Daily Horoscope Today Marathi  Saam TV
राशिभविष्य

Horoscope Today: कसा असेल रविवारचा दिवस, कोणत्या राशींची आर्थिक अडचण होणार दूर? जाणून घ्या

Horoscope Today: कोणत्या राशींना आर्थिक अडचणी येणार कोणत्या राशींच्या जीवनात तणाव असणार हे जाणून घ्या आजच्या राशीभविष्यातून.

Anjali Potdar

मेष -

आज उपासनेसाठी दिवस चांगला आहे. एकादशीसाठी विशेष विष्णू उपासना फलदायी ठरेल. मनासारख्या गोष्टी घडतील. पैशाची गुंतवणूक फायदेशीर ठरेल.

वृषभ-

प्रॉपर्टीशी निगडित व्यवहार पार पडतील. शेतीवाडी मध्ये विशेष रस निर्माण होईल. घरातील गोष्टींमध्ये तडजोड करावी लागेल. मनस्वास्थ्य बरे राहील.

मिथुन-

छोट्या प्रवासाच्या दृष्टीने दिवस चांगला आहे. रेंगाळत राहिलेले पत्र व्यवहार मार्गी लागतील. दळणवळणांमधून व्यवसायाच्या नवीन संधी प्राप्त होतील.

कर्क

जोडीदाराच्या तब्येतीची विशेष काळजी घ्यावी लागेल. कुटुंबीयांचा सल्ला आज महत्त्वाचा ठरेल. "एकमेकां सहाय्य करू अवघे धरू सुपंथ" हे लक्षात घ्या आणि पुढे चला.

सिंह

तुमच्यामधील कणखरपणा आज अजून वाढेल. आत्मविश्वासाने आयुष्यातील नव्या गोष्टी पादाक्रांत कराल. दिवाळीच्या उंबरठ्यावर काही नवे संकल्प करून त्या दृष्टीने पावले उचलाल.

कन्या-

इतरांकडे लक्ष न देता आपण आपला कार्यभाग साधणे हे जास्त बरे राहील. मनस्ताप वाढवून घेतल्यास तो वाढेलच. खर्च अटळ आहेत पण हिशोबही ठेवावा लागेल हे लक्षात घ्या.

तूळ -

यशाच्या नवीन वाटा आज चोखाळाल. केलेल्या गोष्टींचे लाभच पदरात पडतील. नातेवाईकांमध्ये आपला आज वेगळाच मान आणि दर्जा असेल. दिवस सुखाचा जाईल.

वृश्चिक-

"थेंबे थेंबे तळे साचे" असा आजचा दिवस आहे. मुंगीच्या पावलाने का होईना कामाचे यश मिळेल. खंबीरपणे करिअर विषयी निर्णय घ्या. सहकाऱ्यांच्या सहकार्य बरोबर घेऊन गेल्यास जास्त बरे राहील.

धनु -

सद्गुरूंची विशेष कृपा आज आपल्यावर राहणार आहे. मोठे प्रवास घडतील. उपासनेच्या दृष्टीने दिवस चांगला आहे.

मकर-

काळ्या धनापासून विशेष काळजी घ्यावी. दिवस कटकटीचा राहील. आपले शारीरिक आणि मानसिक अवस्था जपावे लागेल. समोरच्या व्यक्तीशी दोन हात करताना नाकी नऊ येतील.

कुंभ -

व्यवसायाचा नवीन टप्पा येईल.जुन्या गोष्टी नव्याने करून घ्याल. कामाच्या ठिकाणी योग्य परिणाम संभवत आहेत . प्रगतीचे नवीन आयाम गाठाल.

मीन -

पोटाच्या तक्रारी, मानसिक आजार आज डोके वर काढतील. कोणत्याही परिस्थितीत निर्णय घेताना आज संभ्रमित अवस्था टाळावी लागेल. दिवस संमिश्र स्वरूपाचा आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: भाजपा - शिंदेंच्या शिवसेनेत उमेदवारीवरून तणाव

Diwali Faral Recipe : फक्त १० मिनिटांत करा ज्वारीच्या पिठाची कुरकुरीत चकली

Amravati Assembly Election : अमरावतीमध्ये राजकीय खळबळ, दिल्लीवारी केल्यानंतर दोन आमदारांना पुन्हा तिकीट नाही?

Diljit Dosanjh : दिलजितच्या कन्सर्ट तिकिटांचा काळाबाजार; मुंबई, दिल्लीत ईडीची धाड

Viral Video: कुठे हरवली माणुसकी? अल्पवयीन मुलीने उडी घेतली, तडफडत जीव सोडला, पण तो फोनवर बोलण्यात व्यस्त!

SCROLL FOR NEXT