Horoscope Today 30th August 2024 Saam TV
राशिभविष्य

Rashi Bhavishya : सूर्याचा पूर्वा नक्षत्रप्रवेश, कुंभसह 5 राशीच्या लोकांना येणार अच्छे दिन; वाचा राशीभविष्य

Horoscope Today 30 August 2024 : आज बुधवार ३० ऑगस्ट २०२४ श्रावण कृष्णपक्ष. तिथी-दशमीचे राशीभविष्य जाणून घ्या...

Anjali Potdar

आजचे पंचांग - शुक्रवार ३० ऑगस्ट २०२४ श्रावण कृष्णपक्ष. तिथी - द्वादशी २६|२६. रास-मिथुन. ११|३४ नं. कर्क. नक्षत्र-पुनर्वसु. योग-व्यतीपात. करण-कौलव दिनविशेष-१८ नं. चांगला.

मेष - छोटे प्रवास घडण्याचा आज योग आहे. भावंडांचे सहकार्य लाभेल. मनासारख्या गोष्टी घडतील. दिवस सुखाचा राहील.

वृषभ - जोडीदाराच्या तब्येतीची आज काळजी घ्यावी. कदाचित त्यासाठी पैसा खर्च करावा लागेल. पैशाचे व्यवधान ठेवावे. गुंतवणूक करणार असाल तर सजगपणे करा.

मिथुन - कासवाच्या गतीने का होईना प्रगतीकडे आपली वाटचाल आहे. त्यामुळे मनाला उभारी आहे चांगल्या गोष्टी करण्यासाठी हिरीरीने सहभाग घ्याल. आपले वलय आज वाढणार आहे.

कर्क - प्रेमामध्ये अपयश येण्याचा आजचा दिवस आहे. ठरवून केलेल्या गोष्टीत अगदीच अडथळे येतील. त्यापेक्षा जे होईल ते पाहणे आज हेच हाती आहे. मनस्ताप टाळा.

सिंह - जुन्या मित्रांच्या भेटी होतील. इतरांसाठी काहीतरी करावे अशी भावना होईल. मित्रांमध्ये येणाऱ्या अडचणींचा सामना करण्यासाठी तुम्ही पुढाकार घ्याल. अगदी तेल लावलेला मल्ल असतात अशी आपली प्रतिमा होईल.

कन्या - कामासाठी प्रवास घडण्याचा दिवस आहे. एकूण व्यस्तता राहणार आहे सहकाऱ्यांची साथ योग्य आणि उत्तम राहील.

तूळ - द्रुतगती मार्गावर प्रवास घडतील. जीवनाचा वेग वाढेल. तेच आज आवडून जाईल. लांबच्या प्रवासाचा योग आहे. तीर्थक्षेत्री दर्शन घडेल.

वृश्चिक - संततीच्या तब्येतीची काळजी घ्यावी. कदाचित त्यासाठी पैसा खर्च करावा लागेल. मनस्थिती तोळा मासा राहील. त्याला उभारी आणा.

धनु - व्यवसायातील भागीदाराकडून फायद्याचे योग आहेत. दोघं मिळून एकत्रित रित्या धंदा वाढीसाठी प्रयत्न कराल.आर्थिक दृष्ट्या सक्षम व्हाल .

मकर - मामा किंवा अजोळचे लोक भेटण्याचा आज योग आहे. त्यामध्ये सुखद जाणीव होईल. आपल्या वस्तूंची विशेषतः काळजी घ्यावी.

कुंभ - प्रयत्नांना आज पर्याय राहणार नाही जितके कराल तेवढे यश पदरात नक्कीच पडणार आहे. रेस, लॉटरी यामध्ये फायदा होईल. कलेमध्ये दिवस व्यस्त राहील.

मीन - छोटा घरगुती समारंभ तुमच्या घरी पार पडेल. नातेवाईकांबरोबर दिवस आनंदाचा जाईल. आईची विशेष काळजी घ्यावी.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi vs Hindi Clash: परप्रांतीय व्यापारी मराठीच्या विरोधात मोर्चा; परप्रांतीयांमध्ये हिंमत येते कुठून?

Shocking : तरुणीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये प्लास्टिक बॉटल अडकली; क्षणिक सुखासाठी नको ते करुन बसली, डॉक्टरही चक्रावले

५ जुलैला महाविनाश? नवीन बाबा वेंगाच्या भविष्यवाणीचा धसका, महाप्रलयाला एक दिवस बाकी?

Operation Sindoor: पाक आणि चीनची डोकेदुखी वाढणार,अपाचे हेलिकॉप्टर, ठरणार शत्रूचा कर्दनकाळ, अमेरिका भारताला देणार 'AH-64E हेलिकॉप्टर'

सरकार देणार तुम्हाला मोफत फ्लॅट? अर्ज करण्यासाठी सरकारची नवी वेबसाईट? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT