Mangal Gochar saam tv
राशिभविष्य

Mangal Gochar: भाऊबिजेनंतर मंगळ करणार वृश्चिक राशीत गोचर; 3 राशींना मिळणार पैसाच पैसा

Mars Transit In Scorpio 2025: दिवाळीचा सण संपल्यानंतर आणि भाऊबीज झाल्यावर लगेचच ग्रहांचा सेनापती मानला जाणारा मंगळ ग्रह (Mars) आपली राशी बदलून वृश्चिक राशीत प्रवेश करणार आहे. मंगळाचे हे गोचर ज्योतिषशास्त्रानुसार अत्यंत महत्त्वाचे मानले जाते

Surabhi Jayashree Jagdish

ज्योतिषशास्त्रानुसार मंगळ ग्रह सुमारे अठरा महिन्यांनी राशी बदलतात. मंगळाला संपत्ती, क्रोध, रक्त, साहस आणि पराक्रम यांचा कारक मानलं जातं. येत्या २३ ऑक्टोबर रोजी, भाऊबिजेनंतर मंगळ ग्रह राशी बदलून आपल्या स्वराशी असलेल्या वृश्चिक राशीत प्रवेश करणार आहेत.

दिवाळीनंतर या बदलाचा प्रभाव सर्व राशींवर दिसून येणार आहे. मात्र यावेळी तीन राशी अशा आहेत ज्यांचं भाग्य या काळात उजळणार आहे. धन–संपत्ती वाढणार असून मन प्रसन्न राहणार आहे. यामध्ये कोणत्या राशींना याचा फायदा होणार आहे ते पाहूयात.

सिंह रास

ग्रहांचा सेनापती मंगळ ग्रह सिंह राशीच्या व्यक्तींसाठी अत्यंत अनुकूल ठरणार आहे. मंगळ या काळात भौतिक सुख आणि संपत्तीच्या भावात भ्रमण करणार असल्याने जमीन–जुमल्याचा लाभ मिळणार आहे. संपत्ती खरेदी करण्याचे योग प्रबळ आहेत. वडिलोपार्जित मालमत्तेतूनही फायदा होऊ शकतो.

मीन रास

मीन राशीच्या व्यक्तींसाठी मंगळाचा हा गोचर नवम स्थानात होत असल्याने भाग्य विशेष साथ देणार आहे. आतापर्यंत अडलेली कामं या काळात पूर्ण होऊ शकतात. व्यवसाय किंवा कामाशी संबंधित प्रवास घडणार आहेत. करिअरमध्ये प्रगतीसाठी केलेली मेहनत सफल होणार आहे.

वृश्चिक रास

मंगळ ग्रह हा वृश्चिक राशीचा स्वामी असून या वेळी तो लग्नभावात भ्रमण करणार आहे. अविवाहितांना एखाद्या जवळच्या मित्राबद्दल आकर्षण वाटणार आहे. त्यातून नवं नातं जुळून येणार आहे. आर्थिक दृष्टीने हा काळ अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. यश, मान–सन्मान आणि प्रतिष्ठा मिळेल.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: राज्यात उद्रेक निर्माण होतोय, त्यावर बोला - छगन भुजबळ

Accident: दौंडमध्ये अपघाताचा थरार, शाळकरी विद्यार्थिनीला डंपरने चिरडलं, थरकाप उडवणारा सीसीटीव्ही VIDEO

OBC Reservsation : तहसीलदारांचं टेन्शन वाढलं ? अवैध कुणबी प्रमाणपत्र दिल्यास कारवाई होणार|पाहा VIDEO

Dhanashree Verma On Pawan Singh: धनश्री वर्मासोबत फ्लर्ट, पवन सिंहवर आणखी एक गंभीर आरोप; अभिनेत्री रागारागात म्हणाली...

Axe Attack : भयानक! पत्नी अन् मुलासमोरच कुऱ्हाडीनं शीर केलं धडावेगळं, अमेरिकेत भारतीय व्यक्तीची निर्घृण हत्या

SCROLL FOR NEXT