Budhaditya Rajyog saam tv
राशिभविष्य

Budhaditya Rajyog: होळीनंतर गुरुच्या राशीत बनणार बुधादित्य राजयोग; 'या' 3 राशींवर पडणार पैशांचा पाऊस

Budhaditya Rajyog In Meen: होळीच्या दुसऱ्या दिवशी, म्हणजेच १५ मार्चला, सूर्य देव मीन राशीत प्रवेश करणार आहे, जिथे त्याचा बुधासोबत संयोग होईल. या विशेष ग्रहसंयोगामुळे तब्बल एका वर्षानंतर बुधादित्य राजयोगाची निर्मिती होणार आहे. या शक्तिशाली राजयोगाचा प्रभाव काही राशींसाठी अत्यंत शुभ ठरणार असून, त्यांच्या नशिबाला नवी कलाटणी मिळू शकते.

Surabhi Jayashree Jagdish

ज्योतिषशास्त्रानुसार, वेळोवेळी ग्रहांच गोचर शुभ आणि राजयोग निर्माण करणार आहे. ज्याचा मानवी जीवनावर आणि देशावर परिणाम होत असतो. यावर्षी रंगपंचमीचा सण १४ मार्च रोजी साजरा केला जाणार आहे. या सणानंतर ग्रहांचा देखील खास परिणाम होणार आहे. यावेळी एक खास राजयोगाची निर्मिती होणार आहे.

होळीच्या दुसऱ्या दिवशी, १५ मार्च रोजी, सूर्य देव मीन राशीत भ्रमण करणार आहे. ज्याठिकाणी त्याची बुधाशी युती होणार आहे. ज्यामुळे या दोन्ही ग्रहांच्या युतीमुळे १ वर्षानंतर बुधादित्य राजयोग निर्माण होणार आहे. या राजयोगाच्या निर्मितीमुळे काही राशींचे भाग्य उजळू शकणार आहे. यामध्ये कोणत्या राशींचा समावेश आहे ते पाहूयात.

कुंभ रास

बुधादित्य राजयोग तुमच्यासाठी सकारात्मक ठरू शकणार आहे. हा राजयोग तुमच्या गोचर कुंडलीत दुसऱ्या स्थानावर तयार होणार आहे. या काळात तुम्हाला अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता असते. या काळात तुमचा बँक बॅलन्स पूर्वीपेक्षा खूपच चांगला असणार आहे. या काळात तुम्हाला तुमच्या कारकिर्दीत अनेक चांगल्या संधी मिळू शकतात. तुमच्या आयुष्यात आनंद आणि समृद्धी येणार आहे.

वृषभ रास

वृषभ राशीच्या लोकांसाठी बुधादित्य राजयोग सकारात्मक सिद्ध होऊ शकणार आहे. कारण हा योग तुमच्या राशीच्या ११ व्या घरात तयार होणार आहे. या वेळी तुमच्या उत्पन्नात मोठी वाढ होऊ शकते. गुंतवणुकीतून नफा मिळण्याची शक्यता आहे. गुंतवणूक करण्याचा विचार फायदेशीर ठरेल. नोकरदारांसाठी हा काळ चांगला राहणार आहे.

मिथुन रास

बुधादित्य राजयोगाची निर्मिती तुमच्यासाठी शुभ आणि फलदायी ठरू शकणार आहे. कारण हा राजयोग तुमच्या राशीपासून दहाव्या स्थानावर तयार होणार आहे. या वेळी तुम्हाला तुमच्या कामात आणि व्यवसायात विशेष प्रगती मिळू शकणार आहे. आयुष्यातील सततचा ताण कमी होईल.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

T20 फॉर्मेटचा नवा राजा! 3000 धावांचा ऐतिहासिक टप्पा गाठला; सूर्यकुमार फटकेबाजीचा बादशहा बनला

Iran Blast: इराणमध्ये मोठा स्फोट; ८ मजली निवासी इमारत पत्त्यासारखी कोसळली, संपूर्ण देशात खळबळ

दादांनी दूर ठेवलेले मुंडे, प्रकृतीमुळे बाजूला असलेले भुजबळ आता आघाडीवर, कारण काय? VIDEO

अजितदादांची इच्छा पूर्ण व्हावी, ही माझी इच्छा, विलीनीकरणावर पवारांचं विधान, राष्ट्रवादी विलिनीकरणात तटकरे, पटेलांचा खोडा?

IND vs NZ T20: वनडेचा स्कोअर टी २० सामन्यात; न्यूझीलंडची कडक धुलाई, भारताच्या धुरंधरांनी पराभवाचा वचपा काढला

SCROLL FOR NEXT