Which Zodiac Signs Will Benefit From Saturn Jupiter Transit saam tv
राशिभविष्य

Jupiter Saturn Yuti effects: 12 वर्षांनी गुरु-शनि बनवणार दुर्लभ संयोग; 'या' राशींचं नशीब चमकणार, पैसाही येणार हाती

Shani Dev Vakri In Meen And Jupiter Rise: ज्योतिषशास्त्रात गुरु आणि शनी हे दोन अत्यंत महत्त्वाचे ग्रह मानले जातात. गुरु हा विस्तार, भाग्य, धन, ज्ञान आणि समृद्धीचा कारक आहे, तर शनी हा कर्म, शिस्त, न्याय, कठोर परिश्रम आणि दीर्घकालीन परिणामांचा ग्रह आहे.

Surabhi Jayashree Jagdish

ज्योतिषशास्त्रानुसार ग्रह-नक्षत्रांचं गोचर, वक्री होणं आणि पुन्हा उदयास येणं याचा मानवी जीवनावर मोठा परिणाम होतो. यंदा १२ वर्षांनंतर गुरू ग्रह मिथुन राशीत उदयास येतो. ७ जुलै आणि त्यानंतर शनिदेव १३ जुलैला वक्री होणार आहेत.

गुरु आणि शनी हे दोन ग्रह त्यांच्या स्थितीमध्ये बदल करणार आहेत. या दोन महत्त्वाच्या ग्रहांच्या हालचालीमुळे काही राशींच्या नशिबात मोठा बदल घडण्याची शक्यता आहे. करिअर, पैसा, प्रवास आणि कौटुंबिक आयुष्यात सकारात्मक घडामोडी दिसून येणार आहे. यामध्ये कोणत्या राशींचा समावेश आहे ते पाहूयात.

मीन रास (Meen Zodiac)

मीन राशीसाठी गुरू ग्रह सुख स्थानात उदय होणार आहे. तर शनिदेव लग्न भावात वक्री होणार आहेत. हा काळ खूपच सकारात्मक ठरणार आहे. मानसिक शांती लाभणार आहे. आर्थिक दृष्टिकोनातून हा काळ फायदेशीर राहील. या काळात मालमत्ता किंवा वाहन खरेदीसाठीही योग्य वेळ आहे. आईसोबतचं नातं अधिक घट्ट होणार आहे.

वृषभ रास (Taurus Zodiac)

वृषभ राशीसाठी गुरू ग्रह दुसऱ्या भावात उदयास येणार आहे. तर शनिदेव अकराव्या स्थानावर वक्री होत आहेत. यामुळे उत्पन्नात वाढ होण्याची दाट शक्यता आहे. गुंतवणुकीच्या दृष्टीने देखील हा काळ लाभदायक ठरू शकतो. करिअरमध्ये उन्नती मिळण्याचा उत्तम योग आहे. तुमच्या बोलण्याने लोकं सहज आकर्षित होतील.

तूळ रास (Libra Zodiac)

तुला राशीसाठी हा काळ अत्यंत शुभ ठरणार आहे. शनिदेव सहाव्या स्थानावर वक्री होणार असून गुरू ग्रह भाग्य स्थानात उदयास येणार आहे. कोर्टकचेरीसंबंधी विषय तुमच्या बाजूने सुटणार आहेत. विद्यार्थ्यांना अभ्यासात चांगलं यश मिळणार आहे. व्यापाऱ्यांसाठी ही वेळ नफा मिळवणारी ठरणार आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nishikant Dubey Anti-Marathi : मराठी माणसाला डिवचा, प्रसिद्धी मिळवा; लालू, अमरसिंहनंतर आला निशिकांत दुबे

Pakistan : पाकिस्तानात होणार सत्तापालट? असीम मुनीर होणार राष्ट्रपती? बिलावल भुट्टोच्या विधानामुळे खळबळ

Russia News : पुतिन यांनी मंत्रिमडळातून काढलं; काही तासांतच मंत्र्याने आयुष्य संपवलं, जगात खळबळ

Shravan Somvar: पहिल्या श्रावण सोमवारी करा 'असे' उपाय, महादेव होतील प्रसन्न

Maharashtra Politics: MIM ने शोधला 'वंचित'ला पर्याय? महाराष्ट्राच्या राजकारणात 'रावण'ची एण्ट्री महाराष्ट्रात 'MD' फॅक्टर किंगमेकर?

SCROLL FOR NEXT