Shani Gochar 2024  saam tv
राशिभविष्य

Shani Gochar 2024: देव दिवाळीनंतर 'या' राशींच्या व्यक्तींना मिळणार शनीदेवाचा आशीर्वाद; नशीबाचे दरवाजे उघडणार

Shani Gochar 2024: सूर्यदेवाचा पुत्र शनिदेव याला न्यायाची देवता देखील म्हणतात. कारण हा ग्रह प्रत्येकाला त्याच्या कर्मानुसार फळ देतं.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक ज्योतिष्य शास्त्रामध्ये प्रत्येक ग्रहाला महत्त्व आहे. यावेळी शनी ग्रहाला यामध्ये विशेष महत्त्व देण्यात आलं आहे. सूर्यदेवाचा पुत्र शनिदेव याला न्यायाची देवता देखील म्हणतात. कारण हा ग्रह प्रत्येकाला त्याच्या कर्मानुसार फळ देतं. सर्व ग्रहांमध्ये शनी सर्वात मंद गतीने फिरतो. राशी बदलण्यासाठी अडीच वर्षे लागतात.

दिवाळी संपली असून आता सर्वांना देव दिवालीची प्रतिक्षा आहे. 16 नोव्हेंबर रोजी शनिदेव कुंभ राशीत प्रवेश करणार आहेत. त्याचा प्रभाव सर्व राशींवर दिसून येणार आहे. यावेळी काहींसाठी शुभ तर काहींसाठी अशुभ असण्याची शक्यता आहे. जाणून घेऊया दिवाळीनंतर शनिदेवामुळे कोणत्या राशींचं आयुष्य उजळणार आहे.

वृषभ रास

वृषभ राशीच्या लोकांसाठी देव दिवाळीनंतर चांगला काळ सुरू होणार आहे. या काळात तुमच्या संपत्ती आणि समृद्धीमध्ये वाढ होणार आहे. प्रदीर्घ प्रलंबित कामंही पूर्ण होणार आहेत. तुमच्या कार्यक्षेत्रात तुम्हाला बढती मिळू शकणार आहे.

मेष रास

मेष राशीच्या लोकांसाठी शनीची मार्गी स्थिती शुभ राहणार आहे. या काळात तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात यश मिळणार आहे. तुम्हाला संपत्ती आणि धान्य मिळणार आहे. तुम्हाला तुमच्या कार्यक्षेत्रात बढती मिळू शकणार आहे. नवीन घर खरेदीसाठी हा शुभ काळ आहे.

कर्क रास

कर्क राशीच्या लोकांसाठी शनीची ही चाल लाभदायक ठरणार आहे. यावेळी तुम्हाला जीवनात आनंद मिळू शकणार आहे. या काळात तुमच्या पगारात वाढ होऊ शकते. पैशाशी संबंधित समस्या दूर होण्याची शक्यता आहे. कुटुंबासोबत दर्जेदार वेळ घालवण्याची संधी मिळणार आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: महापालिकेसाठी भाजपचा नवा प्लॅन, ठाकरेंच्या रणनीतीला भाजपचा शह?

Maharashtra Corporation Election: मोठी बातमी! आमदार, खासदारांच्या पोरांना तिकीट नकोच; ऐननिवडणुकीत भाजपचा निर्णय

राज ठाकरेंच्या मनसेच्या संभाव्य उमेदवारांची पहिली यादी समोर, कोणाला कुठून संधी?

Kala Vatana Rassa Recipe: काळा वटाणा रस्सा भाजी कशी बनवायची?

Maharashtra Live News Update: छत्रपती संभाजीनगरमध्ये युतीच्या चर्चेत ट्विस्ट

SCROLL FOR NEXT