Tri Ekadash Yog saam tv
राशिभविष्य

Samsaptak yog 2025: 30 वर्षांनंतर सूर्य-शनीचा बनला समसप्तक योग; 'या' राशींना नोकरीतून मिळणार पैसाच पैसा

Surya Shani yog, Samsaptak yog 2025: ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांचे गोचर आणि त्यांच्या स्थितीमुळे बनणारे योग व्यक्तीच्या जीवनावर मोठा प्रभाव पाडतात. सुमारे ३० वर्षांनी सूर्य आणि शनि एकत्र येत अत्यंत शुभ योग बनवत आहेत, ज्याला समसप्तक योग (Samsaptak Yoga) असे म्हणतात.

Surabhi Jayashree Jagdish

ज्योतिषशास्त्रानुसार ग्रह विशिष्ट काळानंतर गोचर करतात आणि त्यातून शुभयोग आणि राजयोगांची निर्मिती होते. याचा परिणाम केवळ व्यक्तीच्या जीवनावरच नाही तर संपूर्ण देशावर दिसून येतो. ग्रहांचा राजा सूर्याने १७ सप्टेंबर रोजी कन्या राशीत प्रवेश केला आहे. त्याच वेळी शनी मीन राशीत विराजमान असून सूर्याशी समसप्तक योग तयार झाला आहे.

ज्योतिष्य शास्त्रानुसार, सूर्य आणि शनी हे एकमेकांच्या सातव्या भावात स्थित आहेत. या योगामुळे काही राशींचे भाग्य उजळणार आहे. करिअर, व्यवसाय आणि कौटुंबिक जीवनात प्रगतीची संधी मिळणार आहे. यावेळी कोणत्या राशींना लाभ मिळणार आहे ते पाहूयात.

मकर रास

मकर राशीच्या लोकांसाठी हा समसप्तक योग अत्यंत लाभदायी ठरणार आहे. व्यवसायात प्रगती होणार आहे. नोकरी करणाऱ्यांना कार्यस्थळी मान-सन्मान मिळण्याची शक्यता आहे. व्यापाऱ्यांना उत्तम आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. नवीन उपक्रम सुरू करण्यासाठी हा काळ योग्य आहे. पित्याशी संबंध अधिक घट्ट होतील.

कुंभ रास

कुंभ राशीच्या जातकांसाठी समसप्तक योग सुखद काळ घेऊन येणार आहे. या काळात उत्पन्नात लक्षणीय वाढ होणार आहे. नवे उत्पन्नाचे स्रोत तयार होऊ शकतात. व्यापाऱ्यांना अधिक नफा मिळेल. त्याचप्रमाणे आर्थिक स्थितीत सुधारणा होण्याची शक्यता आहे. पैशांची बचत करून भांडवल वाढवण्यात यश मिळेल.

कर्क रास

कर्क राशीच्या लोकांना या काळात अचानक धनलाभ होण्याचे संकेत आहेत. तुमच्या संवाद कौशल्यात वाढ होणार आहे. त्याचप्रमाणे अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. कामातील अडथळे दूर होणार आहेत. व्यापाऱ्यांना नवे करार मिळू शकणार आहेत. यामुळे भरपूर धनलाभ होईल.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : भंडाऱ्यात कुकरचा स्फोट झाल्यानं 14 जाण जखमी

Mumbai To Solapur: सोलापूरकरांसाठी खुशखबर! मुंबई-सोलापूर विमानसेवा 'या' तारखेपासून सुरू

Accident : बसचालकाला हृदयविकाराचा झटका, चुकून अ‍ॅक्सिलरेटर दाबला अन् मोठा अनर्थ घडला; Video

एसटीचा प्रवास धोक्याचा! वाहकाची मुजोरी, भंडाऱ्यात महिला एसटी बस वाहकाची प्रवाशाला मारहाण|VIDEO

Ananya Pandey Filmfare Look: बांधणी साडीमध्ये अनन्याचा हॉट लूक, फोटो खुपच सुंदर

SCROLL FOR NEXT