Horoscope Today in Marathi  Saam tv
राशिभविष्य

Horoscope Today : 'परिस्थितीशी दोन हात करा' सांगणारा दिवस; वाचा तुमचे आजचे राशीभविष्य एका क्लिकवर

Rashi bhavishya in Marathi : आज काही राशीच्या लोकांना साध्या स्वभावाचा तोटा होण्याची शक्यता आहे. तर काही राशीच्या लोकांची उद्या धावपळ होईल.

Anjali Potdar

आजचे पंचांग

बुधवार,२३ ऑक्टोबर २०२४, अश्विन कृष्णपक्ष.

तिथी-सप्तमी २५|१९

रास-मिथुन २४|०२ नं. कर्क

नक्षत्र- पुनर्वसु

योग-शिवयोग ०६|५९

सिध्दियोग २९|५२

करण- विष्टिकरण

दिनविशेष-१३ नं. चांगला

मेष - नेहमीची धावपळ आपल्या राशीला कायमच आहे. पण यावेळी आनंददायी धावपळ आणि मोठ्या प्रवास ऐवजी छोटे प्रवास होण्याचा दिवस आहे. आपली रास आपण ठरवलेल्या गोष्टी नेहमीच करते. काही जबाबदाऱ्या आज अंगावर उचलून घ्याल आणि त्या पूर्ण पाडाल.

वृषभ- रसिक अशी असणारी आपली रास खाण्यापिण्याच्या बाबतीत पण तेवढीच चोखंदळ आहे. आज अशाच काही गोष्टी खाण्याच्या बाबतीत कराल. पदार्थात विशेष रुची वाढेल आणि ती पूर्ण मिळविण्याचा आज प्रयत्न कराल.

मिथुन- "केल्याने होत आहे रे "असा आजचा दिवस आहे. नुसते बोलून दिवस किंवा गोष्टी घडत नाहीत तर त्यासाठी प्रयत्न गरजेचे आहेत. आज आपल्याकडून विशेष प्रयत्न घडतील आणि ठरवलेल्या गोष्टी योग्य मार्गावर होतील.

कर्क- साध्या सरळ स्वभावाचा अनेक वेळा तोटा आपल्याला सहन करावा लागतो. अधिक प्रेम केल्यामुळे मनस्ता प सुद्धा वाटण्यात येतो. आज असाच दिवस आहे विनाकारण कष्ट, मेहनत,खर्च, कटकटी, मनस्ताप या गोष्टींचा आलेख उंचावणार आहे.

सिंह - आपला तोरा दरवेळी मिरवायला तुम्हाला आवडतेच. पण असा तोरा आणि हा थाट आज आपला मित्र-मैत्रिणींच्या मध्ये असणार आहे. काहीतरी वेगळ्या गोष्टी घडतील ज्यामुळे तुमचं कौतुक वाढेल.

कन्या- बौद्धिक गोष्टींना तुमच्या एक वेगळे वलय प्राप्त होणार आहे. वरिष्ठ आणि कनिष्ठ दोघांकडून आपल्याला कामाची सहमती मिळणार आहे. प्रवास घडतील. दिवस चांगला राहील.

तूळ - शुक्र ग्रहाच्या अमलाखाली असणारी आपली रास आहे. काही वेळेला टोकाच्या गोष्टी होतात. ऐहिक सुखाच्या आहारी जाते आणि अति देव धर्माच्या सुद्धा मागे लागता. आज अध्यात्माकडे कल राहण्याचा दिवस आहे. मोक्षप्राप्तीसाठी विशेष धडपड कराल.

वृश्चिक- कोणाला न घाबरताना खंबीर त्याने पुढे जाणारी आपली रास आहे. अनेक गोष्टी एकट्याने लिलया करण्याचे कसब आज आपल्याकडे येणार आहे. "परिस्थितीशी दोन हात करा" असे सांगणारा आजचा दिवस आहे.

धनु -:दोलायमान परिस्थिती आणि कामामध्ये असणे या दोन्ही गोष्टी आज राहणार आहेत. तरीसुद्धा योग्य त्या निर्णयाने परिस्थितीवर मात कराल आणि पुढे जाल. महत्त्वाच्या गोष्टीचे आपल्या बाजूने निर्णय होतील.

मकर - शारीरिक कष्ट आणि कटकटी आज वाढणार आहेत. तब्येतीच्या तक्रारी घेऊन आजचा दिवस आलेला आहे. आपला हुरूप आणि उमेद शाबूत ठेवावा लागेल.

कुंभ - आपल्यासारखे सर्वांनी हुशार असावे असे तुम्हाला वाटते. तसेच मार्गदर्शन इतरांना कराल. संततीला आपले सल्ले पाटतील. त्यांच्यामध्ये अनुकूल ते बदल घडतील. काही गोष्टींचे श्रेय आपल्याला दिले गेल्यामुळे स्वखुश असाल.

मीन - मनाने चांगले असण्याचे अनेक फायदे आहेत.जर आपल्याला फायदे झाले अनेक तोटेही झाले आहेत. आज काही गोष्टी कुटुंबीयांसाठी कराल यामध्ये इतरांना काय वाटते यापेक्षा स्वतःला काय वाटते यावर वजन द्याल आणि कामे कराल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Assembly constituencies : पुण्यातील वाडेश्वर कट्ट्यावर सर्वच पक्षाचे शहराध्यक्ष एकत्र; कोणत्या मुद्द्यावर रंगली चर्चा?

Success Story: वडिलांकडून कर्ज... लहान खोलीत बिझनेसला सुरुवात, दोन बहिणींनी ३५०० कोटींचं साम्राज्य उभारले!

Maharashtra Election : एकनाथ शिंदे बालबुद्धी, निवडणुकीनंतर ते मुख्यमंत्री नसतील - संजय राऊत

Akkalkuwa Vidhan Sabha : हिना गावित अक्कलकुवा मतदारसंघातून इच्छुक; उमेदवारीसाठी आज घेणार देवेंद्र फडणवीसांची भेट

Bigg Boss फेम अभिनेता आहे दाक्षिणात्य अभिनेत्रीच्या प्रेमात, म्हणाला ती माझी क्रश...

SCROLL FOR NEXT