बुध ग्रह सप्टेंबर महिन्यात दोन वेळा राशी परिवर्तन करणार आहे. सध्या बुध सिंह राशीमध्ये असून २३ सप्टेंबर रोजी बुध ग्रह कन्या राशीमध्ये प्रवेश करणार आहे. कन्या राशीच्या या राशी परिवर्तनामुळे भद्र राजयोग तयार होणार आहे. याशिवाय कन्या राशीत सूर्य असल्याने बुध-सूर्याच्या युतीने बुधादित्य राजयोगही तयार होणार आहे.
ज्योतिष्य शास्त्रानुसार, ग्रहांचा राजा सूर्यदेव सध्या त्यांच्या सिंह राशीमध्ये आहे. सूर्य १६ सप्टेंबर २०२४ पर्यंत या ठिकाणी राहणार असून यानंतर ते कन्या राशीमध्ये प्रवेश करणार आहे. या राशीमध्ये बुध ग्रहाशी युती झाल्याने बुधादित्य राजयोग तयार होणार आहे. दरम्यान भद्र आणि बुधादित्य राजयोग तयार झाल्याने काही राशींच्या व्यक्तींना लाभ मिळणार आहे, जाणून घेऊया या राशी कोणत्या आहेत.
कन्या राशीत बुधाने निर्माण केलेल्या भद्र राजयोग आणि बुधादित्य राजयोगामुळे काही राशीच्या लोकांच्या जीवनात आनंद येणार आहे. तुम्ही पाहत असलेली अनेक स्वप्न पूर्ण होणार आहेत. भद्रा राजयोगाच्या प्रभावामुळे या राशीच्या लोकांना त्यांच्या करिअरमध्ये चांगली संधी मिळणार आहे. संपत्ती मिळवण्याच्या तुमच्या इच्छा पूर्ण होतील.
बुधाच्या गोचरमुळे शुभ योग तयार होणार असून यामुळे या राशीच्या लोकांना नोकरीच्या ठिकाणी पदोन्नती आणि प्रतिष्ठा मिळण्याची शक्यता आहे. यावेळी व्यावसायिकांना अडकलेले पैसे मिळू शकतात. यामुळे तुमच्या कुटुंबात आनंदाचं वातावरण राहणार आहे. याशिवाय तुमचं आरोग्य सुधारणार आहे.
भद्रा राजयोगाच्या निर्मितीमुळे गेल्या एक वर्षापासून तुम्ही तुमच्या जीवनात ज्या अडचणींचा सामना करत आहात त्यापासून तुम्हाला आराम मिळू शकणार आहे. वैयक्तिक जीवन देखील सकारात्मकतेने भरलेलं असणार आहे. तुम्हाला तुमच्या नोकरीत अधिका-यांकडून प्रोत्साहन आणि लाभ मिळू शकतात.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. साम टीव्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.