वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, या वर्षी श्रावण ११ जुलैपासून सुरू होणार आहे. तर ९ ऑगस्ट रोजी श्रावण संपणार आहे. श्रावणामध्ये ग्रहांची स्थिती देखील महत्त्वाची मानली जाते. अनेक दुर्मिळ योगायोग घडणार आहेत. ज्यामध्ये देवांचा गुरु बृहस्पति ७ जुलै रोजी उदय पावणार आहे.
शनिदेव १३ जुलै रोजी वक्री होणार आहे. ज्यामुळे काही राशींचं भाग्य चमकू शकणार आहे. त्याचप्रमाणे अचानक धनप्राप्ती आणि प्रगती होण्याची शक्यता आहे. या काळात कोणत्या राशींचे अच्छे दिन सुरु होणार आहे ते पाहूयात.
शनिदेवाची वक्रगती आणि गुरूचा उदय वृषभ राशीच्या लोकांसाठी शुभ ठरू शकणार आहे. गुरू तुमच्या गोचर कुंडलीच्या धनस्थानात उगवणार आहे. तर शनिदेव उत्पन्नस्थानात वक्रस्थानी असणार आहे. या काळात तुमच्या उत्पन्नात प्रचंड वाढ होऊ शकणार आहे. तुमचं नशीब चमकेल आणि लांब प्रवासातून फायदा होणार आहे.
शनिदेवाचे वक्री आणि गुरुचा उदय फायदेशीर ठरू शकणार आहे. तुमच्या राशीपासून बाराव्या घरात बृहस्पति वक्री राहणार आहे. तुम्ही यावेळी कोणत्याही धार्मिक किंवा शुभ कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. तुम्हाला वैयक्तिक आणि व्यावसायिक प्रयत्नांमध्ये यश मिळणार आहे. तुम्हाला तुमच्या व्यावसायिक जीवनात नवीन प्रगती दिसणार आहे.
शनी आणि गुरु ग्रहाच्या हालचालीतील बदल तुमच्यासाठी अनुकूल ठरू शकणार आहे. गोचर कुंडलीच्या पहिल्या घरात गुरु ग्रहाचा उदय होणार आहे. या काळात तुमच्या आत्मविश्वासात वाढ दिसून येणार आहे. बेरोजगार लोकांना नोकरी मिळू शकते. यावेळी विवाहित लोकांचे वैवाहिक जीवन उत्तम राहणार आहे. तुमच्या प्रेम जीवनासाठी हा एक चांगला काळ असणार आहे.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.