Shukraditya Rajyog saam tv
राशिभविष्य

Shukraditya Rajyog : शुक्रादित्य राजयोगामुळे 'या' ४ राशींवर राहणार लक्ष्मीची कृपा; प्रत्येक कामात मिळणार यश, पैसाही मिळणार

आता शुक्र आपल्या उच्च राशी असलेल्या मीनमध्ये वास्तव्य करत आहे आणि ३१ मेपर्यंत तिथेच राहील. स्वाभिमानाचं प्रतीक असलेला सूर्य १४ मार्चपासून मीन राशीत आहे. तो १४ एप्रिलला आपल्या उच्च राशी मेषमध्ये दाखल होणार आहे.

Surabhi Jayashree Jagdish

प्रत्येक ग्रह एका विशिष्ट कालावधीनंतर एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो. या काळात, एका राशीत दोन किंवा अधिक ग्रहांच्या येण्याने युती, मिलन आणि राजयोग निर्माण होतो. या क्रमाने, मीन राशीत ग्रहांचा राजा सूर्य आणि राक्षसांचा गुरु शुक्र यांची युती होणार आहे. या युतीमुळे शुक्रादित्य राजयोग निर्माण होणार आहे.

ज्योतिषशास्त्रात शुक्र ग्रह प्रेम, विलास आणि आनंदाचा कारक मानला जातो. सध्या शुक्र त्याच्या उच्च राशी मीनमध्ये आहे आणि ३१ मे पर्यंत या राशीमध्ये राहणार आहे. स्वाभिमानाचा कारक सूर्य १४ मार्चपासून मीन राशीत आहे. १४ एप्रिल रोजी त्याच्या उच्च राशी मेष राशीत प्रवेश करणार आहे. मीन राशीत शुक्र आणि सूर्याच्या युतीमुळे शुक्रादित्य राजयोग निर्माण झाला आहे.

मीन रास

तुमच्या राशीत शुक्र-सूर्य युती आणि राजयोगाची निर्मिती फायदेशीर ठरणार आहे. आत्मविश्वास वाढणार आहे. बऱ्याच काळापासून रखडलेलं आणि प्रलंबित असलेलं काम पूर्ण होणार आहे. नशिबाची चांगली साथ मिळणार आहे. अविवाहित लोकांसाठी लग्नाचे प्रस्ताव येणार आहेत.

मकर रास

सूर्य आणि शुक्र यांची युती आणि शुक्रादित्य राजयोग राशीच्या लोकांसाठी अनुकूल ठरू शकणार आहे. अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. नवीन योजनांसाठी हा काळ अनुकूल राहणार आहे. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नतीसह पगारवाढीचा लाभ मिळू शकतो.

तूळ रास

राजयोग आणि सूर्य आणि शुक्र यांची युती राशीच्या लोकांसाठी शुभ ठरू शकणार आहे. प्रत्येक क्षेत्रात यश मिळू शकणार आहे. तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळू शकणार आहे. मालमत्तेशी संबंधित व्यवहारातून तुम्हाला फायदा होणार आहे. तुमच्या जोडीदारासोबत असलेल्या समस्या संपुष्टात येऊ शकतात.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

निवडणुकीच्या तोंडावर भाजपची मोठी कारवाई; ४ बड्या नेत्यांची पक्षातून हकालपट्टी

Maharashtra Live News Update: शिरोळच्या आमदारांच्या घोडावत खांडसरीवर शेतकऱ्यांचे आंदोलन

दिवाळीत लेकरांना कपडे घ्यायला पैसे नव्हते; नैराश्यग्रस्त शेतकरी बापाने आयुष्य संपवलं, पाहा काळीज पिळवटून टाकणारा VIDEO

'माझे प्रायव्हेट व्हिडिओ..' गर्लफ्रेंडकडून UPSCच्या विद्यार्थ्याची हत्या; Ex-बॉयफ्रेंड सिलिंडरवाल्याची मदत घेऊन काटा काढला

विवाहातील समस्या दूर करण्यासाठी तुळशीच्या लग्नाला करा 'हे' ५ सोपे उपाय, त्वरित होईल विवाह

SCROLL FOR NEXT