Surya-Shani Yuti saam tv
राशिभविष्य

Surya-Shani Yuti: 30 वर्षांनंतर शनी-सूर्याची होणार युती; 'या' 3 राशींचं नशीब चमकणार, हाती येणार पैसाच पैसा

Surya And Shani Conjunction 2025: मीन राशीत शनी आणि सूर्याची युती ३० वर्षांनी होणार आहे. अशा परिस्थितीत, या दोन ग्रहांच्या युतीमुळे काही राशींचे नशीब उजळू शकणार आहे.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, ग्रहांचा राजा सूर्य दर महिन्याला त्याच्या राशीमध्ये गोचर करतो. मार्च महिन्यात देखील सूर्य गोचर करणार आहे. सूर्य देव १४ मार्च रोजी मीन राशीत प्रवेश करणार असून शनिदेव २९ मार्च रोजी मीन राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे शनी आणि सूर्य यांची युती होणार आहे.

शास्त्रानुसार, मीन राशीत शनी आणि सूर्याची युती ३० वर्षांनी होणार आहे. अशा परिस्थितीत, या दोन ग्रहांच्या युतीमुळे काही राशींचे नशीब उजळू शकणार आहे. या राशींना अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे काही राशींची सर्व स्वप्न पूर्ण होणार आहेत. यावेळी कोणत्या राशींना याचा लाभ होऊ शकतं ते पाहूयात.

कुंभ रास

सूर्य आणि शनिदेव यांचे संयोजन तुमच्यासाठी सकारात्मक ठरू शकणार आहे. या काळात तुम्हाला वेळोवेळी अनपेक्षित पैसे मिळू शकतात. नोकरी करणाऱ्यांना लवकरच त्यांच्या कारकिर्दीत मोठं यश मिळू शकणार आहे. तुम्ही काही जमीन, मालमत्ता आणि वाहन खरेदी करू शकता.

धनू रास

धनु राशीच्या लोकांसाठी सूर्य आणि शनिदेवाची युती फायदेशीर ठरू शकणार आहे. कारण ही युती तुमच्या राशीच्या चौथ्या घरात तयार होणार आहे. यावेळी तुम्हाला वाहन आणि मालमत्तेचं सुख मिळू शकणार आहे. आर्थिकदृष्ट्या ही परिस्थिती तुमच्यासाठी खूप शुभ ठरू शकणार आहे. तुम्हाला विविध स्रोतांद्वारे संपत्ती मिळवण्याची संधी मिळणार आहे.

मिथुन रास

शनि आणि सूर्याची युती तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकणार आहे. या वेळी तुम्हाला काम आणि व्यवसायात विशेष यश मिळू शकणार आहे. कामाच्या ठिकाणीही परिस्थिती तुमच्या बाजूने असेल. या काळात बेरोजगारांना नोकरी मिळू शकणार आहे. नोकरी करणाऱ्यांना कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Price Today: सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी! सोनं-चांदीच्या किंमती मोठा बदल, जाणून घ्या २४ , २२ आणि १८ कॅरेटचा भाव

Palak Tikki For Weight Loss: वजन कमी करण्यासाठी घरीच बनवा पालक टिक्की, सोपी आहे रेसिपी

LPG Gas Cylinder : ग्राहकांसाठी मोठी बातमी! वर्षाला ६ सिलिंडर मिळणार मोफत; कुठे आणि कोणासाठी लागू केला आहे हा निर्णय? वाचा

वर्षांपूर्वी रस्ता बांधताना आक्षेप घेतला नाही म्हणून भरपाई नाकारता येईल का? उच्च न्यायालयाने स्पष्टच सांगितलं...

Asian Games 2026: भारताला दुसरं गोल्ड! कमलजीत-सुरुचीची जोडी ठरली भारी, एशियन गेम्समध्ये रचला विक्रम

SCROLL FOR NEXT