Akkalkuwa Vidhan Sabha : हिना गावित अक्कलकुवा मतदारसंघातून इच्छुक; उमेदवारीसाठी आज घेणार देवेंद्र फडणवीसांची भेट

Nandurbar News : लोकसभा निवडणुकीमध्ये पराभुत झालेल्या डॉ. हिना गावित पक्षाने संधी दिल्यास अक्कलकुवा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचे बोलले जात आहे.
Nandurbar News
Nandurbar NewsSaam tv
Published On

सागर निकवाडे 

नंदुरबार : नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या माजी खासदार डॉ. हिना गावित या अक्कलकुवा विधानसभा क्षेत्रातून निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. त्यानुसार हिना गावित या आज अक्कलकुवा मतदारसंघाच्या अनुषंगाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांची भेट घेणार आहे. 

लोकसभा निवडणुकीमध्ये पराभुत झालेल्या डॉ. हिना गावित (Heena Gavit) पक्षाने संधी दिल्यास अक्कलकुवा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचे बोलले जात आहे. यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून त्यांनी या मतदारसंघातील गावागावत दौरे करत कार्यकर्त्यांसोबत संपर्क वाढवला आहे. भाजप आणि (Shiv Sena) शिवसेनेने जाहीर केलेल्या उमेदवारांच्या यादीत राज्यातल्या या पहिल्या मतदारसंघातील उमेदवार जाहीर होवू शकलेला नाही. हि जागा शिवसेना शिंदे गटाला सुटणार असल्याची चर्चा आहे. मात्र भाजपाने ही जागा स्वतः लढवावी यासाठी कार्यकर्त्यांचा आग्रह असून डॉ. हिना गावितांची आजची फडवणीस भेट याच अनुषंगातून असल्याचे बोलले जात आहे. 

Nandurbar News
Maharashtra Politics: शिंदेंकडून सामंतांना तिकीट, भाजपमधून बंडखोरी, माजी आमदार आज मशाल हाती घेणार!

दरम्यान डॉ. हिना गावित या कालपासून मुंबईत दाखल झाल्या आहेत. कॉग्रेसचे मात्तबर नेते माजी मंत्री अँड के. सी. पाडवी यांचा हा मतदारसंघ असल्याने याठिकाणी त्यांना शह देण्यासाठीच डॉ. हिना गावित उत्तम पर्याय असल्याच्या चर्चा रंगत आहे. मात्र शिंदे गट या मतदारसंघासाठी आग्रही असून शिवसेनेतही तब्बल तीन इच्छुकांमध्ये रस्सीखेच असल्याने आजच्या फडवणीस भेटीनंतर नेमक राज्यातल्या पहिल्या क्रमांकाच्या मतदारसंघाबाबत काय होत याकडे सर्वांच्या नजरा लागून आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com