budhaditya yoga saam tv
राशिभविष्य

Budhaditya Rajyog: अनंत चतुर्दशीला बनतोय बुधादित्य राजयोग; 'या' राशींचं नशीब चमकणार

Budhaditya Rajyog: अनंत चतुर्दशीच्या दिवशी सूर्य आणि बुधामुळे खास राजयोग तयार होणार आहे. यावेळी कोणत्या राशींच्या व्यक्तींना लाभ होणार आहे ते पाहूयात.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, ग्रहांच्या गोचरमुळे खास राजयोग तयार होतात. सध्या गणेसोत्सवाचा उत्साह दिसत असून मंगळवारी अनंत चतुर्दशी आहे. अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपती बाप्पाचं विसर्जन करण्यात येईल. शिवाय या दिवशी सूर्य आणि बुधामुळे खास राजयोग तयार होणार आहे.

येत्या काळामध्ये सूर्य आणि बुध ग्रहाच्या युतीमुळे बुधादित्य राजयोग तयार होणार आहे. शिवाय या दिवशी रवि योग देखील आहे. या दोन्ही शुभ योगामुळे काही राशींच्या व्यक्तींचं आयुष्य चमकणार आहे. यावेळी कोणत्या राशींच्या व्यक्तींना लाभ होणार आहे ते पाहूयात.

कर्क रास

या राशींच्या व्यक्तींसाठी बुधादित्य राजयोग लाभदायक ठरणार आहे. या काळात तुम्हाला अचानक धन लाभ होण्याची शक्यता आहे. कर्जाची परतफेड करण्यात तुम्हाला यश मिळण्याची अपेक्षा आहे. पैसै वाचवण्यात तुम्हाला यश मिळणार आहे. नोकरीच्या ठिकाणी तुम्ही तुमच्या कामाने स्वतःला सिद्ध करून दाखवाल.

तूळ रास

बुधादित्य राजयोगाच्या निर्मितीमुळे तूळ राशीच्या लोकांसाठी चांगले दिवस येणार आहेत. या काळात तुम्हाला वेळोवेळी अनपेक्षित आर्थिक नफा मिळू शकणार आहे. तुमचे अडकलेले पैसे सणापूर्वी परत मिळू शकतील. गुंतवणुकीचा फायदा होऊ शकणार आहे. कुटुंबातील कलह दूर होऊ शकतात.

सिंह रास

बुधादित्य राजयोगाची निर्मिती तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. तुमच्या योजना यशस्वी होतील. तुम्हाला समाजात मान-प्रतिष्ठा मिळू शकेल. विवाहाशी संबंधित चर्चा यशस्वी होणार आहे. विद्यार्थी आणि स्पर्धांना भाग घेणाऱ्यांसाठी काळ अधिक शुभ राहणार आहे. घरात काही शुभ कार्य घडेल.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manoj Jarange Patil: मराठ्यांच्या आरक्षणासाठी लढणारे मनोज जरांगे पाटील आहेत तरी कोण?

Maharashtra Live News Update: हिंगोलीमध्ये मुसळधार पाऊस, सकाळच्या सत्रातील शाळांना सुट्टी

Metro News : पुणेकरांना खुशखबर, गणेशोत्सावत मेट्रो रात्री २ वाजेपर्यंत धावणार

Cholesterol myths: किचनमधील 'या' चुका वाढवतायत तुमचं कोलेस्ट्रॉल; मनात असलेले गैरमसज आजच काढून टाका

EPF Calculator: महिन्याला ₹५००० गुंतवा अन् ३.५ कोटींचा फंड मिळवा; वाचा नेमकं कॅल्क्युलेशन

SCROLL FOR NEXT