Panchang today in Marathi saam tv
राशिभविष्य

Panchami Tithi: शरद ऋतु, पंचमी तिथि आणि चंद्र मिथुन राशीत; या राशींना मिळणार प्रोत्साहन व नवा प्रवास

Renewed enthusiasm for these zodiac signs: हिंदू पंचांगानुसार आज पंचमी तिथी आहे. ही तिथी 'पूर्णा' तिथी मानली जाते, जी सकारात्मकता उत्साह आणि प्रगती यासाठी अत्यंत शुभ आहे.

Surabhi Jayashree Jagdish

आज कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षाची पंचमी तिथि आहे. आज आर्द्रा नक्षत्र असल्याने मनात थोडी अस्थिरता, विचारांची चंचलता आणि संभ्रम निर्माण होण्याची शक्यता आहे. निर्णय घेताना घाई टाळणं चांगल राहू शकतं.

आजच्या दिवशी चंद्र आज मिथुन राशीत आहे, त्यामुळे संवाद, चर्चा, व्यवहार आणि बोलण्याच्या माध्यमातून काम पुढे नेण्याच्या संधी तुम्हाला मिळणार आहेत. दिवसाचं वातावरण बदलत्या स्वरूपाचं असलं तरी संयमाने कार्य केल्यास फायदा होऊ शकणार आहे.

आजचं पंचांग

  • दिनांक: 9 नोव्हेंबर 2025

  • वार: रविवार

  • संवत्सर: विक्रम संवत 2082, शक संवत 1947

  • मास: कार्तिक

  • पक्ष: कृष्ण पक्ष

  • तिथी: पंचमी

  • नक्षत्र: आर्द्रा

  • चंद्र राशी: मिथुन

  • ऋतु: शरद

  • करण: कौलव

  • योग: सिद्ध

  • सूर्योदय: 06:31:29 AM

  • सूर्यास्त: 05:30:24 PM

  • चंद्र उदय: 09:10:18 PM

  • चंद्रास्त: 10:41:02 AM

आजचे शुभ व अशुभ मुहूर्त

  • अभिजीत मुहूर्त (शुभ): 11:39:00 AM ते 12:21:00 PM

  • राहुकाल (टाळावा): 04:08:00 PM ते 05:30:24 PM

  • यमघंट काल: 12:00:56 PM ते 01:23:18 PM

  • गुलिक काल: 02:45:40 PM ते 04:08:00 PM

आज कोणत्या चार राशींना दिवस अनुकूल आहे?

मिथुन रास

चंद्र तुमच्या राशीत असल्यामुळे विचार आणि बोलण्यात स्पष्टता वाढणार आहे. आजच्या दिवशी तुमच्यासाठी नवे संपर्क लाभदायक ठरू शकतात. मनात उत्सुकता आणि प्रगतीची भावना वाढणार आहे.

कन्या रास

आज कामात अचूकता, तपशील समजून घेण्याची क्षमता आणि लोकांना पटवून देण्याची ताकद तुमच्यात असणार आहे. नियोजन आणि व्यवस्थापनात उत्तम परिणाम मिळणार आहेत.

धनु रास

आज तुम्हाला नवीन माहिती, नवीन कल्पना किंवा प्रवासाची छोटी संधी मिळू शकणार आहे. अडकलेली कामे पुढे सरकण्याची शक्यता आहे. कोणीतरी महत्त्वाची व्यक्ती तुमच्याशी सहकार्य दाखवणार आहे.

कुंभ रास

आज तुमची उपस्थिती, निर्णय क्षमता आणि व्यवहारिक दृष्टिकोन लोकांना प्रभावित करणार आहे. समस्यांसाठी नवीन आणि सोपे उपाय सुचणार आहेत. काही जुने ताण कमी होण्याची शक्यता आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : मावळात राष्ट्रवादी काँग्रेसकडून जिल्हा परिषदेसाठी पहिली उमेदवारी जाहीर

Shocking News : कबड्डी खेळताना खेळाडू मैदानात कोसळला अन् मृत्यू झाला , धक्कदायक कारण आलं समोर

Actress Opps Movement: 'आज तरी पूर्ण कपडे...'; प्रसिद्ध अभिनेत्री झाली ऊप्स मूव्हमेंटची शिकार

Side effects of earbuds use: २ वर्षे इयरबड्स वापरले, कान खराब झाले; धोका टाळण्यासाठी काय कराल?

कल्याण डोंबिवलीकरांवर पाणी कपातीचे संकट! 'या' दिवशी १२ तास पाणी येणार नाही, कारण काय?

SCROLL FOR NEXT