Surya-Ketu Yuti 2024 saam tv
राशिभविष्य

Surya-Ketu Yuti: सूर्य-केतूची युती मिळवून देणार पैसा; 'या' राशींचे सुरु होणार अच्छे दिन

Surya-Ketu Yuti 2024: तब्बल १८ वर्षांनंतर सूर्य आणि केतू ग्रहाची युती होणार आहे. यावेळी या दोन ग्रहांची युती काही राशींना मालामाल करणार आहे.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यानुसार, सूर्य ग्रह दर महिन्याला त्याच्या राशीमध्ये बदल करतो. येत्या सप्टेंबर महिन्यात देखील सूर्य गोचर करणार असून तो केतू ग्रहासोबत युती करणार आहे. सूर्य ग्रह सध्या सिंह राशीत असून को कन्या राशीमध्ये प्रवेश करणार आहे. यावेळी तब्बल १८ वर्षांनंतर यांची युती होणार आहे.

ज्योतिष्य शास्त्रानुसार, सूर्य आणि केतू ग्रहाच्या या युतीचा प्रत्येक राशींच्या व्यक्तींवर परिणाम होणार आहे. मात्र यावेळी काही राशी अशा आहेत, ज्यांना या युतीमुळे अधिक लाभ होणार आहे. यावेळी काहींच्या आयुष्यात आनंदाचे चांगले क्षण येणार आहेत, तर काही राशींच्या हाती पैसा येणार आहे. जाणून घेऊया या काळात कोणत्या राशींच्या व्यक्तींना अधिक लाभ होणार आहे.

तूळ रास

ज्योतिष्य शास्त्रनुसार, सूर्य आणि केतूच्या युतीमुळे या राशींच्या व्यक्तींना लाभ मिळणार आहे. या काळात तुमची आर्थिक स्थिती उत्तम राहणार आहे. तुम्ही जोडीदारासोबत चांगला वेळ घालवू शकणार आहात.

वृश्चिक रास

सूर्य आणि केतूची युती या राशींच्या व्यक्तींसाठी लाभदायक असणार आहे. दीर्घकालीन रखडलेली कामं पूर्ण होऊ शकणार आहेत. तुम्ही कर्ज घेतलं असेल तर त्यातून मुक्ती मिळेल. अडकलेले पैसे हाती येणार आहेत. बेरोजगारांना उत्पन्नाची संधी मिळणार आहे.

मकर रास

सूर्य आणि केतूची युती नवव्या भावात होणार आहे. या राशींच्या व्यक्तींना या काळात नशीबाची साथ मिळणार आहे. तुमच्या कुटुंबात आनंदाचं वातावरण असणार आहे. आर्थिक बाबतीत तुमची स्थिती मजबूत होणार आहे. पैशांची बचत करण्यामध्ये तुम्हाला यश मिळणार आहे.

( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. साम टीव्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आरक्षण सोडतीत फिक्सिंग, OBC प्रवर्गातील महिलांवर अन्याय, महापालिका आरक्षणावरून वाद पेटला

Maharashtra Live News Update: विकास गोगावले प्रकरणी शिवसेना जिल्हा प्रमुख प्रमोद घोसाळकर यांच मोठ विधान

Crime News: १९ बाटल्या बिअर आणि दोन मित्र...; पार्टी गाजवली, मात्र 'ती' एक चूक महाग पडली, दोघांची जीवनयात्रा संपली

मोठी बातमी! शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्ष, चिन्ह कुणाचे? निकाल लवकरच... अंतिम सुनावणी कधीपासून... VIDEO

खबऱ्यांकडून टीप मिळाली, हायवेवर ट्रक अडवून झडती घेतली; बिश्नोईला बेड्या ठोकल्या! नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT