकाला बेदम मारहाण

Indurikar Maharaj : साखरपुड्यापेक्षा मुलीचं लग्न टोलेजंग करणार;ट्रोलिंगनंतर इंदुरीकर महाराज भडकले,VIDEO

Bus Fire : क्षणात सर्व काही घडलं, पिंपरी-चिंचवडमध्ये PMPML बस आगीच्या भक्ष्यस्थानी; राज्यात दिवसभरातील तिसरी घटना

CNG Crisis: मुंबईसह उपनगरात सीएनजी तुटवडा, पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा

Chhattisgarh : सुरक्षा दलाची मोठी कारवाई; 5 लाखांचं बक्षीस असलेल्या ३ नक्षलवाद्यांचा खात्मा

SCROLL FOR NEXT