Surya Gochar 2024 Saam Tv
राशिभविष्य

Surya Gochar: एका वर्षानंतर सूर्य देव करणार वृश्चिक राशीत प्रवेश; 'या' राशींच्या घरी बरसणार पैसा

Surabhi Jagdish

वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यावेळी सूर्याला ग्रहांचा राजा म्हटलं जातं. यावेळी सूर्य ग्रह दर एका महिन्याने त्याची रास बदलतो. ज्यावेळी सूर्याचं गोचर होतं तेव्हा त्याचा परिणाम सर्व राशींच्या व्यक्तींवर होतो.

ज्योतिष्य शास्त्रानुसार, सूर्यदेव नोव्हेंबरमध्ये वृश्चिक राशीत प्रवेश करणार आहेत. सूर्याच्या या गोचरमुळे काही राशींच्या आयुष्यावर चांगला परिणाम होणार आहे. यावेळी काहींना भरपूर पैसा मिळणार आहे तर काहींच्या आयुष्यात सुखाचे क्षण येणार आहेत. जाणून घेऊया यामध्ये कोणत्या राशींचा समावेश आहे.

वृश्चिक रास

सूर्यदेवाचं गोचर तुमच्यासाठी लाभदायक ठरू शकणार आहे. यावेळी तुमची कार्यशैली सुधारेल. जे रिलेशनशिपमध्ये आहेत, त्यांचं नातं पुढील स्तरावर पोहोचू शकतं. अविवाहित लोकांमधील संबंधांवर चर्चा होऊ शकणार आहे. येत्या काळात तुम्हाला फायदा होईल.

सिंह रास

सिंह राशीच्या लोकांसाठी सूर्य देवाच्या राशीतील बदल अनुकूल ठरू शकणार आहे. या काळात तुम्हाला तुमच्या मुलाशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते. लोकांचं धैर्य आणि शौर्य वाढणार आहे. परदेशात व्यवसाय करणाऱ्या लोकांना विविध नफा मिळण्याची अपेक्षा आहे.

मकर रास

सूर्य देवाचं गोचर या राशींसाठी लाभदायक ठरू शकतं. या काळात तुमचं उत्पन्न प्रचंड वाढू शकणार आहे. तुम्हाला गुंतवणुकीचा फायदा होणार आहे. व्यावसायिकांसाठी हा काळ लाभदायक ठरू शकतो. कुटुंबामध्ये एक चांगली बातमी मिळू शकणार आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs NZ : भारताविरोधात किवीच्या संघाची घोषणा, पहिल्या सामन्याला विल्यमसन मुकणार, कुणाला मिळाली संधी?

UPI Transaction Limit : ऑनलाइन पेमेंट करणाऱ्यांना मोठा दिलासा; आरबीआयने वाढवली UPI Lite पेमेंटची मर्यादा

Marathi News Live Updates: पुण्यात ⁠राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरू

Cancer: मृत्यूचा धोका टाळणाऱ्या ४ ब्लड टेस्ट; कॅन्सरला प्राथमिक टप्प्यात शोधून काढतील!

Tourism Places: मुबंईमधील ही निसर्गरम्य ठिकाणे पाहून मूड होईल मिनिटांत फ्रेश

SCROLL FOR NEXT