Horoscope Today 23th May 2024 Saam TV
राशिभविष्य

Horoscope Today : संधीचे सोने कराल, 'या' राशींना मिळेल यशाचा तुरा; वाचा आजचे राशिभविष्य

Rashi Bhavishya Today 23 May 2024 : आजचे राशिभविष्य, २३ मे २०२४ : संधीचे सोने कराल, या राशींना मिळेल यशाचा तुरा; वाचा आजचे राशिभविष्य

Anjali Potdar

आजचे पंचाग २३ मे २०२४

वार - गुरुवार. तिथी - पौर्णिमा. नक्षत्र - विशाखा. योग - परिघ. करण - विष्टि. रास - वृश्चिक. बुद्ध पौर्णिमा. दिनविशेष - ९ नंतर चांगला.

मेष : सावधगिरीने पावले उचला

संकटाची मालिका चालूच राहते असं खूपदा वाटतंय. उगाचच कारण नसताना एका मग एक तक्रारी सुरू राहतील. त्यातीलच आजचा हा दिवस. म्हणून खूप सावधगिरीने पावले उचला.

वृषभ : कामाची दगदग राहील

"जिवलगा कधी रे येशील तू" अशी ओढ एकमेकांना वाटेल. कामाच्या कचाट्यामध्ये पुरेसा वेळ देता येत नाही म्हणून घालमेल राहील. पण यामध्ये सुद्धा वेगळा आनंद आहे आणि तो तुम्हाला जाणवेल.

मिथुन : तब्येतीकडे विशेष लक्ष द्या

पोटाच्या तक्रारी सतावतील. उष्णतेचे विकार होतील. तब्येतीकडे विशेष लक्ष द्या. हाताखालचे लोक उर्मटपणे वागतील. म्हणून योग्य अधिकार वाणी ठेवा.

कर्क : प्रेमासाठी गुलाबी दिवस

"गुलाबी साडी आणि लाली लाल लाल" असाच आजचा दिवस आहे. प्रेमासाठी गुलाबी दिवस आणि कला, मनोरंजन याच्यासाठी बहरलेले मन. पण लाल सिग्नल मात्र शेअर, रेस आणि लॉटरीसाठी आहे.

सिंह : महत्वाची कामे मार्गी लागतील

स्थावर मालमत्ता, वडिलोपार्जित जमीन याविषयी काही कामे जर अडकली असतील तर आज ती मार्गी लागतील. दूध - दुभते जनावर यांची विशेष सेवा करावी लागेल. शेतीसाठी कष्टाचा दिवस.

कन्या : युक्तीने गोष्टी साध्य होतील

शरीराबरोबरच बुद्धीचा पराक्रम आज झोकात राहील. काही गोष्टी "शक्तीने नाही तर युक्तीने साध्य होतात" हे आज जाणवेल. तशी आपली बौद्धिक रास म्हणून जे काम असेल ते लीलया पार पाडाल.

तूळ : पैसे मिळण्याचाही आजचा दिवस

सुवर्ण अलंकार, वस्त्र, छान राहणे याची आपल्याला विशेष आवड. आणि म्हणून कदाचित अशा गोष्टींसाठी काही खर्च कराल .खर्च कधी होतो जेव्हा तुमच्याकडे पैसे असतात. म्हणून पैसे मिळण्याचाही आजचा दिवस म्हणायला हरकत नाही.

वृश्चिक : सकारात्मक विचार असतील

"मन मंदिरात तेजाने" असं तेजोमय असे क्षण आज आपले राहणार आहेत. खूप सकारात्मक विचार असतील आणि ते दुसऱ्यांना देऊन दिवस आनंदात साजरा कराल. अबोला टाळा.

धनु : आज हात आखडता घ्या

"पैशाला सातत्याने गळती" राहते असं वाटत असेल तर त्यातलाच हा आजचा दिवस. म्हणून आज हात आखडता घ्या. पैसे खर्च झाल्यामुळे मनस्वास्थ बिघडणार नाही ना याची काळजी घ्या. काही गोष्टी आपल्या सुखासाठी खर्च करतो हे लक्षात घ्या.

मकर : संधीचे सोने कराल

"सोन्याची संधी आणि संधीच सोन" असा आजचा दिवस आहे. वेगळ्या काही गोष्टी ज्या मनाला भावणार आहेत त्याच होतील. झोकून देऊन काम कराल.

कुंभ : यशाचा तुरा मिळेल

"केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे" असा आजचा दिवस काम. खूप करावे लागेल दमणूक होईल. पण सरते शेवटी यशाचा तुरा होऊनच घरी जाल.

मीन : सद्गुरूंची कृपा राहील

देवभोळेपणा वाढेल. पाण्याजवळ प्रवास होतील. आयुष्याचा आनंदातील आजचा हा एक दिवस. सद्गुरूंची कृपा राहील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IDBI Recruitment: आयडीबीआय बँकेत नोकरीची संधी; १३०० पदांसाठी भरती; अर्ज कसा करावा?

Maharashtra Live News Update : राज ठाकरे रायगडावर दाखल

Gold Rate Today: सोनं खरेदीची सुवर्णसंधी! सोन्याच्या दरात १९६०० रुपयांची घसरण; वाचा तुमच्या शहरातील आजचे दर

Bigg Boss Marathi 6 : रुचिता गेल्यावर विशालचा नवा गेम प्लान; थेट संपूर्ण घराशी घेतला पंगा, अखेर राखीने वैतागून केली 'ही' गोष्ट

Raj Thackeray : तुमची जात, तुमचा धर्म यापेक्षा... राज ठाकरेंची खास पोस्ट, तरूणांना आवाहन करत म्हणाले...

SCROLL FOR NEXT