Guru Gochar 2025 Jupiter Planet saam tv
राशिभविष्य

Jupiter Vakri: 12 वर्षांनंतर गुरू ग्रह चालणार वक्री चाल; 'या' राशींचं भाग्य चमकणार, पद-प्रतिष्ठाही मिळणार

Jupiter Vakri In Mithun 2025: ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रहाचे गोचर आणि त्यांची वक्री गती अत्यंत महत्त्वाची असते. देवगुरु बृहस्पती, म्हणजेच गुरु, एका राशीत सुमारे १२ महिने राहतो.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक ज्योतिषानुसार, ग्रह वेळोवेळी वक्री किंवा मार्गी होतात. ग्रहांच्या या स्थितीचा परिणाम सर्व राशींच्या व्यक्तींवर होत असतो. या वर्षाच्या शेवटी देवगुरु बृहस्पति मिथुन राशीत वक्री होणार आहेत. त्यांच्या या वक्री हालचालीचा सर्व राशींवर परिणाम होणार आहे.

दरम्यान काही राशींसाठी हा काळ विशेष शुभ ठरणार आहे. यावेळी काही राशींना त्यांना पद-प्रतिष्ठा, मान-सन्मान आणि प्रगतीची संधी मिळू शकणार आहे. यावेळी कोणत्या राशींच्या व्यक्तींना लाभ मिळणार आहे ते जाणून घेऊया.

तूळ रास

गुरु ग्रहांची वक्री चाल तूळ राशीच्या लोकांसाठी अत्यंत सकारात्मक ठरू शकणार आहे. या काळात तुमची आर्थिक स्थिती मजबूत राहणार आहे. उत्पन्नात वाढ होणार आहे. ज्यामुळे मन प्रसन्न राहील. नवीन मित्र मिळणार आहेत. सामाजिक संपर्कांमुळे फायदा होणार आहे.

वृषभ रास

वृषभ राशीच्या लोकांसाठी बृहस्पतींची वक्री चाल आर्थिक दृष्ट्या फायदेशीर ठरणार आहे. गुरु ग्रह तुमच्या राशीच्या धनस्थानात वक्री होत असल्याने अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. मालमत्तेशी संबंधित प्रकरणांमध्ये लाभ मिळण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला जुन्या गुंतवणुकीतून चांगला नफा होणार आहे.

मिथुन रास

मिथुन राशीच्या लोकांसाठी हा काळ अनुकूल ठरणार आहे. गुरु बृहस्पति तुमच्या लग्न भावात वक्री होत असल्याने तुमची लोकप्रियता वाढण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला मान-सन्मान आणि प्रतिष्ठा मिळणार आहे. राजकारणाशी संबंधित लोकांना पदप्राप्तीची संधी असणार आहे. प्रभावशाली व्यक्तींचा पाठिंबा मिळू शकणार आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Famous Actor Death : प्रसिद्ध अभिनेत्याचं निधन, कलाविश्वावर शोककळा

How To Apply Mascara: मस्कारा लावताना या 5 चुका टाळा; डोळे दिसतील टप्पोरे आणि सुंदर

Bank Election 2026 : यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुका जाहीर, RBIच्या निर्देशांमुळे जुने संचालक अडचणीत; वाचा सविस्तर

Gautam Gambhir: इंदूरच्या मैदानावर लागले 'गौतम गंभीर हाय-हाय'चे नारे; चाहत्यांचा संताप पाहता विराटने केलं असं कृत्य की...! Video viral

Skin Care : मेकअप न करताही मिळेल चेहऱ्यावर गुलाबी चमक, ट्राय करा 'हे' घरगुती उपाय

SCROLL FOR NEXT