Budh gochar saam tv
राशिभविष्य

Budh Gochar: मे महिन्यात बुध ग्रहाचं डबल गोचर; 'या' राशींचा सुरु होणार सुवर्णकाळ, मान-सन्मानात होणार वाढ

Budh Gochar In May 2025: मे महिना ग्रहांच्या गोचरसाठी महत्त्वाचा मानला जाणार आहे. या महिन्यात बुध ग्रह दोन वेळा त्याच्या राशीमध्ये बदल करणार आहे.

Surabhi Jayashree Jagdish

ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यावेळी काही ग्रह एका महिन्यात दोन वेळा त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. व्यवसाय देणारा बुध चंद्रानंतर सर्वात वेगाने गोचर करणारा ग्रह आहे. येत्या मे महिन्यात ग्रहांचा राजकुमार बुध दोनदा भ्रमण करणार आहे

कधी करणार बुध ग्रह गोचर?

बुध ग्रह ७ मे रोजी प्रथम मेष राशीत प्रवेश करणार आहे. तर २३ मे रोजी बुध वृषभ राशीत गोचर करणार आहे. बुध मे महिन्यात दोनदा आपली राशी बदलणार आहे. ज्यामुळे काही राशींचं भाग्य उजळू शकणार आहे. यावेळी काही राशींना या काळात चांगले पैसे मिळू शकणार आहेत. तर काही राशींच्या आयुष्यात सुखाचे भरपूर क्षण येणार आहेत. यामध्ये कोणत्या राशींचा समावेश आहे ते पाहूयात.

मेष रास

बुध ग्रहाचं गोचर तुमच्यासाठी सकारात्मक ठरू शकणार आहे. या काळात तुमचं व्यक्तिमत्व सुधारणार आहे. तुम्ही काम आणि व्यवसायाशी संबंधित काही योग्य निर्णय घेऊ शकता. तुमचं मनोबल वाढणार आहे. इतर व्यवसायातही गुंतवणूक करू शकता. या काळात नोकरी करणाऱ्या लोकांना पदोन्नती मिळू शकणार आहे.

कर्क रास

मे महिन्यात बुध ग्रह दोनदा राशी परिवर्तन करणार असल्याने या लोकांसाठी फायदा होऊ शकतो. तुम्हाला काम आणि व्यवसायात चांगले यश मिळू शकणार आहे. यावेळी तुमचं उत्पन्न वाढू शकतं. त्या बेरोजगारांना नोकऱ्या मिळू शकतात. व्यावसायिकांना चांगला नफा मिळू शकतो. व्यावसायिकांसाठीही हा काळ चांगला राहणार आहे.

सिंह रास

बुध ग्रहाच्या राशीत दोन वेळा होणारा बदल अनुकूल ठरू शकणार आहे. या काळात तुमचं नशीब चमकू शकणार आहे. नोकरदार लोकांना या काळात पदोन्नती मिळू शकते. व्यावसायिकांना यावेळी चांगल्या ऑर्डर मिळू शकतात. ज्यामुळे आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

EPF Transfer Rules: नोकरी बदलल्यानंतर PF होणार ऑटोमॅटिक ट्रान्सफर; सिंपल प्रोसेस वाचा

Mumbai : धार्मिक विधीच्या नावाने हॉटेलमध्ये नेलं अन् बलात्कार केला, व्हिडिओ काढून सुरू केला ब्लॅकमेलिंगचा खेळ

Maharashtra Live News Update: नवले ब्रीज अपघात प्रकरणी गुन्हा दाखल, तिघांवर गुन्हा दाखल

Bihar Election Result: सुरुवातीचे कल एनडीएच्या बाजूने, बहुमताचा जादुई आकडा ओलांडला, कुणाला किती जागांवर आघाडी?

Bihar Election Result Live Updates: भाजप सर्वात मोठा पक्ष, कोण किती जागांवर आघाडीवर?

SCROLL FOR NEXT