Horoscope Today in Marathi  Saam tv
राशिभविष्य

Horoscope Today : दिवाळीत 'या' राशीच्या लोकांना मिळणार गुड न्यूज; कोणाची होईल भरभराट, तर कोणाला मिळेल आनंदाची बातमी

Horoscope Today in Marathi : आज काही राशींच्या लोकांना गुड न्यूज मिळण्याची शक्यता आहे. तर काही लोकांची भरभराट होईल.

Anjali Potdar

आजचे पचांग

बुधवार,३० ऑक्टोबर २०२४, अश्विन कृष्णपक्ष,शिवरात्रि.

तिथी-त्रयोदशी १३|१६

रास-कन्या

नक्षत्र-हस्त

योग-वैधृती

करण-वणिज

दिनविशेष-त्रयोदशी वर्ज्य

मेष - कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. पैसा जाण्याची शक्यता आहे. काळजी घ्या. दिवाळीच्या धावपळीत तब्येतीकडे दुर्लक्ष नको.

वृषभ- संततीचे प्रश्न मार्गी लागतील. बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल. उपासनेच्या मार्गातून फलप्राप्ती होईल. क्रीडा क्षेत्रात यश मिळेल.

मिथुन - प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव सामोर येतील. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. संवादातून साधन घडेल.

कर्क - नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. नोकरीत समाधानकारक स्थिती येईल. प्रेमातून लाभ होईल. सुखाची आस वाढेल.

सिंह - जुनी येणी वसूल होतील. वास्तूतील, कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल. वाईट परिस्थितीवर मात कराल.

कन्या - तुमचा इतरांवर प्रभाव राहील. तुमचे निर्णय आणि अंदाज अचूक ठरतील. त्यामुळे जीवनामध्ये प्रगतीचा योग दिसून येतील.

तुला - महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता आहे. खर्चाचे प्रमाण वाढेल. मानसिकता जपावी लागेल.मोठे/लांबचे प्रवास घडतील.

वृश्चिक- मित्र-मैत्रिणींचा सहवास लागेल. पत्रव्यवहार पार पडतील. लाभाचा दिवस आहे. प्रेमात वाहून जाणे आज योग्य ठरणार नाही.

धनु - तुमच्या कार्यक्षेत्रात मान सन्मान आणि प्रतिष्ठा वाढेल. शासकीय कामे मार्गी लागतील. वृद्धीचा दिवस आहे.

मकर - गुरुकृपा लाभेल. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. प्रगतीचे योग आहेत. आपली स्वप्ने साकारली जातील.

कुंभ -काही ना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. मनोबल कमी राहील. दुसऱ्याला उभारी देताना स्वतः खचून जाल.

मीन - जोडीदाराची अपेक्षित साथी मिळेल. भागीदारी व्यवसायात सुयश लाभेल. कामाचे नियोजन केल्याप्रमाणे कामे पार पडतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भाजप आमदाराच्या शाळेला शिक्षण विभागाची नोटीस | BJP MLA Narendra Mehta school gets education department notice

Maharashtra News Live Update: यवतमाळमध्ये सिमेंट घेऊन जाणारा ट्रक पलटी, चालकाचा जागीच मृत्यू

एक म्हैस घेण्यासाठी किती कर्ज मिळू शकते? जाणून घ्या अर्ज प्रक्रिया आणि पात्रता

Kidney Damage : दोन्ही किडनी खराब होण्याआधी शरीर देते ५ संकेत, दुर्लक्ष केलं तर जीवावर बेतू शकतं

तुकाराम मुंढेंच्या अन्न-औषध प्रशासनाची दणकेबाज कारवाई! तब्बल 4 कोटींच्या बटरच्या साठ्यावर धाड

SCROLL FOR NEXT