Lakshmi Narayan Rajyog saam tv
राशिभविष्य

Laxmi Narayan RajYog: 12 महिन्यांनी गुरुच्या राशीत बनणार लक्ष्मी नारायण योग; 'या' राशींचे सुरु होणार सुखाचे दिवस

Jupiter astrology yog: ज्योतिषशास्त्रानुसार लक्ष्मी नारायण योग हा अत्यंत शुभ योग मानला जातो. हा योग निर्माण झाल्यावर व्यक्तीच्या जीवनात संपत्ती, यश आणि सुख-समृद्धी येते.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक पंचांगानुसार, 2025 हे वर्ष संपत असताना काही दुर्मिळ राजयोग निर्माण होणार आहेत. यामध्ये लक्ष्मी-नारायण राजयोग योग देखील तयार होणार आहे. सध्या धनाचे दाता शुक्र ग्रह धनु राशीत असून 29 डिसेंबर रोजी व्यापाराचे दाता बुध ग्रहही धनु राशीत प्रवेश करणार आहे.

या दोन्ही ग्रहांच्या युतीमुळे लक्ष्मी-नारायण राजयोगाची निर्मिती होणार आहे. या योगामुळे काही राशींसाठी सुवर्णकाळाची सुरुवात होऊ शकते. यावेळी कोणत्या राशींना लाभ होणार आहे ते पाहूयात.

धनु राशी

धनु राशीच्या लोकांसाठी लक्ष्मी-नारायण राजयोग अत्यंत अनुकूल ठरू शकणार आहे. हा योग तुमच्या गोचर कुंडलीतील लग्नस्थानावर तयार होणार आहे. कुटुंबात सुख-समृद्धी वाढणार आहे. जे लोक दीर्घकाळ एका कंपनीत आहेत त्यांना मोठी खुशखबर मिळण्याची शक्यता आहे.

कन्या राशी

लक्ष्मी-नारायण राजयोगामुळे कन्या राशीच्या लोकांना वाहन आणि मालमत्तेची प्राप्ती होऊ शकणार आहे. राजकारणाशी संबंधित लोकांना पदप्राप्तीची संधी मिळू शकणार आहे. नोकरीत पदोन्नती किंवा वेतनवाढीचे संकेत मिळण्याची शक्यता आहे. आईसोबतचे संबंध अधिक दृढ होण्याची शक्यता आहे.

वृश्चिक राशी

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी लक्ष्मी-नारायण राजयोग सकारात्मक ठरणार आहे. या काळात तुम्हाला आकस्मिक धनलाभ होऊ शकणार आहे. नोकरी आणि व्यवसाय दोन्ही क्षेत्रांत प्रगतीचे योग आहेत. आर्थिक स्थितीत सुधारणा होणार आहे. कामाच्या ठिकाणी तुम्हाला इतरांचं सहकार्य मिळणार आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Elections:भाजपला रोखण्यासाठी काका-पुतण्या एकत्र? ठाकरेंपाठोपाठ दोन्ही राष्ट्रवादीचीही युती?

KDMC Election: भाजपा–शिवसेना शिंदे गटकाडून युतीचे संकेत; मात्र जागा वाटपाचा तिढा अजूनही गुलदस्त्यात

Kalyan Politics: फोडाफोडीवरून महायुतीत पुन्हा वाद; शिवसेनेनं नगरसेवक पळवल्यानंतर भाजप आक्रमक

Maharashtra Elections: बायको, मुलगा-मुलगी,भाऊ-बहिणींनाच हवीय उमेदवारी; नेत्यांना फक्त आपल्याच घरात हवं तिकीट

कराडची जामीनासाठी न्यायालयात धाव, सुटकेनंतर समर्थक काढणार हत्तीवरून मिरवणूक?

SCROLL FOR NEXT