Shukra Gochar saam tv
राशिभविष्य

Shukra Gochar: शुक्राच्या गोचरमुळे ३ राशींच्या अडचणी वाढणार; आर्थिक नुकसान आणि दुःख येणार नशीबी

Venus transit unlucky zodiac signs : शनी आणि सूर्याच्या नक्षत्रानंतर आता शुक्र ग्रहाचा हा राशी बदल काही राशींच्या अडचणी वाढवू शकतो. या काळात काही राशींच्या लोकांना आर्थिक नुकसान, मानसिक त्रास आणि नात्यांमध्ये समस्यांचा सामना करावा लागू शकतो.

Surabhi Jayashree Jagdish

प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यावेळी ग्रहांच्या गोचरचा परिणाम सर्व राशींच्या जीवनावर होत असतो. यावेळी हा परिणाम सकारात्मक किंवा नकारात्मक असू शकतो. ज्योतिषशास्त्रात शुक्र ग्रहाला प्रेम, ऐशोआराम, संपत्ती आणि भौतिक सुखसोयींचा कारक मानण्यात आलं आहे.

यामध्ये शुक्र राशी बदलतो तेव्हा त्याचा परिणाम सर्व 12 राशींवर होतो. 29 जून 2025 रोजी म्हणजे काल शुक्र ग्रहाने मेष सोडून आपल्या नैसर्गिक राशी वृषभ राशीत प्रवेश केला आहे. मात्र शुक्राचं हे गोचर राशींसाठी शुभ तर काहींसाठी आव्हानात्मक ठरू शकणार आहे. या 3 राशीच्या लोकांना या गोचरवेळी विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. यामध्ये कोणत्या राशींना सावध राहावं लागणार ते पाहूयात.

मिथुन रास

ज्योतिषशास्त्रानुसार शुक्र ग्रह मिथुन राशीतून बाराव्या भावात भ्रमण करणार आहे. ज्यामुळे नुकसान होणार आहे. समंजसपणे गुंतवणूक करा आणि अनोळखी किंवा अधिक विश्वास ठेवणार् या लोकांपासून दूर राहा. तुमचं मानसिक आणि शारीरिक आरोग्यही बिघडू शकणार आहे. या काळात तुम्हाला अधिक सावध गिरी बाळगण्याची गरज आहे.

तूळ रास

शुक्राचं तुळ राशीतून होणारं गोचर आठव्या भावात होणार आहे. या दरम्यान तुमच्या कामाच्या ठिकाणी अचानक काही नकारात्मक परिस्थिती उद्भवू शकणार आहे. नोकरीच्या शोधात असाल तर यशासाठी अधिक मेहनत घ्यावी लागू शकते. कर्ज देणं किंवा कर्ज घेणं योग्य ठरणार नाही. तुमचे पैसे अडकण्याची शक्यता जास्त आहे.

मकर रास

शुक्र मकर राशीतून पाचव्या भावात भ्रमण करणार आहे. या काळात तुमचा आळस वाढू शकतो. तुम्ही तुमच्या कामात हलगर्जीपणा दिसू शकतो. नशिबावर अवलंबून राहणं योग्य ठरणार नाही. कारण यश मिळवण्यासाठी कठोर परिश्रम आवश्यक आहेत. अचानक पैशांचे नुकसान होण्याची ही शक्यता आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Alibag Fishing Boat Capsizes: समुद्रात मच्छीमार बोट बुडाली; 5 खलाशांनी 9 तास पोहून गाठला किनारा, 3 जण बेपत्ता

Amravati Accident: चिखलदरा पर्यटन स्थळावर मोठा अपघात; ६०० फूट खोल दरीत कोसळली कार

Mahayuti Phone Taping: महायुतीच्या मंत्र्यांचेच फोन टॅप? रोहित पवारांच्या दाव्याने खळबळ

UPI Payment: फुकट UPI व्यवहार बंद होणार? प्रत्येक व्यवहारावर पैसे मोजावे लागणार?

PM Kisan: कधी मिळणार PM किसानचा हप्ता? 20 व्या हप्त्याची प्रतिक्षा कायम, कोणाला नाही मिळणार पैसा?

SCROLL FOR NEXT