Chandra Grahan Horoscope meta ai
राशिभविष्य

Chandra Grahan Horoscope: चंद्रग्रहणानंतर नशीब बदलणार! ‘या’ 3 राशींवर धनवर्षाव अन् करिअरमध्ये प्रगती होणार; जाणून घ्या कोणत्या?

August Lunar Eclipse: ऑगस्टमधील चंद्रग्रहणाचा ज्योतिषीय मान्यतेनुसार वृषभ, वृश्चिक आणि मकर राशींवर सकारात्मक प्रभाव पडू शकतो. करिअर, आर्थिक स्थिती आणि निर्णयांमध्ये नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे.

Sakshi Sunil Jadhav

यंदा ऑगस्ट महिन्यात रक्षाबंधनाच्या दिवशी पौर्णिमेला चंद्रग्रहणाचा योग असल्याचं ज्योतिषशास्त्रीयांचा अंदाज असल्याचं सांगितलं जात आहे. चंद्रग्रहणाचा संबंध भावना, नातेसंबंध, मानसिक स्थिती आणि आत्मपरीक्षणाशी जोडला जातो. त्यामुळे या काळात काही राशींना जुन्या निर्णयांचा फेरविचार करावा लागू शकतो. तर काहींना आर्थिक आणि करिअरच्या बाबतीत सकारात्मक संधी मिळू शकतात.

ज्योतिष शास्त्रानुसा, या चंद्रग्रहणाचा प्रभाव सर्व राशींवर सारखा राहणार नाही. विशेषतः वृषभ, वृश्चिक आणि मकर राशीच्या व्यक्तींसाठी हा काळ काही बाबतीत योग्य ठरू शकतो.

वृषभ राशीला आर्थिक फायदा

वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी चंद्रग्रहणाचा काळ आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचा ठरू शकतो. उत्पन्नाचे नवीन मार्ग निर्माण होण्याची शक्यता आहे. एखादी समस्या समोर आली तरी त्यावर योग्य तोडगा शोधण्यात यश मिळू शकते. पण नातेसंबंध आणि सामाजिक आयुष्यात काही गोष्टींकडे अधिक लक्ष द्यावे लागू शकते.

वृश्चिक राशीला यश आणि दिलासा

वृश्चिक राशीच्या व्यक्तींना या काळात यशासोबत मानसिक समाधान मिळू शकते. सर्जनशील काम, छंद किंवा वैयक्तिक प्रकल्पांमधून फायदा होण्याची शक्यता आहे. नवीन कल्पनांवर काम करण्यासाठी आणि स्वतःला सकारात्मक ठेवण्यासाठी हा काळ चांगला ठरू शकतो.

मकर राशीसाठी वाणी ठरेल महत्त्वाची

मकर राशीच्या व्यक्तींना संवादकौशल्याचा फायदा होऊ शकतो. भविष्यातील योजना जास्त स्पष्टपणे आखता येतील. नवीन माहिती किंवा अनुभवामुळे काही निर्णयांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलू शकतो आणि त्याचा फायदा भविष्यात मिळू शकतो.

चंद्रग्रहणाच्या काळात काम आणि वैयक्तिक आयुष्याचा समतोल राखणे महत्त्वाचे ठरेल. नातेसंबंध, जबाबदाऱ्या आणि भावनिक स्थितीकडे दुर्लक्ष न करता विचारपूर्वक निर्णय घेणे फायदेशीर ठरू शकते.

डिस्क्लेमर: या लेखातील माहिती ज्योतिषशास्त्रीय मान्यता आणि उपलब्ध माहितीनुसार देण्यात आली आहे. याला वैज्ञानिक आधार असल्याचा दावा केला जात नाही. कोणताही महत्त्वाचा निर्णय घेताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. साम टिव्ही याच्याशी समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: दुष्काळ घोषणेवर मुनगंटीवारांची प्रतिक्रिया; चंद्रपूरमधील सुटलेल्या तालुक्यांसाठी मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Dal Makhani Recipe: हॉटेलमध्ये खाण्याची गरज नाही! अशी बनवा घरच्या घरी रेस्टॉरंटसारखी दाल माखनी

Cheese Ball Recipe: लहान मुलांसाठी झटपट बनवा कुरकुरीत आणि चीजने भरलेले चीज बॉल्स, वाचा रेसिपी

Shocking : विद्यार्थ्याने गणिताचा प्रश्न सोडवला नाही, संतापलेल्या शिक्षकाने बेदम मारलं; संभाजीनगरमधील घटना

Skin Care: ऑयली, ड्राय की कॉम्बिनेशन स्किन? तुमच्या त्वचेसाठी कोणता फेसवॉश आहे बेस्ट, जाणून घ्या

SCROLL FOR NEXT