Horoscope Today 6th August 2024 Saam TV
राशिभविष्य

Rashi Bhavishya : आजचे राशीभविष्य, मेष राशीच्या लोकांची होणार प्रगती, तर कर्क राशीला धनलाभ शक्यता; तुमची रास?

Horoscope Today 6th August 2024 : दैनिक राशीभविष्य, आज सोमवार, मेष राशीच्या लोकांची होणार प्रगती, तर कर्क राशीला धनलाभ शक्यता

Anjali Potdar

आजचे पंचांग - मंगळवार ६ ऑगस्ट २०२४

श्रावण शुक्लपक्ष, मंगळागौरी पूजन. तिथी-द्वितीया १९|५३. रास - सिंह. नक्षत्र - मघा. योग - वरीया. करण - बाल. दिनविशेष - चांगला दिवस.

मेष : आज प्रगतीचे योग

कलाक्षेत्रामध्ये सुसंधी लाभेल. मुला-मुलींचे प्रश्न मार्गी लागतील. ज्या गोष्टी कराल त्यामध्ये आज प्रगतीचे योग आहेत.

वृषभ : दिवस चांगला राहील

राहत्या जागेचे प्रश्न मार्गी लागतील. नवीन प्रॉपर्टीचे प्रस्ताव येतील. त्याचे तुम्ही सहजगत्या स्वागत कराल. दिवस चांगला राहील.

मिथुन : जिद्द आणि चिकाटी वाढेल

नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. एकत्रितरित्या काम करणं योग्य ठरेल. सामाजिक क्षेत्रामध्ये प्रगती होईल. जिद्द आणि चिकाटी वाढेल.

कर्क : अचानक धनलाभाची शक्यता

काहींना अचानक धनलाभाची शक्यता आहे. जुनी येणी वसूल होतील. पैशांची आवक चांगली राहील.

सिंह : आज यश मिळेल

मानसिक स्वास्थ आणि समाधान लाभेल आरोग्य उत्तम राहील. कराल त्या गोष्टीत आपल्याला आज यश मिळेल.

कन्या : प्रवास शक्यतो टाळावेत

आपल्या वस्तू जपा. वस्तू गहाळ होणार नाही याची काळजी घ्यावी. प्रवासामध्ये त्रासाची शक्यता आहे. खर्च अनावर होतील. प्रवास शक्यतो टाळावेत.

तूळ : कामे मार्गावर येतील

मित्र-मैत्रिणींचा सहवास लाभेल. जुनी रखडलेली कामे मार्गावर येतील. काही महत्त्वाचे पत्र व्यवहार अडकले असतील तर ते आज होतील. दिवस चांगला जाईल.

वृश्चिक : नवीन परिचय होतील

तुमचं कार्यक्षेत्रात फोफावणार आहे. काही नवीन परिचय होतील. जे तुमचा व्यवसायिक कामासाठी महत्त्वाचे ठरतील.

धनु : भाग्यकारक घटना घडेल

गुरुकृपा लाभेल एखादी भाग्यकारक घटना घडेल .आध्यात्मिक प्रगतीचे दृष्टीने दिवस चांगला आहे. तीर्थयात्रेचे बेत अखाल .

मकर : कष्ट आणि धावपळ होईल

कोणाचेही सहकार्याची आज अपेक्षा करू नका. दैनंदिन /ठरवलेली होणार नाहीत. कामे रखडण्याची शक्यता आहे. शारीरिक कष्ट आणि धावपळ होईल.

कुंभ : नवीन गोष्टी घडतील

जोडीदाराची योग्य साथ लाभेल .भागीदारीमध्ये नवीन गोष्टी घडतील. सुयश लाभेल. व्यवसाय वृद्धिंगत होईल.

मीन : पैसा वाया जाण्याची शक्यता

आपला आज मनोरंजनाकडे कल राहील. पैसा वाया जाण्याची शक्यता आहे. उपासनेला महत्त्व द्या आणि पुढे चला. शेअर्स मध्ये प्रगती होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Aare Ware Beach : पावसाळ्यात 'आरे-वारे' बीचचं सौंदर्य फॉरेनपेक्षा कमी नाही

Maharashtra Live News Update: उपमुख्यमंत्री अजित पवार अहिल्यानगरमध्ये दाखल

Pune Rave Party: आधी हॉटेलची रेकी, नंतर आखला एकनाथ खडसेंच्या जावयाला अडकविण्याचा डाव; खेवलकरांच्या वकिलांचा धक्कादायक खुलासा

Beed Shocking : बीडमध्ये आणखी एक वैष्णवी जीवाला मुकली, सासरच्या छळाला कंटाळून २० वर्षीय विवाहितेने आयुष्य संपवलं

Rave Vs Party : पार्टी आणि रेव्हमध्ये काय फरक आहे?

SCROLL FOR NEXT