Chaturgrahi Yog 2025 saam tv
राशिभविष्य

Chaturgrahi Yog: 50 वर्षांनंतर सूर्याच्या राशीत बनणार चर्तुग्रही योग; 'या' 3 राशींच्या आयुष्यात येणार सुखाचे क्षण

Chaturgrahi Yog In Leo: जेव्हा एकाच राशीत चार ग्रह एकत्र येतात, तेव्हा त्याला चतुर्ग्रही योग असे म्हणतात. असा योग ५० वर्षांनंतर तयार होत आहे, ज्यामुळे काही राशींसाठी हा काळ खूप शुभ आणि आनंदाचा ठरेल.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक पंचांगानुसार ग्रह विशिष्ट अंतराने गोचर करून त्रिग्रही किंवा चतुर्ग्रही योग तयार करतात. अशा योगांचा परिणाम केवळ व्यक्तीच्या जीवनावरच नाही तर देश-विदेशातील परिस्थितींवरही स्पष्ट दिसतो. येत्या सप्टेंबर महिन्यात असाच एक महत्त्वपूर्ण चतुर्ग्रही योग तयार होणार आहे. हा योग सिंह राशीत बुध, शुक्र, केतु आणि सूर्य यांच्या संयोगाने होईल.

या ग्रहांमुळे काही राशींना अपार लाभ मिळण्याची शक्यता आहे. विशेषतः यावेळी काही राशींच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होणार आहे. त्याचप्रमाणे काही राशींचे अडकलेले पैसे परत मिळणार आहे. यावेळी कोणत्या राशींना याचा लाभ मिळणार आहे ते पाहूयात

सिंह राशी (Leo)

सिंह राशीसाठी हा चतुर्ग्रही योग अत्यंत शुभ ठरू शकतो. जुन्या योजनांना यश मिळेल आणि लोकप्रियतेत वाढ होणार आहे. करिअरच्या दृष्टीने सूर्य आणि शुक्र अनुकूल ठरणार असून पद, मान-सन्मानात वाढ होण्याची शक्यता आहे. विवाहितांसाठी हा काळ गोडवा घेऊन येणार आहे. व्यापाऱ्यांना मोठा फायदा होण्याची शक्यता आहे.

वृश्चिक राशी (Scorpio)

हा चतुर्ग्रही योग वृश्चिक राशीसाठीही फलदायी ठरू शकणार आहे. कारण हा योग त्यांच्या कामकाज आणि करिअर भावात घडणार आहे. या काळात कामकाजात चांगली प्रगती होण्याची शक्यता आहे. नवीन जबाबदाऱ्या किंवा पदोन्नतीची संधी मिळू शकते. नवीन प्रोजेक्ट्स सुरू करण्यासाठी हा उत्तम काळ उत्तम असणार आहे.

धनु राशी (Sagittarius)

धनु राशीच्या लोकांसाठी हा योग भाग्यभावात होणार असल्याने विशेष शुभ आहे. या काळात नशिबाची साथ मिळेल. नोकरीत किंवा व्यवसायात अडथळे दूर होऊन तुम्ही पुन्हा लक्ष केंद्रीत करून काम करू शकाल. या काळात देश-विदेश प्रवासाचे योग तयार होऊ शकणार आहेत. धार्मिक किंवा मंगलकार्यांत सहभागी होण्याची संधी मिळेल.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India vs Bangladesh: आशिया कपच्या अंतिम फेरीत भारताचा प्रवेश; अभिषेक शर्मा अन् कुलदीप समोर बांगलादेशनं नांगी टाकली

Maharashtra Flood: दर हेक्टरी 50 हजार रुपयांची मदत द्या; सरकार शेतकऱ्यांची मागणी मान्य करणार?

एसटी बँक नथुराम गोडसेची भक्त ? बँकेच्या वार्षिक अहवालावर झळकला फोटो

Mumbai Crime : मुंबईत दुहेरी हत्याकांड, निर्दयी मुलाकडून वडील आणि आजोबाची हत्या; परिसरात खळबळ

Sudha Murty: खासदार सुधा मूर्ती सायबर गु्न्हेगारांच्या निशाण्यावर; अश्लील व्हिडिओच्या नावे दिली धमकी

SCROLL FOR NEXT