Navpancham Rajyog saam tv
राशिभविष्य

Navpancham Rajyog 2025: 30 वर्षांनंतर शनी-बुध बनवणार नवपंचम राजयोग; 'या' राशींचं नशीब चमकण्याची शक्यता

Saturn Mercury Conjunction Benefits: आता तब्बल ३० वर्षांनंतर कर्मफलदाता शनि आणि बुद्धीचा कारक बुध यांच्या संयोगाने 'नवपंचम राजयोग' तयार होणार आहे

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार ग्रह वेळोवेळी गोचर करून शुभ योग आणि राजयोग निर्माण करतात. ज्याचा प्रभाव केवळ मानवाच्या वैयक्तिक जीवनावरच नव्हे, तर देश आणि जगभरातील घडामोडींवरही दिसून येतो.

आता कर्मफलदाता शनी आणि ग्रहांचा राजकुमार बुध यांनी एकत्र येऊन नवपंचम राजयोग निर्माण केला आहे. २६ ऑक्टोबर रोजी हे दोन्ही ग्रह एकमेकांपासून १२० अंशांवर येणार असून त्यांच्यामुळे हा शक्तिशाली योग तयार झाला. या योगामुळे काही राशींच्या नशिबात चमकदार बदल होऊ शकणार आहेत. यावेळी कोणत्या राशींना नवपंचम राजयोगाचा विशेष लाभ मिळू शकतो ते पाहूयात.

मकर राशी

मकर राशीच्या व्यक्तींना हा योग अत्यंत लाभदायक ठरू शकणार आहे. या काळात आकस्मिक धनलाभ होण्याची शक्यता आहे. नवीन उत्पन्नाचे स्रोत निर्माण होऊ शकणार आहे. कामाच्या ठिकाणी तुमच्या प्रयत्नांची प्रशंसा होणार आहे. नशीब प्रबळ राहील आणि आर्थिक स्थिती अधिक मजबूत होईल.

मिथुन राशी

मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी नवपंचम राजयोग सकारात्मक बदल घेऊन येईल. काम आणि व्यवसायात प्रगती होईल. बेरोजगारांना नोकरी मिळण्याची शक्यता आहे. नोकरीत असलेल्या व्यक्तींना नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. व्यवसायात वाढ होईल आणि आत्मविश्वासात वाढ होईल.

कुंभ राशी

कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी हा योग अनुकूल ठरेल. धनप्राप्तीचे नवीन मार्ग उघडतील. तुम्ही धार्मिक किंवा मांगलिक कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. आत्मबल, यश आणि धैर्य यामध्ये वाढ होईल. महत्त्वाचे प्रोजेक्ट्स हातात येतील.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bacchu Kadu: बच्चू कडूंचा महाएल्गार मोर्चा, नागपूरात चक्काजाम, प्रकाश आंबेडकरांचा खोचक टोला

Eknath Khadse: एकनाथ खडसेंच्या घरावर दरोडा, जळगावच्या घरातून सोनं, रोकड लंपास

IND VS AUS: एकमेव 'या' भारतीय फलंदाजाने टी-२० क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाला धुतलं, ठोकलं दमदार शतक

Maharashtra Flood: अतिवृष्टीग्रस्तांना आतापर्यंत 8 हजार कोटींची मदत, पुढच्या 15 दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यात येणार 11 हजार कोटी

Narayan Rane : ...म्हणून मी शिवसेना सोडली; भाजप खासदार नारायण राणेंनी सांगितलं कारण

SCROLL FOR NEXT